Tuesday, 20 November 2012

माझ्या नयनांचा तुझ्या नयनांशी
स्पर्श जसा नवा नवा

प्रीत गुलाबी पापण्यांना
तो स्पर्श नवा हवा हवा ....

गुलकंद वरून .......
प्रवीण हटकर. 
चित्त शुद्ध असो ...

चित्त शुद्ध असो ! आरशाप्रमाणे !
दावल्याप्रमाणे ! दिसावेत !!

नीती तुझी असो ! निर्मळ नी शुद्ध !
बा उद्देशबद्ध ! प्रमाणित !!

कडूलिंबामध्ये ! साखर एकत्र !
गुणधर्म मात्र ! कडू त्याचा !!

वचन ना द्यावे ! दिल्यास पाळावे !
नाच तू टाळावे ! बोलूनिया !!

वृत्ती समाधानी ! जगेल स्वानंदी !
बा... परमानंदी ! स्वर्ग सुख !!

विचारात स्पष्ट ! मांडण्या ना कष्ट !
विचार अस्पष्ट ! व्यर्थ सारे !!

कौशल्य प्रवीण ! कार्यात असावे !
उगाच नसावे ! टाळाटाळ !!

-प्रवीण बाबुलाल हटकर.

Monday, 19 November 2012

-गझल-

माणसाला जाणणारा कोण आहे?
काळजाला भावणारा कोण आहे?

वेध आहे जिंकण्याचे विश्व सारे;
कासवाला हरवणारा कोण आहे?

मीच वारा, मीच पाणी, मीच अग्नी;
मोल माझे लावणारा कोण आहे?

ह्या विजांना घेत अंगी तो म्हणाला
वादळाला पेलणारा कोण आहे?

एक आहे जात सार्या माणसांची
धर्म ऐसा पाळणारा कोण आहे .

गाव माझे, शहर माझे, विश्व माझे;
'पोरका' मज ठरवणारा कोण आहे?

 -प्रविण बाबुलाल हटकर.

पत्ता : मु. पो. ता. बार्शीटाकळी,
        अकोला.
मो: ८०५५२१३२८१ 
ब्लॉग : www.gulkand1.blogspot.com

Saturday, 17 November 2012

बाळा साहेब, तुम्ही का सोडून गेलात ... अख्या मराठी साम्राज्याला पोरक केलंय,
हिंदू हृदय सम्राट अता कुणास बोलू...

मराठीची आन ! मराठीची शान !
तू आशेच स्थान ! होता आम्हा !!

हिंदूचा तू आहे ! हृदय सम्राट !
का घेतली वाट ! बा... स्वर्गाची !!

मराठ्यांची ढाल ! मराठ्यांची शाल !
हिंदुत्व मशाल ! पेटविली !!

केलस पोरक ! मर्द-मराठ्यांना !
सांभाळावे त्यांना ! आज कसे !!

साहेब तुम्ही या ! परतुनी पुन्हा !
काय झाला गुन्हा ! माफी द्यावी !!

मराठ्यांचा वाघ ! मराठ्यांची मान !
तुझा अभिमान ! आम्हा सर्वा !

साहेब तोवर ! नाही आच आली !
मराठीचे वाली ! होता तुम्ही !!

खरा लढवय्या ! भोळ्या संस्कृतीचा !
तूची  मराठीचां ! रे "जनक" !!

बा... आदरांजली ! अतुल्य कार्यास !
मिळो ह्या आत्म्यास ! शांती शांती !!

-प्रवीण हटकर 

Monday, 12 November 2012

दिवाळीच्या आपनासर्वास व आपल्या परिवारास प्रेमळ शुभेच्छा...

सन दिवाळी...

सन दिवाळीचा !  आनंदाचा क्षण !
उत्साहिले मन ! संगे साई !!

बालिकेची हौस ! करू रोशनाई !
ही द्वारकामाई ! उजळूनी !!

बाबाही हसत ! होकार दाविला !
तेल आणण्याला ! सांगितले !!

बनियास केली ! तेलाची मागणी !
बोललीया वाणी ! बाबाचीया !!

तेल असुनिया ! नाही बोलला तो !
चीमुर्डीस जे तो ! हटकले !!

विनवण्या केल्या ! पायाही पडल्या !
कानास जोडल्या ! हात तिने !!

व्यर्थची प्रयत्न ! बालिका खचली !
अश्रूत नाहली ! नयनांत !!

सायंकाळ वेळ ! बाबास कळले !
जे जे तिथे झाले ! हकीकत !!

बालिकेचे डोळे ! बाबा पुसूनीया !
पाणीच टाकूया ! बोललेया !!

सगळे चकित ! होवुनी बोलले !
पाणीने लागले ! कोठे दिवे !!

बाबाचा आदेश ! सगळ्यांनी पाणी !
दिव्यात लाउनी ! पूर्ण केला !!

माचीसची काळी ! दिव्यास लाउनी !
जोत ती पेटुनी ! दावलीया !!
 
चमत्कार तुझा ! बघुनिया जन !
दंग झाले मन ! लीलावंता !!  

पाण्यावर दिवे ! बालिका हसली !
नाचली गायली ! आनंदाने !!

द्वारकामाईत ! झगमग दिवे !
जसे पक्षि थवे ! विसावले !!
  
द्वारकामाईत ! दिवाळीचा सन !
रे नंदनवन ! नेत्र दीपे !!

साई तुझी लिला ! रे अपरंपार !
भक्तास आधार ! संजीवन !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
 अकोला. 


Friday, 9 November 2012

महाराजानावर आधारित 'ब्रम्हांड नायक' ह्या मालिकेतील 'श्री' च्या भूमिकेत "वसंतदादा गोंगटे" व इतर सहकारी...

 गजानना ओढ ...

गजानना ओढ ! तुझ्या दर्शणाची !
कळी जीवनाची ! खुललीया !!

नको होऊ वृष्ट ! बाबा आम्हावर !
तुझीच लेकरं ! पितामहा !!

मूळ तू झाड तू ! फुल तू पान तू !
चराचरात तू ! दिगंबरा !!

पाठीवर हात ! ठेव सदोदित !
जीवन वा अंत ! तुझ्या लीन !!

विठ्ठल, गोस्वामी, ! भोलेनाथ झाला !
भक्तास पावला ! हाक देता !!

ब्रम्हांड नायक ! वसंता साकारे !
आनंदिले सारे ! रुपवंता !!

बाबा बाबा बाबा ! गजानन बाबा !
हाक देई बाबा ! तुझा भक्त !!

-प्रवीण बाबुलाल हटकर.
  अकोला .

Friday, 2 November 2012


 श्री हरी विठ्ठल...


श्री हरी विठ्ठल ! पांडुरंग हरी !
जय जय हरी ! पांडुरंगा !!

भक्त हाका देई ! मनातून राया !!
वासराला माया ! गाय देई !!

विठ्ठल नामात ! रंगतो, दंगतो !
जागतो, जाणतो ! भक्तीभाव !!

विठू तू विश्वास ! विठू तूच श्वास !
तुझा सहवास ! स्वर्गसुख !!

विठू तू समक्ष ! भक्तांसाठी दक्ष !
चरणी या मोक्ष ! लाभो आम्हा !!

प्रवीण जाहलो ! अनुभूती येता !
अहंकार जाता ! पांडुरंगा !!



-प्रवीण बाबूलाल हटकर 



अभंग...

गजानन माऊली ! माऊली माऊली तू !
प्रेमळ सावली तू ! ममतेची !!

विना आग चिलीम ! पेटवून दाविसी !
दंगला कौतुकासी ! भक्त मेळां !!

तू ब्रम्हांड नायक ! तूच भाग्यविधाता !
तू मात-पिता-दाता ! तुज नमो !!

बाबा तुझिया लीला ! तू जागसी, जाणसी !
गण गण जोडसी ! एकतेने !!

अन्न हे पूर्णब्रम्ह ! खाऊनी उष्टे अन्न !
सांगितलेया गण ! तै महत्त्व !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
 पंढरीच्या देवा...
  अभंग...

पंढरीच्या देवा ! दे मज दर्शन !
नयन दर्पण ! दिपलेया !!

संकट समयी ! करी भक्त हाका !
रक्षणासी नौका ! आणलिया !!

पांडुरंग देवा ! पांडुरंग हरी !
आजन्म अंतरी ! ध्यास तुझा !!

न मोह, न माया ! ना कुठली काया !
हवी तुझी छाया ! विठूराया !

पाप-पुण्य काय ! काय जन्म-मृत्यू !
अर्पण परंतु ! तुज राया !

प्रवीण जगतो! ज्योत होऊनिया!
नाम स्मरूनिया ! विठूराया!!

 -प्रवीण(डेबुजी) हटकर.
संत येती जगी...
      अभंग...
 
संत येती जगी ! मार्ग दाखवाया !
सत्य कर्म व्हाया ! कार्यातुनी !!
ब्रम्हांड नायक ! प्रकटले जगी !
गजानन योगी ! कल्याणासी !!
बाबा शिकविती! एकतेचा सार!
माणूस आधार! माणसाचा!!
भेदभाव, वर्ण ! हे सारेच थिटे !
जया अंगी दाटे ! माणुसकी !!
धर्म तोची खरा ! माणूस उद्धार !
माणूस विचार ! जो नेमिला !!

प्रवीण नमतो! संतांच्या चरणी!
ठेवूनी स्मरणी! कार्य तया!!
-प्रवीण बाबुलाल हटकर.
नाम तुझे घेता..
 
अभंग...
नाम तुझे घेता ! आसमंत झाला !
सुखे वर्षावला ! गजानना !!
मी शूद्र तुझ्यात ! पाही विठूराया !
विठ्ठलासी काया ! तू रुपिली !!
गजानन बाबा ! तुझी अनुभूती !
शेगाव जाणती ! स्वर्गापरी !!
प्रेमळ माऊली ! तुझ्यात गावली !
मायेची सावली ! देई आम्हा !!
प्रवीण जाणतो ! शेगावी जो जातो !
स्वानंद हर्षितो ! मनोमनी !!
          प्रवीण(डेबुजी) हटकर
प्रवीण नमतो ...
अभंग...
धावुनीया आला ! संकटासी राणा !
देवा गजानना ! कृपावंता !!
माऊली जगासी ! प्रेम अर्पियले !
प्रेम जागविले ! अंतरंगी !!
  
शेगाव पंढरी ! काशी-स्वर्गापरी !
 एकटा कैवारी ! गजानना !!
 
उद्धार मानवा ! होण्या प्रकटले !
मना झटकले ! भेदभाव !!
प्रवीण नमतो ! पूजितो, भजतो !
अखंड स्मरतो ! गजानन !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
पांडुरंग पांडुरंग ...
              अभंग...
पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग !
सुखाविले मन स्वर्ग ! दर्शनाने !!
पांडुरंग पांडुरंग ! नाद मनी गुंजतोय !
स्पंदनात विरतोय ! भाव  नवा !!
पांडुरंग पांडुरंग ! युगे उभा विटेवरी !
भक्त पुंडलिका करी ! विनवणी !!
पांडुरंग पांडुरंग ! पुंडलिक झाला दंग !
आई-बाबा सेवा-रंग! रंगुनिया !
पांडुरंग पांडुरंग ! प्रवीण अंतरी जागा !
आई-बाबा सेवा त्रागा  ! नका करू  !!

-प्रवीण(डेबुजी)हटकर.
रूप विठ्ठलाई ...
अभंग...

हे देवाधिदेवा ! तुझ्या दर्शनाला ! 
चाले पंढरीला ! वारकरी !!
टाळ वाजवूनी! नाम जय घोष!
मनी नाही रोष! बा...विठ्ठला!!
ढोल आणि ताशे ! वाजवी मृदुंग !
एकरूप दंग ! भक्त झाले !!
विठ्ठल रूख्माई ! बाबा आणि आई !
रूप विठ्ठलाई ! आम्हा दिसे !!
भक्तासाठी उभा ! युगे  अठ्ठावीस!
साल, रात्रंदिस ! चाललीत !!
प्रवीण पुजतो! प्रवीण रंगतो!
प्रवीण दंगतो!  विठू नाम !!
  -प्रवीण बाबूलाल हटकर.
गजानन बाबा...
अभंग...

गजानन बाबा! स्वामी गजानन!
रे नंदनवन! रूप तुझे!!

कण ते ब्रम्हांड ! आहे बा.. तुझ्यात !
जाणिले माझ्यात ! अंश तुझा !!

श्री गजाननासी! भक्ती अर्पियली!
ज्योत जागविली ! भावपूर्ण !!

जोडीयले जन! मंत्र  गण-गण!
गणात  बोलून! उद्धारीले !!

प्रवीण चालतो ! बाबा तुझा मार्ग!
 सद्कार्यात स्वर्ग!! गवसला !!
प्रवीण(डेबुजी) हटकर.
विठू तूच माझा ...
अभंग...
विठू तूच माझा! सखा जीवलग!
आहे नातलग! अंतरीचा!

तुझ्या दर्शनाला! येती वारकरी!
पायदळ वारी ! करुनीया !!

विटेवरी उभा ! हात कमरेत !
तेज नजरेत ! माऊलीच्या !!

ममतेची मूर्ती ! वात्सल्याची काया !
भक्तावरी माया ! सदोदित !!

विठ्ठल विठ्ठल ! हरी पांडुरंग!
तन-मन रंग ! अर्पियले !!

प्रवीण विठ्ठल ! स्मरोनी पुजतो !
अंतरी जागतो ! दिव्य भाव !!
 प्रवीण(डेबुजी) हटकर.

भक्तीरस ...
 अभंग
विठ्ठल माऊली ! सावली मायेची !
माऊली जगाची ! पांडुरंगा !!

बाबा तुझ्या  भेटी ! रे शेगावीहून !
आलाय घेऊन ! भक्तीरस !!

पालखी निघाली ! गावागावांतून !
घोष मनातून ! नाम विठू !!

पंढरपूरला ! भक्त गोतावळा !
रंगतोय मळा ! भावपूर्ण !!

गजानन बाबा ! भेटता विठूला !
अवघ्या जगाला ! आनंदिले !!

प्रवीण जाणतो ! सार्थक जहाले !
जीवन वाहिले ! तुझ्या ठायी !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.

धाव विठू देवा...
अभंग...

धाव विठू देवा ! विठू देवा धाव !
संकटात पाव ! आज भक्ता !!

मी रे वारकरी ! पंढरी निघालो !
गावोगाव आलो ! फिरूनिया !!

न तमा आम्हाला ! कुण्या वादळाची !
तुझ्या दर्शनाची ! आर्त ओढ !!

विठ्ठल विठ्ठल ! मंत्र  जपूनिया !!
गेले दंगूनिया ! वारकरी !!

सुखावतो तुझ्या! सावळ्या रंगात !
जगतो नामात ! विठूराया !!

प्रवीण जाहलो ! भक्ती सागरात !!
नाद स्पंदनांत  ! तुझा देवा !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.
अंतरंग ...
अभंग...

पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग!
जीवनाला सप्तरंग ! लाभलेया !!

दर्शनाची तळमळ ! वारकरी धावपळ !
भाव अंतरी निर्मळ ! प्रसवले !!

विठू मज दिसतोय! गालामध्ये हसतोय!
नजरेला दावतोय! दिव्य रूप !!

विठ्ठल नामात दंग! प्रवीण रचे अभंग!
उधळून अंतरंग! चराचरी !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

"भक्तीगाथा"  ...
अभंग...

विठू माझा गुरु ! ज्ञान कल्पतरू !
वाटचाल सुरु ! ज्ञानदायी !!

विठू सुखकर्ता !विठू विघ्नहर्ता !
तै नाम स्मरता ! सुखावलो !!

विठ्ठल विठ्ठल! हुंकार अंतरी !
नादतो अंबरी ! भक्तीभाव !!

विठ्ठल भजावा ! होऊन निर्माल्य!
होईल साफल्य ! आयुष्याचे !!

विठ्ठल चरणी ! जाऊन शरण !
लिहितो प्रवीण ! 'भक्तीगाथा' !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
अभंग...

देवा गजानना! गुरु गजानना!
प्रगटूनी जना! उद्धारिले!!

वेश अवलिया! दिव्यसा चेहरा!
प्रेमरूपी झरा! अंतरीला!!

नासाग्रसी बुद्धी ! आचरण शुद्धी !
विचार समृद्धी ! तुझ्या ठायी !!

अन्न पूर्ण ब्रम्ह:! सांगून महत्व!
पाळूनिया तत्व! सुखी जो तो!!

एक एक गण! गणात बोवूनी!
भजन गाऊनी! दंग होऊ!!

तुझ्यात आनंद! अंतरी स्वानंद!
बा... परमानंद! मिळे आम्हा!!

जाणतो प्रवीण! बाबा तुझा मार्ग!
एक धर्म स्वर्ग! एकतेचा!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
विठ्ठल विठ्ठल...
अभंग...
पंढरीचा विठू ! सांगतोय ऐका !
गर्व होता...  नौका ! डुबलीया !!

जै भाव निर्मळ ! भक्ती परीमळ !
तै वास प्रेमळ ! विठू तुझा !!

पांडुरंग भक्ती  ! वारकरी दंग !
चढे भक्ती रंग ! अस्तित्वाला !!

पांडुरंग हरी ! विठ्ठल विठ्ठल !
स्मरुया विठ्ठल ! एकनाम !!


-प्रवीण(डेबुजी) हटकर
ज्ञान तूच बाबा ...
अभंग...

ज्ञान तूच बाबा ! शक्ती तूच बाबा !
ज्ञानवंत बाबा ! शक्तीवंत !!

रूप अवलिया ! नासाग्रसी बुद्धी !
प्राप्त तुज सिद्धी ! ज्ञान ब्रम्हा !!

तूच माझा दाता ! स्वामी तू विधाता !
जगी कर्ता-धर्ता ! गजानना !!

नर्मदेस हाका ! देवी प्रकटली !
नौका ही रक्षली ! भक्तांसंगे  !!


स्नानोत्तर पाणी  ! अंगास लावून !
कुष्ठरोगी गण ! बरा झाला !!

प्रवीण पामर ! तुझ्या भक्तीविन !
तुझ्या भक्ती लीन ! कुबेर मी !!

 -प्रवीण(डेबुजी) हटकर.

...अभंग...
विठूराया उभा...
विठ्ठल माऊली ! नामात गावली !
प्रेमळ सावली ! विसावितो !!

विठूराया उभा ! घेऊनिया ढाबा !
भजताच ताबा ! मिळे भक्ता !!

विठ्ठल विठ्ठल ! पांडुरंग हरी !
भजूनी अंतरी ! सुखावितो !!

जयघोष नाम ! वारकरी दंग !
चढतोया रंग ! भक्ती रंगा !!

आलोया शरण ! भिजल्या अंतरी !
स्पंदन अंबरी ! मुरलेया !!


निर्मळ, कोमल ! स्वच्छंदी स्वभाव !
 भक्तांमध्ये भाव ! तुज हवा !!
       -प्रवीण(डेबुजी) हटकर.
अवलिया जगी...

अवलिया जगी ! रूप गजानन !
लिला दाखवून ! दंग गण !!

महाराष्ट्र भूमी ! संतांची नगरी !
विदर्भ आगरी ! गजानन !!

स्वामिवंत स्वामी ! गजानन स्वामी !
चारीधाम स्वामी ! तू ... दिधला !!

रोपट्याला मूळ ! मुळास  या पाणी !
आम्हा तुझी वाणी ! संजीवनी  !!

चंद्र-किरणाला ! चातक आसक्ती ! 
भक्ताचिया भक्ती ! तुझ्या ठायी !!

भोळे रूप कधी ! कधी तू कठोर !
लिला तुझी थोर ! लिलावंता !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
            अकोला
मोब: ८०५५२१३२८१