Thursday, 19 June 2014

होत बंधू सखा, साथ देई…

परम सत्य तू ! परम तथ्य तू !
विठ्ठला तूच तू ! जाणिवांत !!

तू आनंदी घर ! सुखाचा  सागर !
विठ्ठला जागर ! नाम तुझ्या !!

भक्ताच्या रक्षणा ! विठू पाठीराखा !
होत बंधू सखा ! साथ देई !!

काळीज देवा दे ! माणूस पाहण्या !
माणूस शोधण्या ! माणसात !!

(अभंग … )

- प्रवीण बाबूलाल हटकर

No comments:

Post a Comment