पुन्हा एकदा पोस्ट करतोय …
// अॅबार्शन सक्सेस...! //
हॅलो मॅम... नमस्कार समाजसेवक साहेब
मी भ्रूण बोलतोय...
अरे हे काय? आई प्राध्यापिका तर बाबा समाजसुधारक
हे कळताच अत्यंत खूष झालोय.
ही कल्पना त्यांच्यासाठी आनंददायी होती व माझ्यासाठीसुद्धा!
गर्भसंस्कार व्हावेत म्हणून बाबांनी आईला वेगवेगळे ग्रंथ, नाव्हेल्स आणून दिलीत.
आई स्वतः प्राध्यापिका असल्यामुळे रात्रंरात्र जागून मोठ्या आवडीने
ते सारे वाचून काढायची, मीसुद्धा ऐकायचो.
बाबा आईच्या पोटाला कान लावत, तासनतास गप्पा मारायचे अन
माझ्या हालचालींवर लक्ष द्यायचे. त्यांना उत्सुकता होती माझ्या आगमनाची.
माझ्या नाजुक स्पर्शाने त्यांनाही शहारून जायचे होते.
ती वेळ आली, मी कोण? हे जाणून घ्यायची...
मला विचित्र वाटलं, मी कोण? हे आपणांस का जाणून घ्यायचे?
पण भ्रूण जाणून घेणे हा तर गुन्हा आहे ना!
मग तरिसुद्धा आई-बाबा व डाक्टर साहेब,
आपण असे का करत आहात?
मी थोडा विचार केला, माझे आई-बाबा खरंच ग्रेट आहेत.
पण मला आपल्याला सरप्राईज करायचे आहे ना! प्लीज...
मला सोनोग्राफी मशिनमध्ये टाकले. हळूहळू माझे चित्र स्क्रिनवर दिसू लागले.
डाक्टर साहेब म्हणाले, '' अभिनंदन! आपण एका मुलीचे वडील होणार आहात! ''
मला फार आनंद झालाय... कारण पोटात असताना आईने वाचलेले- जिजाऊने
शिवबा कसा घडवला, अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी, मदर तेरेसा,
हल्लीच अंतराळात जाऊन आलेली सुनीता विल्यम्स
यांची कार्य-कीर्ती खरंच किती महान आहे. मलाही तसंच बनायचंय आई-बाबा!
दुस-या दिवशी आई-बाबा हास्पिटलमध्ये आलेत. ते तणावात दिसले.
आणि हे काय? नको डाक्टर साहेब, आई... बा...बा... तुम्हीसुद्धा!
मी... काय केले? न...को... आ... आ...!
थोड्या वेळेनंतर डाक्टरांनी बाबांशी हात मिळवला- '' अॅबार्शन सक्सेस...! ''
आई-बाबा आनंदित आहेत! अहो, मला एका पिशवीत गुंडाळून
चक्क कचरापेटीत टाकलंय! माझी हत्या केलीय माझ्याच आई-वडिलांनी!
ते दिवस आठवलेत... बाबा 'भ्रूणकन्येचा टाहो' या विषयावर बोलताना
तासनतास भाषणे ठोकायचे अन वाह... वाह... मिळवायचे!
आई, तू स्वतः स्त्री, मग तुझेही काळीज कसे पाझरले नाही गं?
डाक्टर साहेब, आपण तर लोकांचे जीव वाचवता, पण आपणच कसे कसाई झालात?
... आजी नेहमी म्हणायची- '' मुलगा हा दीप असतो तर मुलगी दिव्यातील ज्योत...! ''
आजी, आज पुन्हा एकदा प्रकाशण्या आधीच ज्योत विझवली आहे!!!
- प्रविण बाबुलाल हटकर