वेळ ना थांबत …
वेळेचा करावा ! बा… सदुपयोग !
वेळेचे महत्व ! जानुनी कार्यार्थ !
प्रवीण समर्थ ! बा… जाहला !!
वेळेचा करावा ! बा… सदुपयोग !
ना दुरुपयोग ! तू करावा !!
तू येत क्षणांचे ! स्वागत करुनी !
कार्यास लागुनी ! प्रारंभावे !!
वेळ ना थांबत ! तुझ्या सोबतीला !
वेळेच्या गतीला ! तू चालावे !!
वेळेचे महत्व ! गुण जया अंगी !
यशस्वी तो जगी ! हमखास !!
वेळेचे सामर्थ्य ! सत्य कर्म धर्म !
जपतील मर्म ! सदोदित !!
वेळ कुणाचीही ! नाहीच गुलाम !
वेळेचे गुलाम ! आज जो तो !!
वेळ तुझ्यासाठी ! तू न थांबलास !
बा … ती दुसर्यास ! मिळतेया !!
वेळ आहे मोठी !वेळ नाही छोटी
वेळेची तू खोटी ! ना… करावी !!
नुकसान तुझे ! ना होत वेळेचे !
वेळेची तू खोटी ! ना… करावी !!
नुकसान तुझे ! ना होत वेळेचे !
सत्य जीवनाचे ! घे… जाणून !!
वेळेचे महत्व ! जानुनी कार्यार्थ !
प्रवीण समर्थ ! बा… जाहला !!
-प्रवीण बाबूलाल हटकर .
No comments:
Post a Comment