Wednesday, 22 August 2012

पैसा पैसा ....
पैसा नाही मोठा! पैसा नाही छोटा!
पैशासाठी खोटा! बोले जो-तो!!

पैसा म्हणे बोले! पैसा म्हणे चाले!
पैशा संगे डोले! आज जो-तो!

पैसा झाली माय! पैसा झाला बाप!
गरोड्याचा साप! डोले जो-तो!!

पैसा माझा धर्म! पैसा माझे कर्म!
ओळखले मर्म! पैशामुळे!!

नाव गंगाराम! फिरे चारी धाम!
तुझ्यावीण काम! कोण करी!!

मी डाकू लुटेरा! हाती चाकू सुरा!
पैसा चोरणारा! तुम्हा प्यारा!

सत्ता माझ्या हाती! मोठी आहे छाती
पैशामुळे ख्याती! झुके जो-तो!!

मन नाही  मला! आत्मा नाही मला!
खर सांगू तुला! मी ईश्वर!!

जो पूजेल आज! डोक्यावर साज!
करील तो राज! मायारूपी!

प्रवीण का स्तब्ध! टाळतोय शब्द!
पैसाच प्रारब्ध! बोलूनिया!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

No comments:

Post a Comment