भक्तीचा जल्लोष, पांडुरंग…
पंढरीची वारी ! चाले वारकरी !
भजे वारकरी ! पांडुरंग !!
श्री हरी विठ्ठल ! बोला जय हरी !
बोला हरी हरी ! पांडुरंग !!
टाळ वाजवूनी ! नाम जय घोष !
भक्तीचा जल्लोष ! पांडुरंग !!
दिन दुबळ्यासी ! सेवार्थ अर्पूया !
मनात स्मरुया ! पाडुरंग !!
सर्वांग सुंदर ! रूप मनोहर !
कोमळ आंतर ! पांडुरंग !!
श्रावण श्रुंगार ! साक्षात साकार !
जगण्या आधार ! पांडुरंग !!
अभंग …
-प्रवीण बाबूलाल हटकर
जगण्या आधार ! पांडुरंग !!
अभंग …
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment