Thursday, 5 September 2013

​         पांडुरंग शिकवण … 

​विठ्ठल नाम स्मरता ! दुख जाई क्षणार्धात !
​माउलीची लीला ज्ञात ! आज आम्हा !!

​पांडुरंगा तुझा ठाम ! उभ्या हसऱ्या पिकात !
​गाव- गाव शिवारात ! डवर्यात ​!!

​पांडुरंगा तुझा वास ! बा… अनंत अनंतात !
​गा…माझ्यातून तुझ्यात  ! ​अंतरी या !!

​पांडुरंग शिकवण ! काम देव काम धर्म !
​बा… सत्यार्थ  मर्म कर्म ! तू जपावे !!

(अभंग)
-​प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment