Friday, 19 April 2013


श्री. राम नवमीच्या समस्त भक्त गणास प्रेमळ भक्तिमय  शुभेच्छा …

अभंग …

हे राम श्री राम ! जय जय राम !
मुखी तुझे नाम ! सदोदित !!

दशरथ पुत्र ! अयोध्या नरेश !
तुझ्या ठाई शिश ! राम नाम !!

भक्त हनुमान ! हृदयात वास !
गा… हरेक श्वास ! तुझे नाम !!

लोकराजा आम्हा ! पुरषोत्तम राम !
देवा चारीधाम ! तुझं नमो !!

सितामाता तुझी ! जीवन संगिनी !
जीव-संजीवनी ! तुझं  नमो !!

स्वयंवर वेळी ! धनुष्य तोडीला !
जनक पुत्रीला ! वैवाहिले !!

तोडूनी धनुष्य ! अहम तुटला !
अनुभव आला ! परशुरामा !!

सन्मान देऊन ! पिता आदेशास !
केला वनवास  ! चौदा वर्ष !!

भरतास दिले ! राज्य कारभार !
शत्रुघ्न आधार ! मदतीला !!

वनवास केला ! लक्षमणा संगे !
सीतामाता संगे ! वणवण !!

श्री राम भक्तिनी ! शबरी भेटुनी !
दर्शन देऊनी ! धन्य केले !!

उष्ट बोर खात ! देऊनिया मोक्ष !
माता सीता साक्ष ! दिव्यक्षणी !! 

श्रुर्पनखा आली ! भेस बदलूनी !
रामास मोहिनी ! घालावया !!

लक्ष्मनाणे केले ! प्रहार नाकास !
परतुनी खास ! पाठविले !!

रावणाने सारे ! ऐकुनी कहाणी !
 पुष्पक विमानी ! धाव केली !!

कट रचुनिया ! माता पळविले !
वाटिकेत केले ! बंदिवान !!

सूड घेण्यासाठी ! राम नी लक्ष्मण !
संगे हनुमान ! लंका आले !!

बाली पुत्र संगे ! अंगद मदती !
विभीषण अंती ! मदतीस !!

रावण गर्वास ! हरण करून !
यायचे करून ! कट केला !!

मारोती उड्डाण ! वाटीकेस गेले !
जाळूनिया केले ! अर्धे भस्म !!

युद्धाची हि अता ! सुरवात आहे !
भयभीत पाहे ! रावण हो !!

महाकाय काल ! कुंभकर्णा यास !
यमसदनास ! पाठविले !!

बा…  लंका नरेश ! पुत्र महावीर !
अक्षयकुमार ! युद्धास हो !!

लक्ष्मण-अक्षय ! युद्धास प्रारंभ !
बाण अंदाधुंद ! वर्षाविले !!

अक्षय अखेरी ! युद्धात मारला !
दुख रावणाला ! फार झाले !!

पती वियोगात ! अक्षयची पत्नी !
बा… यमसदनी ! तीही गेली !!

अखेरी रावण ! महाकाय दैत्य !
दहामुखी दैत्य ! रणांगणी !!

घेत महाकाय ! अवतार पहा !
सूर्यास झाकला ! रावणाने !!

महा शक्तिशाली ! बुद्धिवंत दैत्य !
रावण हा सुप्त ! गुणी होता !!

श्रीरामचंद्राने ! बाणास सोडीले !
मुखास हो केले ! क्षतिग्रस्त !!

पुन्हा मुख जुडे ! आच्चारीले सारे !
विभीषण बरे ! सांगितले !!

नाभीमध्ये आहे ! जीवनअमृत !
मारताच मृत ! होयील हो !!

मारुनिया बाण ! रावणाचा वध  !
करुनी सावध ! दैत्यास हो !!

वनवास पूर्ण ! करुनिया आले !
दशरथ केले ! सन्मान हो !!

बा… अग्नी  परीक्षा ! सितामाता देत !
जनतेस देत ! विश्वास हो !!

हे राम श्री राम ! जय सीताराम !
जय जय राम ! नमो नम: !!

प्रवीण धन्यतो ! श्री राम चरिता !
अभंग करिता ! सादर हो !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
अकोला
मो : ८० ५५ २१३ २८१ 

No comments:

Post a Comment