Monday, 11 March 2013

असे घडावे की …

असे घडावे की ! आत्मज्ञान व्हावे !
उद्देश कळावे ! बा… जन्माचा !!

हा उंच डोंगर ! गगन परीघ !
ओढतोया रेघ ! क्षितीज का ? !!

दुख्खात आसवे ! सुखात हसू का ? !
संघर्ष येतो का? ! ह्या जीवनी !!

आभाळ गर्भात ! उठताच कळ !
व्याकुळतो तळ ! भू तुझा का? !!

माणूस म्हणुनी ! तू आला जगी !
शोधण्या का त्रागी ! माणसास !!

शोध तुझा तुला ! तुझ्यात कळेल !
तेव्हा साकारेल ! उद्देश हा !!

उंदीर लहान ! इवलासा जीव !
पाहुनिया कीव ! येते आम्हा !!

पोखरुनी जेव्हा ! डोंगरास येतो !
अचंबित होतो ! जो तो तया  !!

 सुगरणी तुझा ! खोपा ना कळाला !
उद्देश हा कळाला ! स्वच्छंदित !!

कुणी माणसात ! माणूस शोधतो !
बा… देव शोधतो ! देवळात !!

शोधण्या तुजला ! नको भटकंती !
आत्मजाण अंती  ! आत्मज्ञान !!

प्रवीण उद्देश ! बा … फलित व्हावा  !
स्व: जन्म कळावा ! जीवा तुला!!
-प्रवीण बाबूलाल हटकर .

No comments:

Post a Comment