Wednesday, 21 August 2013

पांडुरंग एक ….

देवा पांडुरंग ! सखा पांडुरंग !
राजा पांडुरंग ! अंतरीचा !!

पांडुरंग एक ! तै रूप अनेक !
हृदयी हरेक ! वास करी !!

पांडुरंग भोळा ! सहज पावतो !
भक्तीत पाहतो ! शुद्ध भाव !!

पांडुरंग जसा ! सागराची खोली !
अंबराची झोळी ! ममतेची !!

पांडुरंग तुझा ! आम्हा सहवास !
संजीवन खास ! जगण्यास !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 
   

No comments:

Post a Comment