Saturday, 23 November 2013

"मोठा दानशूर" 

हवे ते ते देत गेलो 
मागणा-यास मी,
घेणारही माझ्याकडून घेत गेला,
नी म्हणत गेला भाऊ दादा, आपण 
मदतीला धावून आलात अगदी 
युदीस्टीर वा  कर्णाप्रमाणे  … 

व मी नित्यनियमाने देत गेलो 
परतीची हमी न घेता 
माझ्याकडे असो व नसल्यास… 
नावावर कारण तसा मी नामवंत तर 
होतोच व धनवंत सुद्धा … 
देता देता पैसा अडका, 
एकदिवस 'नितीमुल्य व आत्मसन्मान' ही 
देऊन बसलो … 

आता माझ्याकडे देण्यासारखे काय ?
प्रश्न पडतोय ना ?
तो वेडापीर दिसतोय ना ?
फाटक्या नि कर्दमलेल्या वेशात 
त्याला कधीकाळी "मोठा दानशूर" म्हणायचे …
हो तोच मी "कफल्लक फकीर"… …  हा हा हा … 

-प्रवीण बाबूलाल हटकर. 

No comments:

Post a Comment