Thursday, 7 November 2013

यशप्राप्ती साठी, आत्मशक्ती जागा…

यश अपयश ! अर्थ हा सहज !
व्याप्तीत गरज ! उमजण्या !!

यश प्राप्ती होणे ! हा नाही शेवट !
ना आहे शेवट ! अपयशा !!

एका यशासाठी ! खुपदा हरतो !
अपयशी होतो ! लाखवेळा !!

बा… अपयशात ! वादळी उत्तरे !
प्रश्नाची भ्रमरे ! त्रास देती !!

बा… जोवर यश ! प्राप्त होत नाही !
गा… तोवर नाही ! मनशांती !! 

यशप्राप्ती होता ! अपयशी दोष !
मनातील रोष ! मिटतात  !!

अपयशी होता ! खचू नका तुम्ही !
हतबल तुम्ही ! नका होऊ !!

अपयश हाच ! बा… शेवट नाही !
राज्या अंत नाही ! प्रयत्नांचा !!

प्रयत्न जोवरी ! तोवरी संघर्ष !
शेवट निष्कर्ष ! बा… प्रयत्नी !!

प्रयत्नी निष्फळ ! अपयशी होतो !
फळप्राप्ती होता ! यशवंत…  !!

यशप्राप्ती साठी ! आत्मशक्ती जागा !
बा… विश्वासी जागा ! स्व: बळास !!

आपण हे करू ! स्व: विश्वास होता !
अपयश जाता ! दूरदूर !!

होता आत्मज्ञान ! आणि आत्मजान !
यशवंत मान ! हमखास !!

यश अपयशा ! सुख दुख मिळे !
जीवनाचे ताळे ! समजण्या !!


(अभंग … )
 -प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment