Monday, 18 November 2013

अनंत स्वरूप आहे, पांडुरंगा… 

पांडुरंग दरबारी ! जमलेया वारकरी !
बा… भजतोया अंतरी ! पांडुरंगा !!

पांडुरंग कोण आहे ! जीवनाचे सार आहे !
अंतरीची हाक आहे ! पांडुरंगा !!

पांडुरंग काय आहे ! कण ते ब्रम्हांड आहे !
अनंत स्वरूप आहे ! पांडुरंगा !!

आयुष्या गवसलेला ! पांडुरंग अर्थ आहे !
एकमेव सत्य आहे ! पांडुरंगा !!

पांडुरंग पांडुरंग ! गा समर्थ पांडुरंग !
बा… अमुचे  अंतरंग ! पांडुरंगा !!

(अभंग… )

- प्रवीण बाबूलाल हटकर. 

No comments:

Post a Comment