मी तसाच होतो विरक्त …
सखे … तुझी एक गुलाबी नजर
माझ्या नयनी येउन भिडते
अन माझ्या अंतरंगी प्रचंड घंटा नाद उमटतो,
गुंजतो व भिनभिनतोसुद्धा ,
जणू मी एका प्राचीन शिवालयात युगायुगातून
द्यानास्त प्रसन्न भावमुद्रेत तुझ्याच त्या नजरभेटीसाठी
ताठस्त नी व्याकूळ झालेलो …ध्यानमग्न
हो मोहिनी ! तो मी तसाच "आसक्त" !!!
जन्मोजन्मीचा
पण …
सखे ! अशात तुझी एक नकारात्म भावमुद्रा
माझे हृदय ढगफुटी फाताल्यासारखे होते,
मग सर्वत्र विनाशाच विनाश,
मग जगाव की मराव? हा प्रश्न मनात
घुटमळू लागतो …
राहुल ला सोडून जाताना सिद्धार्थ ला सोपे नव्हतेच
'शून्यातून विश्वव्यापी शुन्याकडे' जाताना शुन्य घरातील
लीनता… नक्कीच 'बुद्धमय' होती शांततेसाठी
हो मोहिनी ! मी तसाच होतो विरक्त…
सुख-दुःखाच्या सीमापार अगदी सहजच ………
-प्रवीण बाबूलाल हटकर.
No comments:
Post a Comment