Wednesday, 18 April 2012

              अभंग...
माणूस निर्मिती! निसर्ग जागृती!
कर्माने प्रकृती!घडावया!!

निर्मिकाने बघा! नेमले माणसा!
स्वच्छंदी आरसा! दाखवाया!

मानवा तू कसा! घडलास बाबा!
का? निर्मात्यास बा! नडलाय!!

प्रश्न प्रश्न प्रश्न! किती तुझे प्रश्न!
निर्मात्यास प्रश्न! पडलाय!!

हावरट तुझा! मुळात स्वभाव!
कायम अभाव! समाधानी!!

घर तुला हवे! मोठे राजेशाही!
मनी अंधाराई! दाटलेली!!

त्याच वाईट हो! नि माझे चांगले!
झोडीत छीदरे! पडो त्याच्या!

झाडांची कटाई! कागद छपाई!
वाटून मिठाई! यशासाठी!

मोठे  कारखाने! दुषीयले जल!
टाकुनिया मल! पाण्यामध्ये!!

शांतीचा संदेश! जगी पोहचाया!
चाचणी कराया! अन्वस्राची!!

मूर्ख मूर्ख मूर्ख! किती मूर्ख पणा!
वाटून घे मना! थोडे तरी!

जगाच्या शांतीस! हिंस्र हत्यार का!
औजार हेच का! शांती साठी!

इतिहास गवा! हे महाभारत!
विनाश विरत! झाला आहे!!

पाहिजे जमीन! तीन गज तुला!
तरी का मोहला! स्वार्थासाठी!!

निर्मात्यास अता! पडलाय प्रश्न!
मानवाने स्वप्न! भंग केले!!

मानव उत्पत्ती! निसर्ग संकट!
प्रश्न हा विकत! निर्मात्यास!

प्रवीण सांगतो! ऐक तू मानवा!
आलाय फतवा! तुझ्या नामे!!

निसर्ग नियम! हिंस्र जेहि  होते!
नामशेष झाले! अता कोण!!

सावध सावध! मानवा सावध!
होयील रे वध! अता तुझा!!

निर्माता निर्मिले! मानवा कर्मिले!
निसर्गा धर्मिले! स्वर्गापरी!!
 -प्रवीण(डेबुजी) हटकर.

No comments:

Post a Comment