Wednesday, 24 April 2013

 गा… क्रांती आणि उत्क्रांती…



              -अभंग-



गा… क्रांती आणि उत्क्रांती ! फरकास समजूया !
ज्ञानासी भर घालूया ! बा… सुयोग्य !!

क्रांतीमध्ये जसा होतो ! बा… शीग्रतेने बदल !
परीस्तिथीत बदल ! घडतोया !!

ब्रिटीशी हुकुमशाही ! कायापालट करून !
लोकशाही रुजवून ! क्रांती केली !!

बा… हरितक्रांती पहा ! पारंपारिक सोडून !
अत्याधुनिक आणून ! शेती केली !!

आधुनिक तंत्रज्ञान ! बा अत्याधुनिक क्रांती !
आज विश्वरूपी क्रांती ! जाणलीया !!

बा उत्क्रांतीत बदल ! टप्प्या-टप्याने होतोया !
नी सातत्याने होतोया ! हळूहळू !!

मानवाच्या उत्क्रांतीत ! टप्या-टप्प्याने बदल !
बा… सातत्याने बदल !! घडलाय !!

राहणीमान बदल ! बोलण्या वागण्यात !
खाण्यात, बुद्धिमत्तेत ! बदलला !!

रानटी अवस्तेतून ! बा… आधुनिक स्वीकार !
हा उत्क्रांतीचा प्रकार ! युगातून  !!

क्रांतीचा बदल आहे ! तत्काळ नि शिग्रपणे !
बा… उत्क्रांती सातत्याने ! हळू-हळू !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

Friday, 19 April 2013


श्री. राम नवमीच्या समस्त भक्त गणास प्रेमळ भक्तिमय  शुभेच्छा …

अभंग …

हे राम श्री राम ! जय जय राम !
मुखी तुझे नाम ! सदोदित !!

दशरथ पुत्र ! अयोध्या नरेश !
तुझ्या ठाई शिश ! राम नाम !!

भक्त हनुमान ! हृदयात वास !
गा… हरेक श्वास ! तुझे नाम !!

लोकराजा आम्हा ! पुरषोत्तम राम !
देवा चारीधाम ! तुझं नमो !!

सितामाता तुझी ! जीवन संगिनी !
जीव-संजीवनी ! तुझं  नमो !!

स्वयंवर वेळी ! धनुष्य तोडीला !
जनक पुत्रीला ! वैवाहिले !!

तोडूनी धनुष्य ! अहम तुटला !
अनुभव आला ! परशुरामा !!

सन्मान देऊन ! पिता आदेशास !
केला वनवास  ! चौदा वर्ष !!

भरतास दिले ! राज्य कारभार !
शत्रुघ्न आधार ! मदतीला !!

वनवास केला ! लक्षमणा संगे !
सीतामाता संगे ! वणवण !!

श्री राम भक्तिनी ! शबरी भेटुनी !
दर्शन देऊनी ! धन्य केले !!

उष्ट बोर खात ! देऊनिया मोक्ष !
माता सीता साक्ष ! दिव्यक्षणी !! 

श्रुर्पनखा आली ! भेस बदलूनी !
रामास मोहिनी ! घालावया !!

लक्ष्मनाणे केले ! प्रहार नाकास !
परतुनी खास ! पाठविले !!

रावणाने सारे ! ऐकुनी कहाणी !
 पुष्पक विमानी ! धाव केली !!

कट रचुनिया ! माता पळविले !
वाटिकेत केले ! बंदिवान !!

सूड घेण्यासाठी ! राम नी लक्ष्मण !
संगे हनुमान ! लंका आले !!

बाली पुत्र संगे ! अंगद मदती !
विभीषण अंती ! मदतीस !!

रावण गर्वास ! हरण करून !
यायचे करून ! कट केला !!

मारोती उड्डाण ! वाटीकेस गेले !
जाळूनिया केले ! अर्धे भस्म !!

युद्धाची हि अता ! सुरवात आहे !
भयभीत पाहे ! रावण हो !!

महाकाय काल ! कुंभकर्णा यास !
यमसदनास ! पाठविले !!

बा…  लंका नरेश ! पुत्र महावीर !
अक्षयकुमार ! युद्धास हो !!

लक्ष्मण-अक्षय ! युद्धास प्रारंभ !
बाण अंदाधुंद ! वर्षाविले !!

अक्षय अखेरी ! युद्धात मारला !
दुख रावणाला ! फार झाले !!

पती वियोगात ! अक्षयची पत्नी !
बा… यमसदनी ! तीही गेली !!

अखेरी रावण ! महाकाय दैत्य !
दहामुखी दैत्य ! रणांगणी !!

घेत महाकाय ! अवतार पहा !
सूर्यास झाकला ! रावणाने !!

महा शक्तिशाली ! बुद्धिवंत दैत्य !
रावण हा सुप्त ! गुणी होता !!

श्रीरामचंद्राने ! बाणास सोडीले !
मुखास हो केले ! क्षतिग्रस्त !!

पुन्हा मुख जुडे ! आच्चारीले सारे !
विभीषण बरे ! सांगितले !!

नाभीमध्ये आहे ! जीवनअमृत !
मारताच मृत ! होयील हो !!

मारुनिया बाण ! रावणाचा वध  !
करुनी सावध ! दैत्यास हो !!

वनवास पूर्ण ! करुनिया आले !
दशरथ केले ! सन्मान हो !!

बा… अग्नी  परीक्षा ! सितामाता देत !
जनतेस देत ! विश्वास हो !!

हे राम श्री राम ! जय सीताराम !
जय जय राम ! नमो नम: !!

प्रवीण धन्यतो ! श्री राम चरिता !
अभंग करिता ! सादर हो !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
अकोला
मो : ८० ५५ २१३ २८१ 

Thursday, 18 April 2013

ज्ञय नी अज्ञय…

ज्ञय नी अज्ञय ! अर्थ हा जाणुया !
सहज होऊया ! ज्ञानदीप !!

बा… ज्ञय म्हणजे ! जाणीव तयाची !
समज जयाची ! जाणलेली !!

गा… ज्ञय माहिती  ! संपूर्णता आहे !
नी … ठळक आहे ! स्पष्टरूप !!

जे… जाणले आहे ! किती ? न माहिती !
अज्ञयाची व्याप्ती ! अखंडित !!

समुद्र हा ज्ञय ! तै पाणी अज्ञय !
हवाही अज्ञय ! दिसण्यास !!

अज्ञय ब्रम्हांड ! अज्ञय आकाश !
हा सूर्य प्रकाश ! बा… अज्ञय !!

अज्ञय जाणतो ! किती न माहिती !
बा ज्ञय माहिती ! किती आहे !!

विठू आम्हा ज्ञय ! परिचित आहे !
तया 'वास' आहे ! बा… अज्ञय !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 15 April 2013

                                                                                                                           तारीख :

प्रती ,

मा. प्रकाशक साहेब,
लोकसंस्कृती प्रकाशन,
नारायणगाव.
                                     यांना सस्नेह पूर्वक नमस्कार
महोदय,
               पुस्तक प्रकाशन संदर्भात आपल्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यानुसार आपणाकडे माझा अभंग संग्रह पाठवीत आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या योजनांद्वारे  माझ्या अभंग संग्रहाचा पुस्तक प्रकाशनाकरिता विचार करावा . अशी विनंती करतो
               कृपया संग्रहाची नोंद असावी.  सहकार्य अपेक्षित.
                                                                                                                 
                                                                                                                         आपला विश्वासू



पूर्ण नाव : प्रवीण उर्फ डेबुजी बाबूलाल हटकर
पत्ता        : बी अन्ड सी क्वार्टर,
                मु. पो. ता. बार्शीटाकळी       
                जिल्हा - अकोला
                पिन कोड : ४४४४०१
मो         : ८० ५५ २१३ २८१          



माणूस कसला … 

किती येथे आले
निघुनिया गेले !
माणूस जाणले
नाम रुपी !!

मी मोठा नाही
मी नाही विद्वान !
नाहीच अजान
मतीमंद !!

नीती काय बोले
ऐका बांधवानो !
माझ्या आपल्यानो
लाडक्यानो !!

माणूस कसला
मुके माणुसकी !
जपे माणुसकी
तोची खरा !!

वेळ आली पहा
आत्मिक ज्ञानाची !
कळी जीवनाची  
बा फुलाया !!
- प्रवीण बाबूलाल हटकर .                  

हसऱ्या क्षणास… 

हसऱ्या क्षणास! लाख तू जगाला!
हसता हसला! जगताना!!

जगता जगता! क्षितीज गाठले!
स्वानंद जगले! मनी-तुझ्या!!

तिन्ही लोकी झाले! नाम तुझे असे!
ब्रम्हांड्च जसे! कान झाले!!

तू... हसत आहे! अजूनही तसा!
कल्पतरू जसा! मिळालेला!!

काल भेटायला! वादळ वणवा!
घेवूनी फतवा! आले होते!

नि... म्हणाले तुला! साडे साती आहे!
दुख आता आहे! भाळी तुझ्या !!

तू पण भोळाच! रीतीने बोलला!
दुध ना चहाला! काळा ठेऊ!!  

ते चिडलेत नि! वादळले  सुद्धा!
तू... रे...भाऊ दादा! बोलला त्या!!

ते पुन्हा म्हणाले! त्रास देण्या आलो!
मूर्ख नाही झालो! कळते का!!

तू स्मित हसला! नि त्यासी बोलला!
बोलता वागला! नम्रतेने!

हे सद गृहसता! आठ-चार दिस!
राहा.. गरिबास...! तोची मान!!

असे म्हणताच! वादळ वणवा!
फाडूनी फतवा! हसलेत!!

नि बोललेत त्या! आहेस तू कोण!
 भीतीची न जाण! का? तुजला!!

भीती काय आहे! मज ना माहित!
दुख ना माहित! हे महंत!!

घाबरू नकोस! मी पाठीशी आहे!
तुझ्या... बोल आहे! गुरुचे हे!!

मग का घाबरू! मागे दत्त गुरु!
का उगा घाबरू! सांगा तुम्ही!!

असे ऐकताच! वादळ वणवा!
शांत झाले.. बाबा! नाम घेता!!

लाख दुख आले! संकटे हि आले!
उलटे पळाले! नाम घेता!

श्री स्वामी समर्थ! नाम मी पूजित ! 
दर्शन घडीत! कार्यातुनी!!

समर्था पुजूनी! सद्कार्य तू  कर!
नाही तुला डर! कुठलाही!!

स्वामी देई तुला! भर भरुनी घे!
कार्यास तुझ्या घे! उंच झेप!!

प्रवीण समर्थ! करुनी कार्यास!
पूजिले कर्मास! भक्ती भावे!

समर्थ समर्थ! पूजिले समर्था!
सत्यार्थ  कर्मार्था! जाणुनिया!!

वादळ वनवे! दुख नि संकटे!
नाम घेता पिटे! समर्थांचे !!

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

विचारांचे रोप, अंतरी लावून… 


विचारांचे चक्र! फिरुनी अंतरी!
घुटमळ तरी! मनात का!!

विचार उलटे!  विचार फुलटे!
विचार पलटे! ऐन वेळी!!

विचार ऐकुणी! विचार बोलती!
पाठपुरावा... ती! नाच करी!!

विचार करावा! सुयोग्य निर्मळ!
असावा प्रेमळ! भाव त्याचा!

विचारांचे  पार्श्व ! आकलन विश्व !
धावतोय अश्व ! सदाचारी !!

विचार सामर्थ्य! विचार कर्मार्थ!
व्हावे परमार्थ! विचारांत!!

विचार तू कर! विचार करुनी!
विचार मांडुनी! तू जगावे!!

विचारांचे रोप! अंतरी लावून!
वैश्विक होवून!  तू फुलावे!!
 
विचारी तू व्हावे! त्यावर जगावे!
व्यर्थ नाच द्यावे!  प्रवचन!!

प्रवीण विचार! आचार प्रचार!
व्हावा सदाचार! कृतीतुनी!!

- प्रवीण बाबूलाल हटकर 

अभंग... 
 
विठ्ठल हसला! 'मुक्त' आसमंता!
पाखरे उडता! स्वानंदली!!
  
विठ्ठल धावला! भक्ता संकटात!
केले दोन हात! रक्षणासी!!

विठ्ठल बोलला! सत्य तुझा धर्म!
सत्य तुझे कर्म! तू जपावे!!

विठ्ठल दिसला! मज मानवात!
सेवा दिनरात! अर्पियली!!

विठू तुझा हात! राहो आम्हा पाठी!
नि जगण्यासाठी! ध्यास तुझा!!

प्रवीण रे दंग! रचुनी अभंग!
तन मन रंग! आनंदिले !!

- प्रवीण बाबूलाल हटकर . 
एक आला आहे, दिवस उनाड… 


एक आला आहे! दिवस उनाड!
स्वताच लबाड! बनायचं!

मज्जाच करावी! हल्ला कल्ला करू!

पाखरास धरू! उडणाऱ्या!

खोड्या चल करू! आरोळ्या मारुया!

छेडूनी धावूया! वाटसरू!

रानात जावूया! झाडात शोधूया!

वाकोल्या दावूया! पूर्वजास!

पतंगी बसुया! गिरक्या मारुया!

गरुडा करूया! अचंबित!

सरता सरता! दिवस सरला!

अर्थ हा कळला! जीवनाचा!

आयुष्य जगूया! आयुष्या रंगुया!

आयुषी रमूया! स्वच्छंदीत!

प्रवीण सांगतो! आयुष्य सुंदर!

आयुष्य आदर! तुम्ही करा!

- प्रवीण बाबूलाल हटकर. 
मी देव मनाचा… 

मी देव मनाचा ! मनासी पुजतो !
मनासी भेटतो ! मनरूपी !!

मनशास्र काय ! जाणूनिया घे तू !
मनाने जप तू ! मन सारी !!

खेळता मनासी ! तो कोठे जिंकला !
लाखदा हरला ! तो बिचारा !!

मन काय आहे ! 
काय याची भाषा !
शोधे उगी दिशा ! चोहीकडे !!

प्रवीण सांगतो ! मन आहे आत्मा !
मन परमात्मा ! तल्लीन हो !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 
पैसा पैसा ....

पैसा नाही मोठा! पैसा नाही छोटा!
पैशासाठी खोटा! बोले जो-तो!!

पैसा म्हणे बोले! पैसा म्हणे चाले!
पैशा संगे डोले! आज जो-तो!

पैसा झाली माय! पैसा झाला बाप!
गरोड्याचा साप! डोले जो-तो!!

पैसा माझा धर्म! पैसा माझे कर्म!
ओळखले मर्म! पैशामुळे!!

नाव गंगाराम! फिरे चारी धाम!
तुझ्यावीण काम! कोण करी!!

मी डाकू लुटेरा! हाती चाकू सुरा!
पैसा चोरणारा! तुम्हा प्यारा!

सत्ता माझ्या हाती! मोठी आहे छाती
पैशामुळे ख्याती! झुके जो-तो!!

मन नाही  मला! आत्मा नाही मला!
खर सांगू तुला! मी ईश्वर!!

जो पूजेल आज! डोक्यावर साज!
करील तो राज! मायारूपी!

प्रवीण का स्तब्ध! टाळतोय शब्द!
पैसाच प्रारब्ध! बोलूनिया!!

- प्रवीण बाबूलाल हटकर 


बारा जोतिर्लिंग दर्शन...
 
आद्य नमन हे ! भोले तुझ्या मुला!
श्री गणेशा तुला ! नमो नमा: !!

देवा सोमनाथा ! श्री केदारनाथा !
भोले वैद्यनाथा !  नमो नमा: !!

शिव नागेश्वरा ! महाकालेश्वरा !
शंभू घृष्णेश्वरा !  नमो नमा: !!

मल्लिकाअर्जुन! भोले रामेश्वरा !
श्री त्रंब्यकेश्वरा !  नमो नमा: !!

देवा भिमेश्वरा ! श्री ओम्कारेश्वरा !
दयाळू विश्वेश्वरा !  नमो नमा: !!

हे देवाधिदेवा ! भोले राजेश्वरा !
शंभू खोलेश्वरा ! नमो नमा: !!

बा... नीलकंठाय ! श्री मोरेश्वराय!
श्री भोलेनाथाय ! नमो नमा: !!

आक्राळ-विक्राळ ! रोद्र्य- अवतार!
नृत्य अविष्कार ! नटरंगी !!

गळी नागराज ! डमरू हातात !
गंगाही केशात ! विराजली !!

देवा वास तुझा ! कैलाश पर्वत !
नंदीही सेवेत ! दिनरात !!

देवी महादेवी ! पार्वती संगिनी !
तुझी अर्धांगिनी ! महादेवा !!

त्रिशूल सोडसी ! असुरा वधाया !
जगां उद्धराया ! भोलेनाथा !!

ऑं  नम: शिवाय ! मंत्रास जपूया!
तल्लीन होवुया ! शिव नाम !!

हाक देता देवा ! धाव घेतो देवा !  
भक्तासाठी देवा ! सदोदित !!

देवा तुज हवा! भक्तीमध्ये भाव!
निर्मल स्वभाव! भक्तामध्ये !!

श्रावण महिना ! महाशिवरात्र!
पूजतात भक्त ! तुज देवा !!

प्रवीण दंगतो ! प्रभू तुझ्या नाम !
तूच चारीधाम ! तुज नमो !!

-प्रवीण बाबुलाल हटकर 

माणूस...

माणसा ओळख ! माणसा पाळख !
माणूस ओळख ! माणसात !!

माणसाचा धर्म ! माणसाचे कर्म !
माणसाचे मर्म ! ओळखावे !!

जातपात धर्म ! हे नाहीच श्रेष्ठ !
ऐक सर्वश्रेष्ठ ! बा... माणूस !!

जात पात धर्म ! मानव निर्मित !
स्व: स्वार्थ सेवेत ! बा... नेमिले !!

कोण भगवंत ! कुणास बोलतो !
विद्वान जन्मतो! श्रेष्ठ जाती !!

धर्म नावाखाली ! कोणी तलवार !
कुणी काढे सुरा ! कशासाठी !!

माणूस कापतो ! माणसे सर्हास !
अघोरी विश्वास ! धर्म नावे !!

ही अमकी जात ! ती टमकी जात !
ती ढमकी जात ! आरोप का...? !!

धर्म नावाखाली ! घालूनी बुरखा !!
माणूस पारखा ! माणसाला !!

पहा वारकरी ! संप्रदाय एक !
माणूस हा एक ! दाखविला !!

माणूस हा श्रेष्ठ ! तै स्व: कर्तुत्वाने !!
कुठल्या धर्माने ! नाच होई !!

खरा एक धर्म ! माणूस ओळख !
मानवा ओळख ! स्व: अंतरी !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

जीवना तू चल… 

जीवना तू चल! रान-वन जाऊ!
मृगजळ पाहू! धावताना!

जीवना तू चल! उंच उंच उडू!
क्षितीजास ओढू! रेघ नवी!

जीवना तू चल! दानशूर होऊ!
देणाऱ्यास देऊ! भेट नवी!  

जीवना तू चल! कल्पनेत न्हाऊ!
नव-रंग देऊ! सप्तरंगा!

जीवना तू चल! मानवास सांगू! 
मानवता जागू! मनोमनी!

-प्रवीण बाबूलाल हटकर. 

संतांचे वचन… 

संतांचे वचन! संत प्रवचन!
सत्यार्थ जीवन! तुम्ही जगा!!

भौतिक सुखाची! सोडुनिया आस!
व्यर्थ हा प्रवास! बा… टाळावा !!

तूप साखरेची! नको करू चोरी!
नको घूस-खोरी! स्वार्थासाठी!!

खा तूझ्या कष्टाची! चटणी, भाकर!
ठेवून आचार! सदाचारी!!

गा … समर्थ व्हावे ! योग्य कार्यातुन !
साफल्य जीवन ! तू जगावे !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .  


      आज मित्रा तुला… 
   .
आज मित्रा तुला! काही सांगायचे! 
बोल बोलायचे! मनातुनी!!

मैत्रीच हे नात! कल्पतरू आहे!
मिळालेले आहे! न मागता!

मैत्रीचा विश्वास! खुले आसमंत!
नाच आसवांत! दाटलेले!!

मैत्री परिभाषा! जगणे मरने!
हसणे रडणे! एकमेका!

मित्र तोची आहे! चूक दाखवितो!
सत्यार्थ दावितो!! मार्ग तुला!!

संकटाच्या वेळी! उभा सोबतीला!
हात संकटाला! चारकरी!! 

वेळोवेळी तुला! योग्य मार्ग दावी!
भविष्याला दावी! वर्तमानी!!

सत्य नि असत्य! यातील फरक!
निर्णयकारक! मार्ग दावी!!

शांतीस शीतल! प्रकाशी प्रखर!
तुझ्यात आदर! जाणणारा!!

मैत्री हि असावी! कृष्ण-सुदामाची!
खर्या मित्रत्वाची! जोड जशी!!

जीवन तारक! मनस्वी स्मारक!
मैत्री सुधारक! वर्तनांत!!

प्रवीण मैत्रीत! हो तुही प्रवीण!
मैत्री संजीवन! सांग जागा!!

निर्मल निर्माल्य! निखळ निस्वार्थ!
मैत्री परमार्थ! जान-तुही!!

मैत्री अवखळ! वाहे खळखळ!
सरिता नितळ! वाहणारी!

अच्चाट डोंगर! निर्देश उच्चांक!
 न कन साशंक! रेणूसही!!

मैत्रीची जाणीव! मन आणि  मन!
 ब्रम्हांड ते कन! रुजलेली!!

मैत्री मनोरथ! युगायुगातून!
तुझ्या-माझ्यातून! पुढे वाहे!!

              -प्रवीण बाबूलाल  हटकर.

तो मज भेटतो…

तो मज भेटतो! निस्तेज होवुनी!
आसक्त होवुनी! मृगजळा!!

बसतो उठतो! क्षणात फुलतो!
नि डगमगतो! विचारांत!!

विचार अस्पष्ट! मांडतो मधून!
उगाच बोलून! टाळतोही!!

धीर देऊ कसा! सावरू हि कसा!
स्वताहून जसा! सावरतो!!

आज तो बोलला! छाती ठोक पणे!
भविष्यास म्हणे! झुकविल!!

वर्तमान नाही! तर नसू देत!
भविष्यास देत! आश्वासने!!

मज म्हणाला तो! मित्रा... चुकलो मी!
का ... वागलोय मी! गैर असे!!

मग मी थांबलो! नि विचार केला!
उगाच का याला! हो म्हणूया!!

मी बोललो त्यासी! रे काम  करूया!
जेवणं करूया! बाहेरचं !!

तो हो म्हणाला नि! त्या वेळी निघालो!
चालतच गेलो! लांब लांब!!

पुन्हा परताया! त्याला सांगितले!
त्यासी न कळले! काय झाले!!

शंकेने पाहिले! मनी न राहिले!
लगेच पुसले! का? असे हे!!

मी म्हणालो मित्रा!आत्ताच केलेया!
हवेस खाल्लेया! मनसोक्त!!

रागाने बोलला! अपमान केला!
गरीबीची तुला! न जाणीव!!

मी पण होयील! खूप खूप मोठा!
वर्तमान खोटा! साथीस ना!!

मी त्यासी बोलालो! वर्तमान खोटा!
भविष्यास मोठा! का! होशील!!

कार्य तुझे तुला! वर्तमानी आहे!
का? फुकट आहे! श्रीमंती हि!!

विश्वास ठेव तू! वर्तमानात या!
ना नाव ठेवूया!  भूतकाळा!!

हातची हि वेळ! तू न गमवावी!
वेळेत करावी! काम-सारी!!

उद्या करेल वा! परवा करेल!
हाती ना उरेल! वेळ तीही!!

भविष्य बनेल! हे नक्कीच आहे!
वर्तमानी आहे! कार्य तुझे!!

उगा नको मित्रा! कार्यास ह्या टाळू!
कार्यास या फुलू!! बाग नवी!!

घाबरू नकोस!  तुलाही जमेल!
कार्यास मिळेल! फळ तुझ्या!!

मज हे माहिती! तू करू शकतो!
तू मिळू शकतो! यश तुझे!!

म्हणून तू मित्रा! वर्तमानी जाग!
नको धरू राग! मनोमनी!!

चुकले असेल! तर माफ कर!
मन साफ कर! मी मित्रच!!

वर्तमानी जात! विश्वास ठेऊन!
गर .र फिरून! कार्य दळ!!

प्रवीण भविष्य! जगतोय पहा!
वर्तमानी पहा! कार्यातुनी!!

प्रवीण(डेबुजी) हटकर. 



माणूस जाणला … 


माणूस जाणला !माणूस शोधिला !
माणूस पूजिला ! 'मी' पुसता  !!


'मी' मज कळलो ! काही क्षणापूर्वी ! 
करुनी तेरवी ! 'मी' पणाची !!


माणूस ना अंगी ! देव पूजे व्यर्थ !
स्वतास समर्थ ! जाणुनिया !!


- प्रवीण बाबूलाल हटकर 

अभंग ..

दाढ अकलेची ! येता वर्षे झाली !
ना समज आली ! कवडीची !!

धोतर सदरा ! दिसे तो साजरा !
पेहेराव बरा ! अंग झाके !!

फ्याशन ने  राजा ! कमालच केली !
अर्धी नग्न झाली ! तरुणाई !!

जिथे झाकायचे ! तिथेच फाटले !
उगाच झाकले ! तोंडास का? !!

फ्याशन नावान ! लावली ठिगळे !
सजती माकडे ! रोज नवी !!
  
बापो...हो! जपा ना ! अपुली संस्कृती !
सोडा आता नीती ! अविचारी !!

उद्देश! फक्त हा ! वापरा संपूर्ण ! 
अंग झाका पूर्ण ! कपड्यांत !!

जुने-नवे असो ! पण असो योग्य   
प्रयोग सुयोग्य ! तुम्ही करा !!

                               -डेबुजी (प्रवीण) हटकर
                                      अकोला.  

गजानना ओढ ...

गजानना ओढ ! तुझ्या दर्शणाची !
कळी जीवनाची ! फुललीया !!

नको होऊ रुष्ठ ! बाबा आम्हावर !
तुझीच लेकरं ! पितामहा !!

मूळ तू झाड तू ! फुल तू पान तू !
चराचरात तू ! दिगंबरा !!

पाठीवर हात ! ठेव सदोदित !
जीवन वा अंत ! तुझ्या लीन !!

बाबा बाबा बाबा ! गजानन बाबा !
हाक देई बाबा ! तुझा भक्त !!

-प्रवीण बाबुलाल हटकर.
  अकोला .

Friday, 12 April 2013

आसक्त…  विरक्त…

 आसक्त, विरक्त ! परिणाम असे !
गा… जीवन जसे ! बदलले !!

लोभ माया राग ! आसक्त संगम !
आसक्त उगम ! मोहतोया !!

बा… जवळ नाही ! पण  हवी आहे !
तो आसक्त आहे ! मिळविण्या !!

मग मोहासाठी ! स्वार्थ सुखासाठी !
बा… मिळण्यासाठी ! धडपडे !!

याउलट आहे ! गा…  'विरक्तीगाथा' !
आहे जी अवस्था ! स्वीकारने !!

ईश्वराने दिल्या ! जन्मास आलेल्या !
बा… ह्याची आयुष्या ! जगणे हो !

न मोह न माया ! सुख-दुख एक  !
भूमिका हो एक ! तो विरक्त !!

जन्म-मृत्यू,  मोह- ! माया, सुख-दुख !
तठस्थ ओळख ! एक सम  !!

सहज…  आहे 'त्या' ! स्तिथिचा स्वीकार !
तठस्थ प्रकार  ! विरक्तीचा !!

नाही मिळाल्यास ! आसक्त भोवते !
मत्सर रोवते ! राग-लोभ !!

प्रवीण स्तिथिचा ! स्वीकार करून !
सहज होऊन ! जगतोया !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

Thursday, 11 April 2013

एक मुक्त कविता
  -आधार-

कासवा तू…
गोष्टीत जिंकलास !
बरे केले…
नाहीतर,
कामचोरांनी
तुझ्याच हरण्याचा,
तुझा " सहांभूतिमय आधार"
घेतला असता… स्वतासाठी !!!

-प्रवीण बाबूलाल हटकर.

Wednesday, 3 April 2013

कृतघ्न, कृतज्ञ…

कृतघ्न, कृतज्ञ ! फरक जाणुया !
फरक पाहूया ! दोहोतला !!

अगदीच सोपा ! फरक यातील !
चक्कर जातील ! सहजंच!!

बा… उपकाराची ! जया जाणं आहे !
नी आभार आहे ! तो… कृतज्ञ !!

कृतज्ञता येते ! स्वच्छ मनातून !
बा… भावनेतून ! आदराच्या !!

घेत उपकारा ! करुनी परत !
आभार व्यक्तत ! तो कृतज्ञ !!

गा…  उपकाराची ! ना जाणीव जया !
ना आभार तया ! व्यक्तेतेत  !!

उपकार घेत ! विसरून जातो !
कृतघ्न ठरतो ! खर्या अर्थी !!

बा… माणूस तोचि ! जो कृतज्ञ आहे !
व्यक्ततेत आहे ! ऋणजाणं !!

तो माणूस कसा ! जो कृतघ्न आहे !
ऋणास जो आहे ! बा… अजाण !!

प्रवीण जाहला ! कृतज्ञ होवून !
परत फेडून ! ऋणास हो !!

अभंग …
-प्रवीण बाबूलाल हटकर . 

 

Tuesday, 2 April 2013

कुलदेवी आई ….

आई कुलदेवी ! माता महालक्ष्मी !
देवी महालक्ष्मी ! नमो नम: !!

साडे तीन पीठ ! त्यामध्ये तू एक !
धनाचे प्रतिक ! महालक्ष्मी !!

कोल्हापूर धन्य ! धनाचे आगर !
कृपेचा सागर !! तू दाविला !!

आवडीच फुल ! सुंदर कमळ !
सुहास निर्मळ ! बैठीकीस !!

पवित्र या जागी ! कोल्हापुरी वास !
भक्त दर्शनास ! आनंदिले !!

दर्शनीय स्थळ ! कोल्हापूर झाले !
दुरूनीया आले ! भक्तजन !!

महासरस्वती ! महाकाली माता !
मा भवानी माता ! तुझ्यासंगे !!

पहाट दुपार ! रम्य सायंकाळ !
आनंद  सुकाळ ! सदोदित !!

दर्शुनी प्रवीण ! आली अनुभूती !
हर्ष ना मावती ! बा…  गगनी !!

माता माता माता ! आई आई आई !
कुलदेवी आई ! नमो नम: !!

कुलदेवी स्वामिनी  श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतल्यावर…

-प्रवीण बाबूलाल हटकर.