Tuesday, 20 November 2012

चित्त शुद्ध असो ...

चित्त शुद्ध असो ! आरशाप्रमाणे !
दावल्याप्रमाणे ! दिसावेत !!

नीती तुझी असो ! निर्मळ नी शुद्ध !
बा उद्देशबद्ध ! प्रमाणित !!

कडूलिंबामध्ये ! साखर एकत्र !
गुणधर्म मात्र ! कडू त्याचा !!

वचन ना द्यावे ! दिल्यास पाळावे !
नाच तू टाळावे ! बोलूनिया !!

वृत्ती समाधानी ! जगेल स्वानंदी !
बा... परमानंदी ! स्वर्ग सुख !!

विचारात स्पष्ट ! मांडण्या ना कष्ट !
विचार अस्पष्ट ! व्यर्थ सारे !!

कौशल्य प्रवीण ! कार्यात असावे !
उगाच नसावे ! टाळाटाळ !!

-प्रवीण बाबुलाल हटकर.

No comments:

Post a Comment