विठ्ठू संगे अर्थ, जीवनाला…
विठ्ठू दरबारी ! बा… पंढरपुरी !
येती वारकरी ! दर्शनासी !!
हाताचेच ताळ ! मनाचे मृदुंग !
भक्त जपे संग ! नाम विठ्ठू !!
पांडुरंग हरी ! पांडुरंग विठ्ठू !
विठ्ठू विठ्ठू विठ्ठू ! पांडुरंग !!
विठ्ठू मुखे बोला ! विठ्ठू रंग रंगा !
विठ्ठू नाम दंगा ! विठ्ठू विठ्ठू !!
विठ्ठलाची काया ! विठ्ठलाची माया !
विठ्ठलाची छाया ! वात्सल्याची !!
विठ्ठू परमार्थ ! विठ्ठू तू समर्थ !
विठ्ठू संगे अर्थ ! जीवनाला !!
विठ्ठू माझा श्वास ! विठ्ठू तू विश्वास !
विठ्ठू हा प्रवास ! मोक्ष प्राप्ती !!
(अभंग …)
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment