विश्वास विश्वास! घातकी विश्वास!
करिती प्रवास! जवळच्या!!
तो माझी सावली! छाती ठोक बोले!
तो माझाच बोले! भाऊ-बंध!!
व्यवहार होता! धूर्त पणा झाला!
भावानेच केला! घात त्याचा!!
आता ओरडतो! घात झाला घात!
आपल्याने घात! केला आहे!!
मी तर वागलो! साधा भोळा तया!
नाही आली माया! आपल्याची!
विश्वास ठेवला! आपले म्हणून!
माझाच करून! व्यवहार!!
विश्वास वेगळा! व्यवहार दुजा!
सल्ला घे माझा! माणसा तू!
विश्वास हा कर! तूच स्वतावर!
नि दुसर्यावर! तू ठरव!!
व्यवहार कर! तू कुणा सोबत!
हाती तू ठेवत! सूत्र सारे!!
आहे दिलदार! तू हे लाख खरे!
व्यवहार पुरे! ना होयील!!
व्यवहार होतो! समान बाजूनी!
दोघांनी राखुनी! लक्ष त्यात!!
मी आहेच साव! चारीगाव नाव!
द्या मजला भाव! मूर्ख वाणी!!
पैसा तिथे लाव! जिथे योग्य वाव!
उगाचच राव! बनू नको!!
विश्वास सांगुनी! कार्य नको लादू!
संधी नको साधू! फुकटची!!
डोळ्यासी लावूनी! विश्वासाची पट्टी!
अंधारात भट्टी! चालू नको!!
विश्वास असावा! ना अंधविश्वास!
सुकर प्रवास! होयील हो!!
व्यवहार नाच! दुजे बोल माझे!
सूत्र ठेवा राजे! यश तुझे!!
प्रवीण होवुनी! व्यवहार कर!
घे यशोशिखर! विश्वासाने!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
No comments:
Post a Comment