बारा जोतिर्लिंग दर्शन...
आद्य नमन हे ! भोले तुझ्या मुला!
श्री गणेशा तुला ! नमो नमा: !!
भोले वैद्यनाथा ! नमो नमा: !!
शिव नागेश्वरा ! महाकालेश्वरा !
शंभू घृष्णेश्वरा ! नमो नमा: !!
मल्लिकाअर्जुन! भोले रामेश्वरा !
श्री त्रंब्यकेश्वरा ! नमो नमा: !!
देवा भिमेश्वरा ! श्री ओम्कारेश्वरा !
दयाळू विश्वेश्वरा ! नमो नमा: !!
हे देवाधिदेवा ! भोले राजेश्वरा !
शंभू खोलेश्वरा ! नमो नमा: !!
बा... नीलकंठाय ! श्री मोरेश्वराय!
श्री भोलेनाथाय ! नमो नमा: !!
आक्राळ-विक्राळ ! रोद्र्य- अवतार!
नृत्य अविष्कार ! नटरंगी !!
गळी नागराज ! डमरू हातात !
गंगाही केशात ! विराजली !!
देवा वास तुझा ! कैलाश पर्वत !
नंदीही सेवेत ! दिनरात !!
देवी महादेवी ! पार्वती संगिनी !
तुझी अर्धांगिनी ! महादेवा !!
त्रिशूल सोडसी ! असुरा वधाया !
जगां उद्धराया ! भोलेनाथा !!
ऑं नम: शिवाय ! मंत्रास जपूया!
तल्लीन होवुया ! शिव नाम !!
हाक देता देवा ! धाव घेतो देवा !
भक्तासाठी देवा ! सदोदित !!
देवा तुज हवा! भक्तीमध्ये भाव!
निर्मल स्वभाव! भक्तामध्ये !!
श्रावण महिना ! महाशिवरात्र!
पूजतात भक्त ! तुज देवा !!
प्रवीण दंगतो ! प्रभू तुझ्या नाम !
तूच चारीधाम ! तुज नमो !!
-प्रवीण बाबुलाल हटकर
No comments:
Post a Comment