संत येती जगी...
अभंग...
संत येती जगी ! मार्ग दाखवाया !
सत्य कर्म व्हाया ! कार्यातुनी !!
ब्रम्हांड नायक ! प्रकटले जगी !
गजानन योगी ! कल्याणासी !!
बाबा शिकविती! एकतेचा सार!
माणूस आधार! माणसाचा!!
भेदभाव, वर्ण ! हे सारेच थिटे !
जया अंगी दाटे ! माणुसकी !!
धर्म तोची खरा ! माणूस उद्धार !
माणूस विचार ! जो नेमिला !!
प्रवीण नमतो! संतांच्या चरणी!
ठेवूनी स्मरणी! कार्य तया!!
-प्रवीण बाबुलाल हटकर.
No comments:
Post a Comment