अभंग...
कृष्ण कृष्ण कृष्ण! मन झाले कृष्ण!
मिटलेया प्रश्न! नाम घेता!!
कोणी म्हणे कान्हा! कुणी नंदलाला!
रे मुरारीवाला! कुणी म्हणे!!
हा ... माखनचोर! आहे चितचोर!
गोकुळ चा पोर! कुणी बोले!!
प्रेमळ स्वभाव! तेजस्वी प्रभाव!
प्रेमरूपी भाव! देवा तुझा!!
मुरारी वाजून! गोपिया दंगती!
रंगात रंगती! मनोभावे!!
प्रेमाच प्रतिक! शुभसा स्वस्तिक!
प्रेमळ आस्तिक! तूची आम्हा!!
हाती सुदर्शन! असुर वधाया!
जगी पोहचाया! शांती शांती!
शिरी मोरपंख! प्रेमरूपी काय!
जगी पसराया! प्रेमरस!!
राधा राधा राधा! कृष्ण कृष्ण कृष्ण!
झाले राधेकृष्ण! एकरूप!!
मीराच्या भक्तीने! आला दुजा युग!
अदभूत योग! घडविला!
प्रवीण बघतो! किरण तुझ्यात!
प्रेम अंतरात! रुजुनिया!!
प्रवीण भजतो! राधेकृष्ण नाम!
आहे प्रेम-धाम! तुझ्या ठायी!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
भगवान कृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वाना प्रेमळ शुभेच्छा!!
राधेकृष्ण...
No comments:
Post a Comment