नाम तुझे घेता..
अभंग...
नाम तुझे घेता ! आसमंत झाला !
सुखे वर्षावला ! गजानना !!
मी शूद्र तुझ्यात ! पाही विठूराया !
विठ्ठलासी काया ! तू रुपिली !!
गजानन बाबा ! तुझी अनुभूती !
शेगाव जाणती ! स्वर्गापरी !!
प्रेमळ माऊली ! तुझ्यात गावली !
मायेची सावली ! देई आम्हा !!
प्रवीण जाणतो ! शेगावी जो जातो !
स्वानंद हर्षितो ! मनोमनी !!
No comments:
Post a Comment