विठ्ठला तू व्हावे , अमुचे नशीब…
होऊन छप्पर ! आधारावे !!
विठ्ठला तू घ्यावे ! आम्हास कवेत !
फेकुनी हवेत ! बा… झेलावे !!
विठ्ठला तू द्यावे ! हातात लेखन !
देत शिकवण ! गिरवावे !!
विठ्ठला तू व्हावे ! अमुचे नशीब !
जीवन हिशोब ! जुळवावे !!
विठ्ठला तू जावे ! तुझ्यात घेऊन !
तुझ्यात ठेऊन ! सुखवावे !!
(अभंग… )
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment