पांडुरंग पांडुरंग ...
अभंग...
पांडुरंग पांडुरंग ! प्रवीण अंतरी जागा !
आई-बाबा सेवा त्रागा ! नका करू !!
-प्रवीण(डेबुजी)हटकर.
अभंग...
पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग !
सुखाविले मन स्वर्ग ! दर्शनाने !!
पांडुरंग पांडुरंग ! नाद मनी गुंजतोय !
स्पंदनात विरतोय ! भाव नवा !!
पांडुरंग पांडुरंग ! युगे उभा विटेवरी !
भक्त पुंडलिका करी ! विनवणी !!
पांडुरंग पांडुरंग ! पुंडलिक झाला दंग !
आई-बाबा सेवा-रंग! रंगुनिया !
आई-बाबा सेवा त्रागा ! नका करू !!
-प्रवीण(डेबुजी)हटकर.
No comments:
Post a Comment