शिकवणी मूळ, सहज सरळ …
सहजच डोकी ! उतरावी !!
नसावी कठीण ! बा… गुंतागुंतीची !
न उमजण्याची ! ती नसावी !!
कठीण समस्या ! सोपी शिकवण !
सहज गमन ! ज्ञात होई !!
सुगरण खोपा ! शिकवितो असे !
बा… जगावे कसे ! सहज हो !!
भाग खळकात ! फुलतो पळस !
शिक जीवनास ! नवी देतो !!
शिकवणी भाषा ! विषया धरून !
जायील वरून ! नाहीतर… !!
कमळ उमले ! चिखल जागेत !
सुंदर जगात ! एकमेव !!
बा… मुंगी लहान ! हो… शिक महान !
एक संघ छान ! कार्य करी !!
मार्ग हे कठीण ! सहज पद्धत !
उद्धिष्ट कामात ! सोपी होई !!
उद्दिष्ट माहिती ! आवश्यक आहे !
मग सोपे आहे ! जगणे हो !!
शिकवणी मूळ ! सहज सरळ !
आकाश नी तळ ! उमजेल !!
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment