प्रवीण नमतो ...
अभंग...
अभंग...
धावुनीया आला ! संकटासी राणा !
देवा गजानना ! कृपावंता !!
माऊली जगासी ! प्रेम अर्पियले !
प्रेम जागविले ! अंतरंगी !!
शेगाव पंढरी ! काशी-स्वर्गापरी !
एकटा कैवारी ! गजानना !!
उद्धार मानवा ! होण्या प्रकटले !
मना झटकले ! भेदभाव !!
प्रवीण नमतो ! पूजितो, भजतो !
अखंड स्मरतो ! गजानन !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
No comments:
Post a Comment