तो मज भेटतो…
तो मज भेटतो! निस्तेज होवुनी!
आसक्त होवुनी! मृगजळा!!
बसतो उठतो! क्षणात फुलतो!
नि डगमगतो! विचारांत!!
विचार अस्पष्ट! मांडतो मधून!
उगाच बोलून! टाळतोही!!
धीर देऊ कसा! सावरू हि कसा!
स्वताहून जसा! सावरतो!!
आज तो बोलला! छाती ठोक पणे!
भविष्यास म्हणे! झुकविल!!
वर्तमान नाही! तर नसू देत!
भविष्यास देत! आश्वासने!!
मज म्हणाला तो! मित्रा... चुकलो मी!
का ... वागलोय मी! गैर असे!!
मग मी थांबलो! नि विचार केला!
उगाच का याला! हो म्हणूया!!
मी बोललो त्यासी! रे काम करूया!
जेवणं करूया! बाहेरचं !!
तो हो म्हणाला नि! त्या वेळी निघालो!
चालतच गेलो! लांब लांब!!
पुन्हा परताया! त्याला सांगितले!
त्यासी न कळले! काय झाले!!
शंकेने पाहिले! मनी न राहिले!
लगेच पुसले! का? असे हे!!
मी म्हणालो मित्रा!आत्ताच केलेया!
हवेस खाल्लेया! मनसोक्त!!
रागाने बोलला! अपमान केला!
गरीबीची तुला! न जाणीव!!
मी पण होयील! खूप खूप मोठा!
वर्तमान खोटा! साथीस ना!!
मी त्यासी बोलालो! वर्तमान खोटा!
भविष्यास मोठा! का! होशील!!
कार्य तुझे तुला! वर्तमानी आहे!
का? फुकट आहे! श्रीमंती हि!!
विश्वास ठेव तू! वर्तमानात या!
ना नाव ठेवूया! भूतकाळा!!
हातची हि वेळ! तू न गमवावी!
वेळेत करावी! काम-सारी!!
उद्या करेल वा! परवा करेल!
हाती ना उरेल! वेळ तीही!!
भविष्य बनेल! हे नक्कीच आहे!
वर्तमानी आहे! कार्य तुझे!!
उगा नको मित्रा! कार्यास ह्या टाळू!
कार्यास या फुलू!! बाग नवी!!
घाबरू नकोस! तुलाही जमेल!
कार्यास मिळेल! फळ तुझ्या!!
मज हे माहिती! तू करू शकतो!
तू मिळू शकतो! यश तुझे!!
म्हणून तू मित्रा! वर्तमानी जाग!
नको धरू राग! मनोमनी!!
चुकले असेल! तर माफ कर!
मन साफ कर! मी मित्रच!!
वर्तमानी जात! विश्वास ठेऊन!
गर .र फिरून! कार्य दळ!!
प्रवीण भविष्य! जगतोय पहा!
वर्तमानी पहा! कार्यातुनी!!
प्रवीण(डेबुजी) हटकर.
No comments:
Post a Comment