कुलदेवी आई ….
आई कुलदेवी ! माता महालक्ष्मी !
देवी महालक्ष्मी ! नमो नम: !!
साडे तीन पीठ ! त्यामध्ये तू एक !
धनाचे प्रतिक ! महालक्ष्मी !!
कोल्हापूर धन्य ! धनाचे आगर !
कृपेचा सागर !! तू दाविला !!
आवडीच फुल ! सुंदर कमळ !
सुहास निर्मळ ! बैठीकीस !!
पवित्र या जागी ! कोल्हापुरी वास !
भक्त दर्शनास ! आनंदिले !!
दर्शनीय स्थळ ! कोल्हापूर झाले !
दुरूनीया आले ! भक्तजन !!
महासरस्वती ! महाकाली माता !
मा भवानी माता ! तुझ्यासंगे !!
पहाट दुपार ! रम्य सायंकाळ !
आनंद सुकाळ ! सदोदित !!
दर्शुनी प्रवीण ! आली अनुभूती !
हर्ष ना मावती ! बा… गगनी !!
माता माता माता ! आई आई आई !
कुलदेवी आई ! नमो नम: !!
कुलदेवी स्वामिनी श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतल्यावर…
-प्रवीण बाबूलाल हटकर.
आई कुलदेवी ! माता महालक्ष्मी !
देवी महालक्ष्मी ! नमो नम: !!
साडे तीन पीठ ! त्यामध्ये तू एक !
धनाचे प्रतिक ! महालक्ष्मी !!
कोल्हापूर धन्य ! धनाचे आगर !
कृपेचा सागर !! तू दाविला !!
आवडीच फुल ! सुंदर कमळ !
सुहास निर्मळ ! बैठीकीस !!
पवित्र या जागी ! कोल्हापुरी वास !
भक्त दर्शनास ! आनंदिले !!
दर्शनीय स्थळ ! कोल्हापूर झाले !
दुरूनीया आले ! भक्तजन !!
महासरस्वती ! महाकाली माता !
मा भवानी माता ! तुझ्यासंगे !!
पहाट दुपार ! रम्य सायंकाळ !
आनंद सुकाळ ! सदोदित !!
दर्शुनी प्रवीण ! आली अनुभूती !
हर्ष ना मावती ! बा… गगनी !!
माता माता माता ! आई आई आई !
कुलदेवी आई ! नमो नम: !!
कुलदेवी स्वामिनी श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतल्यावर…
-प्रवीण बाबूलाल हटकर.
No comments:
Post a Comment