Thursday, 28 March 2013

'ब्रम्हांड' आहे...!
  
हवा पाणी अग्नी ! पृथ्वी नी आकाश !
बा… तुझ्यात अंश ! दिव्यरूपी !!




खंड ते अखंड ! कण ते ब्रम्हांड !
 स्वयंभू प्रचंड ! बा… तू तुझा !!

विचार सामर्थ्य ! अच्चाट  अफाट !
वाणीत प्रकट ! अमृतासी !!

तूच  ब्रम्ह आहे ! तू ब्रम्हांड आहे !
तूच तुझा आहे ! शिल्पकार !!

होऊन 'प्रवीण' ! कर स्व: विकास !
कळेल जगास ! कीर्ती तुझी !!

-प्रवीण बाबूलाल  हटकर.

Monday, 25 March 2013

आय लव …. " रेनी सिझन …"
….
माझ आयुष्य घड्याळाच्या काट्याला योग्यसा मान देत जगायला शिकलं होत . निरर्थक, निरूत्साह व निस्तेज या 'नी' त्रिकुट चक्रव्युव्हात पार गुंतले होते. दिवस-रात्र, महिने-वर्ष यायचे निघुनिया जायचे नि कधी-कधी मनात प्रश्न यायचा सूर्य पूर्वेकडून पच्छिमेकडे का जातो ? याला दुसरी दिशा मिळालीच नाही का? उगवायला ! त्यात हा पाऊसाळा … इतका पाऊस कशाला… चीख्खलच चिख्खल … वैतागच वैताग … मित्रांनो एक सांगू … आय हेट रेनी सिझन !!

नुकताच श्रावण महिना सुरु झाला.  कोलेज ला निघालो अचानक  १ १ च्या सुमारास मेघराजानी काळेकुट्ट मेघरूपी सैन्य बोलावले . अधून-मधून   वीजाच्या करणाऱ्या आवाजात मला सेनापती चेतावणी देतोय कि काय? " जा सुरक्षित स्थळी जा …" जणू असे काहीसे खुणवत होते पण मीही हट्टी, त्याला न जुमानता अपुल्या लक्षाकडे वाटचाल करीत होतो. खर्या योध्द्याप्रमाणे… अचानक मुसाळधार पाऊसरुपी बाणांचा वर्षाव सुरु झाला. माझ्या अंगा-खांद्यावर कोसळू लागला. मी बचावा करिता एका महाकाय वटवृक्षाचा आश्रय घेतला. मी डोक्यावरील पावसाला झटकत पावसाकडे रागाने पाहू लागलो. जणू पावसी थेंब साचलेले डबक्यात हत्ती घोड्यांचा खेळ दाखवत त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करताय असे भासत होते. अशातच एक स्कुटी आली व साचलेल्या डबक्यात अडकली निरखून बघितलं तर कुणी मुलगी होती. गाडीला बाहेर काढण्याची तिचे निष्फळ प्रयत्न सुरु होते. मला तिचा ओझरता चेहरा दिसला होता मदतीच्या अपेक्षित दृष्टीने ती माझ्याकडे कटाक्ष ताकयची पण आवाज देण्यास ती पुढाकार घेत नव्हती. शेवटी मी निर्णय घेतला तिला मदत करण्याचा. माझी ब्यग मी झाडाजवळ ठेवत कपड्यांची तमा न बाळगता गाडी कडे सरसावलो व ती काही बोलण्यापूर्वी मी डबक्यातून गाडी काढायला सुरवात केली. ऐव्हाना, पावसात मीही चिंब झालो होतो. मोठ्या प्रयत्नानंतर गाडी काढली व तिची प्रतिक्रिया ऎकता झाडाकडे परतलो. तिने गाडी स्टार्ट केली . बहुदा रेस करत मज काहीतरी खुणावत असावी पण मी केस झटकण्यात मग्न झालो. पूस सुरूच होता ती गाडीवरून उतरली नी झाडाकडे चालत आली. माझ्या नजरेत नजर टाकत चेहऱ्यावरील स्कार्प काढत म्हणाली… "प्रिन्स आभारी आहे रे मी तुझी" तिला बघताच मी अचंबित झालो कारण ती माझी क्लासमेट अवनी होती. जिच्या सोबत बोलण्यासाठी २ वर्ष मी झुरलो योगायोगाने ती चक्क माझ्याशी बोलताना माझ्याचसमोर … मी पुरता भांबावलो, तीनी पुन्हा आभार व्यक्त केले आणि मी छे-छे यात आभार कसले गं अवनी हेतर माझे कर्तव्यंच  ना! '   मग आमच्या गप्पा रंगल्या जुन्या आठवणींचा उजाळा झाला. कॉलेज बद्दल बोलू लागलो बोलता बोलता केव्हा पाऊस  थांबला हे कळले सुद्धा नाही..  निघायला लागलो. तेव्हद्यात अवनी उद्गारली तू कोठे चालला प्रिन्स मी म्हणालो कॉलेजला. ती म्हणाली चल सोबत जावूया मी तर जाम खुश झालो. मी अनीच्छेने नकार देण्यापूर्वीचं ती बोलली चल मित्रा संकोच नको ! मग मीही हसतमुख होत होकार दर्शविला. मग काय … तेव्हापासून आमची चांगलीच गट्टी जमलीया… अभ्यास असो, पिकेनिक असो, परस्परांच्या वस्तू खरेदीलाही व पहिल्या पावसाच्या सरित भिजण्याचा आनंदही  सोबतच लुटाया लागलो. आता तर आम्ही आमच्या निखळ मैत्रीच्या ऋनानू बंधात पार गुंतलोय . हे सार शक्य झाल नको-नकोश्या वाटणा-या पावसामुळे… आफ्टर ओहर  ओल … आय लव…  "रेनी सिझन" !! 

-प्रवीण बा. हटकर. 
अकोला
मो: ८० ५५ २१३ २८१ 

Saturday, 16 March 2013

प्रवीण जाणतो, वर्तन प्रभाव …

वर्तन असावे ! सदाचारी तुझे !
ढोंगी व बाजारी ! ते नसावे !!

बा … परिवर्तन ! वर्तन सुयोग्य !
नसावे अयोग्य ! आचरणी !!

वर्तन प्रकट ! बा … विचारातून !
नी आचारातून ! कृतिमय !!

वर्तन अयोग्य ! राग मनी त्यांच्या !
हात मदतीचा ! ना मिळेल !!

वर्तनी तू योग्य ! मान मिळे तुला !
हात मदतीला ! बा … देयील !!

वर्तन असावे ! शुद्ध नी निर्मळ !
हृदयी प्रेमळ ! भाव विश्व !!

वर्तनी जपावे ! मनातून मन !
एक एक जन ! जोडूनिया !!

प्रवीण जाणतो ! वर्तन प्रभाव !
सत्यार्थ स्वभाव ! समाधानी !!
 अभंग  …
-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Friday, 15 March 2013

व्यर्थ हे जीवन, लालसेच… 

मुठभर अन्न ! पोटासाठी हवे !
चोचले का? हवे ! जादासाठी !!

न जावे आहारी ! लालसा वाईट !
अनीती प्रकट ! मनी होते !!

सुरवात जणू ! भ्रष्टाचारातून !
हिंसाचारातून ! प्रवासते !!

याचे दोन घास ! त्याचे दोन घास !
भ्रष्टाचारी 'मास' ! तोडतोया !!

पोखरू नकोस ! कुर्ताळू ही नको !
माणुसकी नको ! बा… विसरू !!

हा याला, तू त्याला ! ते तुला फसवी !
लालसा फसवी ! एकमेका !!

सुरवात गोड ! लालसा दावते !
शेवट भोवते ! 'कडूच' हो !!

लालसा वाईट ! सांगतो प्रवीण !
व्यर्थ हे जीवन ! लालसेचे !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

Wednesday, 13 March 2013

वेळ ना थांबत …


वेळेचा करावा !  बा… सदुपयोग !
ना दुरुपयोग ! तू करावा !!

तू येत क्षणांचे ! स्वागत करुनी !
कार्यास लागुनी ! प्रारंभावे !!

वेळ ना थांबत ! तुझ्या सोबतीला ! 
वेळेच्या गतीला ! तू चालावे !!

वेळेचे महत्व ! गुण जया अंगी !
यशस्वी तो जगी ! हमखास !!

वेळेचे सामर्थ्य ! सत्य कर्म धर्म !
जपतील मर्म ! सदोदित !!

वेळ कुणाचीही ! नाहीच गुलाम !
वेळेचे गुलाम ! आज जो तो !!

वेळ तुझ्यासाठी ! तू न थांबलास !
बा … ती  दुसर्यास ! मिळतेया !!

वेळ आहे मोठी !वेळ नाही छोटी
वेळेची तू खोटी ! ना… करावी !!

नुकसान तुझे ! ना होत वेळेचे !
सत्य जीवनाचे ! घे… जाणून !!

वेळेचे महत्व ! जानुनी कार्यार्थ !
प्रवीण समर्थ ! बा… जाहला !!

 -प्रवीण बाबूलाल हटकर . 

Monday, 11 March 2013

तू 'ब्रम्हांड' आहे...!
  

तूच  ब्रम्ह आहे!
तू ब्रम्हांड आहे!
तूच तुझा आहे!
शिल्पकार!!

होऊन 'प्रवीण'!
कर स्व: विकास!
कळेल जगास!
कीर्ती तुझी!!

-प्रवीण बाबूलाल  हटकर.
असे घडावे की …

असे घडावे की ! आत्मज्ञान व्हावे !
उद्देश कळावे ! बा… जन्माचा !!

हा उंच डोंगर ! गगन परीघ !
ओढतोया रेघ ! क्षितीज का ? !!

दुख्खात आसवे ! सुखात हसू का ? !
संघर्ष येतो का? ! ह्या जीवनी !!

आभाळ गर्भात ! उठताच कळ !
व्याकुळतो तळ ! भू तुझा का? !!

माणूस म्हणुनी ! तू आला जगी !
शोधण्या का त्रागी ! माणसास !!

शोध तुझा तुला ! तुझ्यात कळेल !
तेव्हा साकारेल ! उद्देश हा !!

उंदीर लहान ! इवलासा जीव !
पाहुनिया कीव ! येते आम्हा !!

पोखरुनी जेव्हा ! डोंगरास येतो !
अचंबित होतो ! जो तो तया  !!

 सुगरणी तुझा ! खोपा ना कळाला !
उद्देश हा कळाला ! स्वच्छंदित !!

कुणी माणसात ! माणूस शोधतो !
बा… देव शोधतो ! देवळात !!

शोधण्या तुजला ! नको भटकंती !
आत्मजाण अंती  ! आत्मज्ञान !!

प्रवीण उद्देश ! बा … फलित व्हावा  !
स्व: जन्म कळावा ! जीवा तुला!!
-प्रवीण बाबूलाल हटकर .

Monday, 4 March 2013

श्री संत गजानन महाराज यांच्या पावन प्रकट दिना निमित्य समस्त भक्त-गणास प्रेमळ शुभेच्छा।

प्रकटुनी ये पुन्हा ….

(भावगीत/ आरती …)

प्रकटुनी ये पुन्हा ! समर्थ गजानना !
भक्त हाका देतोय ! श्री. देवा गजानना !!

गण गण जोडीले ! गणात बोवूनिया !
मानवता मंत्रास ! मनात रुजुनिया !
एक आहे माणूस! उमजले या मना!! …
(प्रकटुनी ये पुन्हा …)

बाप तू संयमाचा ! माय तू ममतेची !
भक्तासाठी रुपिली ! काया पांडुरंगाची !
कण ते ब्रम्हांडात ! तूच तू गजानना !!
(प्रकटुनी ये पुन्हा…)

विना आग चिलीम ! पेटवून दाविली !
भक्त रक्षणासाठी ! नर्मदाही धाविली !
चमत्कार पाहुनी ! दंग दंगले जना !
(प्रकटुनी ये पुन्हा …)

येत प्रकटदिनी ! आनंदाचा सोहळा !
वारकरी जल्लोष ! शेगावी गोतावळा !
ढोल ताशे मृदुंग ! मनी जप गजानना !!
प्रकटूनी ये पुन्हा…)

नासाग्र तुझी बुद्धी ! ब्रम्ह तू ज्ञानवंता !
विष्णू महेश तू ! माउली जाणवंता !
ब्रम्हांड नायक तू ! श्री स्वामी गजानना !!
(प्रकटुनी ये पुन्हा…)

- प्रवीण बाबूलाल हटकर .
मो. ८० ५५ २१३ २८१ . 
     अकोला 

Saturday, 2 March 2013

आभाळ आभाळ …
(भावगीत)
आभाळ आभाळ, प्रितीचं आभाळ
ओलीचिंब सर…  चिंब रानमाळ …

मनी थरथर, श्वास भरभर… 
थोडासा उसासा, थोडासा आधार. 
घट्ट घट्ट मिठी…  इरादा हा टवाळ …
(आभाळ ….)

अवघड क्षण, एक तन मन
तू ग देवी रती, मी देव मदन
धुंद यौवनाची…  अंगी दिव्य-जाळ  … 
(आभाळ …)

हर्ष स्पंदनात, हर्ष आसवांत 
तुझी माझी साथ, हर्ष जीवनात
दुखे पाझरून…  सुखास सांभाळ …
(आभाळ …)

-प्रवीण बाबूलाल हटकर .