Wednesday, 6 November 2013

  माझी तू जाणीव, गजानना …


आंतर आवाज ! बा… प्राण सजीव !
माझी तू जाणीव ! गजानना !!

एकरूप चंद्र ! एकरूप सूर्य !
चांदण्या तू सर्व ! गजानना !!

सजीव निर्जीव ! श्रीमंत पामर !
तूच भू, अंबर ! गजानना !!

ज्ञान ब्रम्हरूप ! गा… माउली रूप !
बा… ब्रम्हांडरूप ! गजानना !!

तूच अभिमान ! तूच स्वाभिमान !
नाम समाधान ! गजानना !!

भक्तंचा वारसा ! समाज आरसा !
समर्थ बा… असा ! गजानना !!

मंत्र एकतेचा ! जोडलेया गण !
गणात जोडून ! गजानना !!

(अभंग…  )
-प्रवीण बाबूलाल हटकर  

No comments:

Post a Comment