अभंग...
मी कणात कण! उसविला आहे!
मी कणात कण! उसविला आहे!
नि शोधले आहे! ब्रम्हांडाला!!
माझ्याच अंतरी! विखुरला आहे!
ग्रासलेला आहे! कणात तो!!
स्व: अस्तित्व शोध! स्वतास जागून!
स्वतात गुंतून! घेत आहे!!
स्वतात गुंतून! घेत आहे!!
उद्धार करुनी! कण कण झालो!
कणात जाहलो! कण नवा!!
कण हा अखंड! कणास ना खंड!
कणात ब्रम्हांड! जाणुनिया!!
प्रवीण सांगतो! कणाचा विळखा!
अंतरी ओळखा! बा ब्रम्हांडी!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
No comments:
Post a Comment