अभंग...
जिथे मिळे ज्ञान! गुरू तोची जाण!
एक नाही ठाण! दिव्यतेचे!!
ज्ञानरूप व्हावे! ज्ञान तू वाटावे!
ज्ञान पसरावे! कस्तुरीसी!!
"ज्ञान हीच शक्ती"! करुनिया भक्ती!
अज्ञानास मुक्ती! कायमची!!
ज्ञान हे परीस! अज्ञानास ज्ञान!
बनतो निजान! सुजानही!!
ज्ञान संपत्तीही! दिल्यास वाढते!
कनास करते! ब्रम्हांड ती!!
ज्ञान लपवून! कोणी ना विद्वान!
मुळात अजाण! तोही झाला!!
ज्ञान हे सर्वस्व! ज्ञान ब्रम्ह आहे!
नि ब्रम्हांड आहे! अखंडित!!
चाणक्याची नीती! बिरबल युक्ती!
भीमरूपी शक्ती! ज्ञानदीपे!!
ज्ञानेश्वर यांनी! केली न्यानेश्वरी!
मी प्रविनेश्वरी! आणतोय!
गीता बायबल! कुराण वाचावे!
ज्ञान रुजवावे! मनोमनी!!
प्रवीण ज्ञानास! करनी अर्पण!
हे ज्ञान-दर्पण! स्वीकारावे!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर।
No comments:
Post a Comment