मृत्यू नंतरही, विचार हे अमर..
.
मोठा धनवान ! आहे तू जगात !
वर मिजाशात ! वागणूक !!
नौकर चाकर ! घोडा गाडी आहे !
जे हवे ते आहे ! तुज पाशी !!
सारे काही केले ! काबीज जे हवे !
यात नाही नवे ! ऐक माझे !!
हिटलर आला ! जग जिंकलेया !
नाच जिकलेया ! मृत्यूस हो !!
धन नाते गोते ! येथेची राहिले !
सोबती ना गेले ! आप्तजन !!
व्यक्ती जातो मात्र ! राहती बा… शब्द !
ओळख प्रारब्ध ! कृतीतून !!
विद्वान आले व ! गेले अनंतात !
राहिले मुखात ! तै विचार !!
गा… विवेकानंद ! संत तुकडोजी !
गा… साने गुरुजी ! ख्यातनाम !!
तात्पर्य एव्हडे ! सांगायचे खास !
मृत्यू हा जीवास ! ना विचारा !!
विचार ओळख ! कृतीत अमर !
जीव नशवर ! जायील तो !!
प्रवीण विचार ! प्राधान्य विचारा !
बा… अमृतधारा ! जीवनास !!
धन आज आहे ! उद्या न माहिती !
विचाराची गती ! बा… अमर !!
मृत्यू नंतरही ! विचार हे अमर !
ना कधी पामर ! जो … विचारी !!
ज्याच्या कडे आहे ! विचारांचे अश्व !
बा… आदर विश्व ! त्याचा करी !!
(अभंग… )
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment