भक्त हा पामर , वा असो कुबेर ….
अंतरित माझ्या ! झाकन्यासी !!
विठ्ठल जाहलो ! विठ्ठल पुजता !
विठ्ठल स्मरता ! लीन होता !!
विठ्ठल पाहतो ! हासुनिया असा !
स्पंदनात जसा ! विरलाय !!
विठ्ठल ठेवतो ! भक्तावरी लक्ष !
वेळोवेळी दक्ष ! करुनिया !!
भक्त हा पामर ! वा असो कुबेर !
वृत्ती सदाचार ! तो असावा !!
विठ्ठल पावतो ! सत्यार्थ कर्मात !
सत्यार्थ कार्यात ! सदोदित !!
(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment