एक कविता...
हे ईश्वरा! मज
इतुकाच 'विश्वास' दे
पर्वत हि झुकेल
असा आत्मविश्वास दे!
हे ईश्वरा! मज
इतुकाच 'अभ्यास' दे
कन ते ब्रम्हांड उलगडेल
असा 'ज्ञान-प्रवास' दे!
हे ईश्वरा! मज
तुझा इतुकाच 'ध्यास' दे
मन नि आत्मा तुझ्या विलीन
अशी 'भक्ती-आस' दे!
-प्रवीण(डेबुजी) हटकर।
No comments:
Post a Comment