अभंग ..
दाढ अकलेची ! येता वर्षे झाली !
ना समज आली ! कवडीची !!
धोतर सदरा ! दिसे तो साजरा !
पेहेराव बरा ! अंग झाके !!
फ्याशन ने राजा ! कमालच केली !
अर्धी नग्न झाली ! तरुणाई !!
जिथे झाकायचे ! तिथेच फाटले !
उगाच झाकले ! तोंडास का? !!
फ्याशन नावान ! लावली ठिगळे !
सजती माकडे ! रोज नवी !!
बापो...हो! जपा ना ! अपुली संस्कृती !
सोडा आता नीती ! अविचारी !!
उद्देश! फक्त हा ! वापरा संपूर्ण !
अंग झाका पूर्ण ! कपड्यांत !!
जुने-नवे असो ! पण असो योग्य
प्रयोग सुयोग्य ! तुम्ही करा !!
-डेबुजी (प्रवीण) हटकर
अकोला.
No comments:
Post a Comment