Friday, 15 March 2013

व्यर्थ हे जीवन, लालसेच… 

मुठभर अन्न ! पोटासाठी हवे !
चोचले का? हवे ! जादासाठी !!

न जावे आहारी ! लालसा वाईट !
अनीती प्रकट ! मनी होते !!

सुरवात जणू ! भ्रष्टाचारातून !
हिंसाचारातून ! प्रवासते !!

याचे दोन घास ! त्याचे दोन घास !
भ्रष्टाचारी 'मास' ! तोडतोया !!

पोखरू नकोस ! कुर्ताळू ही नको !
माणुसकी नको ! बा… विसरू !!

हा याला, तू त्याला ! ते तुला फसवी !
लालसा फसवी ! एकमेका !!

सुरवात गोड ! लालसा दावते !
शेवट भोवते ! 'कडूच' हो !!

लालसा वाईट ! सांगतो प्रवीण !
व्यर्थ हे जीवन ! लालसेचे !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

No comments:

Post a Comment