विठू तूच माझा ...
अभंग...
विठू तूच माझा! सखा जीवलग!
आहे नातलग! अंतरीचा!
तुझ्या दर्शनाला! येती वारकरी!
पायदळ वारी ! करुनीया !!
विटेवरी उभा ! हात कमरेत !
तेज नजरेत ! माऊलीच्या !!
ममतेची मूर्ती ! वात्सल्याची काया !
भक्तावरी माया ! सदोदित !!
विठ्ठल विठ्ठल ! हरी पांडुरंग!
तन-मन रंग ! अर्पियले !!
प्रवीण विठ्ठल ! स्मरोनी पुजतो !
अंतरी जागतो ! दिव्य भाव !!
प्रवीण(डेबुजी) हटकर.
अभंग...
विठू तूच माझा! सखा जीवलग!
आहे नातलग! अंतरीचा!
तुझ्या दर्शनाला! येती वारकरी!
पायदळ वारी ! करुनीया !!
विटेवरी उभा ! हात कमरेत !
तेज नजरेत ! माऊलीच्या !!
ममतेची मूर्ती ! वात्सल्याची काया !
भक्तावरी माया ! सदोदित !!
विठ्ठल विठ्ठल ! हरी पांडुरंग!
तन-मन रंग ! अर्पियले !!
प्रवीण विठ्ठल ! स्मरोनी पुजतो !
अंतरी जागतो ! दिव्य भाव !!
प्रवीण(डेबुजी) हटकर.
No comments:
Post a Comment