Friday, 16 August 2013

प्रख्यात उद्देश केवळच सत्य …

कुख्यात प्रख्यात ! जाणुया फरक !
प्रतिमा स्मारक ! समजूया !!

कुख्यात प्रख्यात ! बा… जग-विख्यात !
ओळख कार्यात ! वेगळीची !!

 कुख्यात ओळख ! गा… कुकर्मातून !
 हीन कामातून ! येत असे !!

वायीट भावना ! दुसर्यास हानी !
स्व:स्वार्थ जीवनी ! एक धर्म !!

वाममार्ग प्रिय ! दादागिरी धंदा !
पैशासाठी जिंदा !! मुर्दापाडी !!

कुख्यात नावाने ! सारे दुरजायी !
भयभीत होई ! मृत्यू धाकी !!

कुख्यात प्रसिद्धी ! बा… हानिकारक !
व्यर्थ…  सामाजिक ! हितासाठी !!

प्रख्यात प्रसिद्धी ! बा… ज्ञान सामुग्री !
जळ हे समुद्री ! तेव्हडेची !!

प्रख्यात साक्षात ! मोठीच साधना !
तपचर्या म्हणा ! तपस्वीची !!

प्रख्यात प्रसिद्धी ! बा… येती जवळ !
तलावी कमळ ! जसा हवा !!

प्रख्यात ओळख ! जग प्रबोधन !
बा… परिवर्तन ! समाजात !

प्रख्यात उद्देश ! केवळच सत्य !
बा… आळा  असत्य ! कार्यास हो !!

प्रख्यात ओळख ! बारा जोतिर्लिंग !
बोधगया दंग ! लिनतेकी !!

एशुचा संदेश ! बा…  शांततेसाठी !
गा… माणसांसाठी ! प्रख्यातच !!

कुख्यात भावना ! असत्य अकर्म !
प्रख्यात सकर्म ! सत्यातून !!

(अभंग…)
-प्रवीण बाबूलाल हटकर

ची 

No comments:

Post a Comment