अभंग...
कृषिमय भारत! निसर्गमय सार!
जगासी आधार! लाभलेला!!
निसर्गिक वैभव! निसर्गाचा प्रभाव!
न जाणले अभाव!! आजवर!!
सुखद अनुभव! शांत वातावरण!
उत्तम आवरण! दिव्यत्वाचे!!!!
अलौकिक निसर्ग! अतुल्य से सौदर्य!
पुजील चंद्र सूर्य! भक्ती भावे!!
निसर्गासी दैवत! जाणलेले आराध्य!
दिव्यसे सानिद्य! पुजलेया!!
जडी-बुटी करुनी! रोगराई तारली!
वैद्याने जाणलेली! चमत्कृती!!
झाडे नदी पठार! उंच उंच डोंगर!
आच्छादिले अंबर! स्वर्गापरी!!
शोधले निसर्गात! जाणले निसर्गात!
जगले निसर्गात! आम्ही सारे!
अतुल्य देशाचा मी! आहे राजकुमार!
करुनिया आभार! निसर्गाचा!!
यथार्थ परमार्थ! धर्म मर्म कर्मार्थ!
निसर्गिक सामर्थ्य! धन्य धन्य!!
जीवन मरणासी! मिळे येथेच माती!
अनेक प्राणी जाती! भेद नसे!!
प्रवीण हि नमतो! निसर्गा जो जाणतो!
निसर्गासी पुजतो! मनोभावे!!
निसर्ग झाला बाप! निसर्ग झाली आई!
प्रवीण निसर्गाई! गावूनिया!!
-प्रवीण(हटकर.
No comments:
Post a Comment