Monday, 17 February 2014

 कार्याविना शून्य…

कार्याविना शून्य ! कीर्ती तुझी आहे !
कीर्ती तुझी आहे ! बा… कार्यार्थी !!

कार्याविना गती ! कार्याविना शक्ती !
कार्याविना युक्ती ! व्यर्थ आहे !!

बा… तुझी ओळख ! सगुण निर्गुण !
बा… कार्य प्रमाण ! मापदंडे !!

हिटलर क्रूर ! बा… कृष्ण प्रेमळ !
एशु तळमळ ! बा… कार्यार्थी !!

जगी दिसे कार्य ! तो कार्यार्थी आहे !
क्रियाशील आहे ! खऱ्या अर्थी !!

शिवबा स्वराज्य ! बा… भीम घटना !
फुले शिक्षण ना ! कार्याविना !!

तुकाराम भक्ती ! हो गाडगे बाबा !
जनजागृती बा… ! कार्यामुळे !!

कार्य प्राप्तीसाठी ! कार्यशील व्हा !
गतिमान व्हा ! बा… कार्यार्थी  !! 

कार्याविना दिन ! माणसा तू आहे !
बा… कुबेर आहे ! जो कार्यार्थी !!

सद्कार्य उद्देश ! कीर्ती उचावेल !
कीर्ती खालावेल !कु- कार्यार्थी !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment