आय लव …. " रेनी सिझन …"
….माझ आयुष्य घड्याळाच्या काट्याला योग्यसा मान देत जगायला शिकलं होत . निरर्थक, निरूत्साह व निस्तेज या 'नी' त्रिकुट चक्रव्युव्हात पार गुंतले होते. दिवस-रात्र, महिने-वर्ष यायचे निघुनिया जायचे नि कधी-कधी मनात प्रश्न यायचा सूर्य पूर्वेकडून पच्छिमेकडे का जातो ? याला दुसरी दिशा मिळालीच नाही का? उगवायला ! त्यात हा पाऊसाळा … इतका पाऊस कशाला… चीख्खलच चिख्खल … वैतागच वैताग … मित्रांनो एक सांगू … आय हेट रेनी सिझन !!
नुकताच श्रावण महिना सुरु झाला. कोलेज ला निघालो अचानक १ १ च्या सुमारास मेघराजानी काळेकुट्ट मेघरूपी सैन्य बोलावले . अधून-मधून वीजाच्या करणाऱ्या आवाजात मला सेनापती चेतावणी देतोय कि काय? " जा सुरक्षित स्थळी जा …" जणू असे काहीसे खुणवत होते पण मीही हट्टी, त्याला न जुमानता अपुल्या लक्षाकडे वाटचाल करीत होतो. खर्या योध्द्याप्रमाणे… अचानक मुसाळधार पाऊसरुपी बाणांचा वर्षाव सुरु झाला. माझ्या अंगा-खांद्यावर कोसळू लागला. मी बचावा करिता एका महाकाय वटवृक्षाचा आश्रय घेतला. मी डोक्यावरील पावसाला झटकत पावसाकडे रागाने पाहू लागलो. जणू पावसी थेंब साचलेले डबक्यात हत्ती घोड्यांचा खेळ दाखवत त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करताय असे भासत होते. अशातच एक स्कुटी आली व साचलेल्या डबक्यात अडकली निरखून बघितलं तर कुणी मुलगी होती. गाडीला बाहेर काढण्याची तिचे निष्फळ प्रयत्न सुरु होते. मला तिचा ओझरता चेहरा दिसला होता मदतीच्या अपेक्षित दृष्टीने ती माझ्याकडे कटाक्ष ताकयची पण आवाज देण्यास ती पुढाकार घेत नव्हती. शेवटी मी निर्णय घेतला तिला मदत करण्याचा. माझी ब्यग मी झाडाजवळ ठेवत कपड्यांची तमा न बाळगता गाडी कडे सरसावलो व ती काही बोलण्यापूर्वी मी डबक्यातून गाडी काढायला सुरवात केली. ऐव्हाना, पावसात मीही चिंब झालो होतो. मोठ्या प्रयत्नानंतर गाडी काढली व तिची प्रतिक्रिया ऎकता झाडाकडे परतलो. तिने गाडी स्टार्ट केली . बहुदा रेस करत मज काहीतरी खुणावत असावी पण मी केस झटकण्यात मग्न झालो. पूस सुरूच होता ती गाडीवरून उतरली नी झाडाकडे चालत आली. माझ्या नजरेत नजर टाकत चेहऱ्यावरील स्कार्प काढत म्हणाली… "प्रिन्स आभारी आहे रे मी तुझी" तिला बघताच मी अचंबित झालो कारण ती माझी क्लासमेट अवनी होती. जिच्या सोबत बोलण्यासाठी २ वर्ष मी झुरलो योगायोगाने ती चक्क माझ्याशी बोलताना माझ्याचसमोर … मी पुरता भांबावलो, तीनी पुन्हा आभार व्यक्त केले आणि मी छे-छे यात आभार कसले गं अवनी हेतर माझे कर्तव्यंच ना! ' मग आमच्या गप्पा रंगल्या जुन्या आठवणींचा उजाळा झाला. कॉलेज बद्दल बोलू लागलो बोलता बोलता केव्हा पाऊस थांबला हे कळले सुद्धा नाही.. निघायला लागलो. तेव्हद्यात अवनी उद्गारली तू कोठे चालला प्रिन्स मी म्हणालो कॉलेजला. ती म्हणाली चल सोबत जावूया मी तर जाम खुश झालो. मी अनीच्छेने नकार देण्यापूर्वीचं ती बोलली चल मित्रा संकोच नको ! मग मीही हसतमुख होत होकार दर्शविला. मग काय … तेव्हापासून आमची चांगलीच गट्टी जमलीया… अभ्यास असो, पिकेनिक असो, परस्परांच्या वस्तू खरेदीलाही व पहिल्या पावसाच्या सरित भिजण्याचा आनंदही सोबतच लुटाया लागलो. आता तर आम्ही आमच्या निखळ मैत्रीच्या ऋनानू बंधात पार गुंतलोय . हे सार शक्य झाल नको-नकोश्या वाटणा-या पावसामुळे… आफ्टर ओहर ओल … आय लव… "रेनी सिझन" !!
-प्रवीण बा. हटकर.
अकोला
मो: ८० ५५ २१३ २८१
No comments:
Post a Comment