Monday, 12 November 2012

दिवाळीच्या आपनासर्वास व आपल्या परिवारास प्रेमळ शुभेच्छा...

सन दिवाळी...

सन दिवाळीचा !  आनंदाचा क्षण !
उत्साहिले मन ! संगे साई !!

बालिकेची हौस ! करू रोशनाई !
ही द्वारकामाई ! उजळूनी !!

बाबाही हसत ! होकार दाविला !
तेल आणण्याला ! सांगितले !!

बनियास केली ! तेलाची मागणी !
बोललीया वाणी ! बाबाचीया !!

तेल असुनिया ! नाही बोलला तो !
चीमुर्डीस जे तो ! हटकले !!

विनवण्या केल्या ! पायाही पडल्या !
कानास जोडल्या ! हात तिने !!

व्यर्थची प्रयत्न ! बालिका खचली !
अश्रूत नाहली ! नयनांत !!

सायंकाळ वेळ ! बाबास कळले !
जे जे तिथे झाले ! हकीकत !!

बालिकेचे डोळे ! बाबा पुसूनीया !
पाणीच टाकूया ! बोललेया !!

सगळे चकित ! होवुनी बोलले !
पाणीने लागले ! कोठे दिवे !!

बाबाचा आदेश ! सगळ्यांनी पाणी !
दिव्यात लाउनी ! पूर्ण केला !!

माचीसची काळी ! दिव्यास लाउनी !
जोत ती पेटुनी ! दावलीया !!
 
चमत्कार तुझा ! बघुनिया जन !
दंग झाले मन ! लीलावंता !!  

पाण्यावर दिवे ! बालिका हसली !
नाचली गायली ! आनंदाने !!

द्वारकामाईत ! झगमग दिवे !
जसे पक्षि थवे ! विसावले !!
  
द्वारकामाईत ! दिवाळीचा सन !
रे नंदनवन ! नेत्र दीपे !!

साई तुझी लिला ! रे अपरंपार !
भक्तास आधार ! संजीवन !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
 अकोला. 


No comments:

Post a Comment