Monday, 4 March 2013

श्री संत गजानन महाराज यांच्या पावन प्रकट दिना निमित्य समस्त भक्त-गणास प्रेमळ शुभेच्छा।

प्रकटुनी ये पुन्हा ….

(भावगीत/ आरती …)

प्रकटुनी ये पुन्हा ! समर्थ गजानना !
भक्त हाका देतोय ! श्री. देवा गजानना !!

गण गण जोडीले ! गणात बोवूनिया !
मानवता मंत्रास ! मनात रुजुनिया !
एक आहे माणूस! उमजले या मना!! …
(प्रकटुनी ये पुन्हा …)

बाप तू संयमाचा ! माय तू ममतेची !
भक्तासाठी रुपिली ! काया पांडुरंगाची !
कण ते ब्रम्हांडात ! तूच तू गजानना !!
(प्रकटुनी ये पुन्हा…)

विना आग चिलीम ! पेटवून दाविली !
भक्त रक्षणासाठी ! नर्मदाही धाविली !
चमत्कार पाहुनी ! दंग दंगले जना !
(प्रकटुनी ये पुन्हा …)

येत प्रकटदिनी ! आनंदाचा सोहळा !
वारकरी जल्लोष ! शेगावी गोतावळा !
ढोल ताशे मृदुंग ! मनी जप गजानना !!
प्रकटूनी ये पुन्हा…)

नासाग्र तुझी बुद्धी ! ब्रम्ह तू ज्ञानवंता !
विष्णू महेश तू ! माउली जाणवंता !
ब्रम्हांड नायक तू ! श्री स्वामी गजानना !!
(प्रकटुनी ये पुन्हा…)

- प्रवीण बाबूलाल हटकर .
मो. ८० ५५ २१३ २८१ . 
     अकोला 

No comments:

Post a Comment