Wednesday, 3 December 2014

तू अता हसत जा … 
जीवना जगत जा … 

पांडुरंग नामे 
अंतरी भजत जा … 

ज्ञान ही कस्तुरी 
मुक्त दरवळत जा … 

- प्रवीण बाबूलाल हटकर 
 
ध्येय तर भेटती 
त्या कडे पळत जा … 

Monday, 1 December 2014

       गझल 

… विठ्ठला … 

आमचा आधार विठ्ठला
तूच पालनहार विठ्ठला 

संकटी भक्तास तारतो 
तूच तारणहार विठ्ठला 

रे तुझ्या नामात जाणतो 
जीवनाचा सार विठ्ठला 

ठेवतो ह्रदयात तर कुणी 
मांडतो बाजार विठ्ठला 

भाबळ्या भक्तीत दंगतो 
दर्शुनी साकार विठ्ठला … 

- प्रवीण बाबूलाल हटकर  

Tuesday, 25 November 2014

         गझल

श्वासास जागुनी भेट तू …
म्रुत्यूस चुकवुनी भेट तू …

एकांत जर हवा सोबती
हृदयात येउनी भेट तू …

भेटायचे तुला जर मला
देहास टाळुनी भेट तू …

तीर्ढी प्रवीणची सजवली
चल सरण होऊनी भेट तू …

जाणायचा तुला विरह जर
पानगळ होऊनी भेट तू …

माणूस शोधण्या ह्या युगी 
मुखवटे काढुनी  भेट तू … …

- प्रवीण बाबूलाल हटकर . 

Wednesday, 19 November 2014

मथल्यासह शेर ….
-  u  -  -  -  -  -

आठवांची रड आहे
काळजां धडधड आहे …

मुक्त व्हावे तू जीवा
श्वास तर जोखड आहे …

-प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 18 November 2014


मोगऱ्याची पाकळी तू
गुंततो मी ,  साखळी तू …

शोधतो मी अंबरी  अन
सागराच्याही तळी तू … 


२शेर … 

एक होण्या या समाजा
माणसांना जोडले मी … 

स्वच्छ निर्मळ मुक्त जगण्या 
बंध सारे तोडले मी … 

- प्रवीण बाबूलाल हटकर



Monday, 17 November 2014

एक शेर …

जन्म दाती लेकराचा जीव घेते
मग म्हणावे हीच आई की कसाई …

-प्रवीण बाबूलाल हटकर


एक शेर …

जन्म दाते जीव घेती लेकराचा
कलयुगाचे भेटले आम्हा कसाई ….

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Saturday, 15 November 2014

गझल …

साजनीने सजावे किती ?
ह्या मनाने जळावे किती ?

पाखरानो अता झेप घ्या …
अंबराने झुकावे किती ?

शेकडो यातना अंतरी …
चेहऱ्याने हसावे किती ?

जीवना जाणतो मी खरे …
नशवराने पळावे किती ?

दोस्तहो ! सरण ही बोलले …
ह्या चितेने जळावे किती ?

माणसां एक तू व्हावया
कायद्याने झटावे किती ?

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 14 November 2014

गझल
धावतो सुसाट तू
जीवना पिसाट तू …

आठवात संग्रही
काळजा कपात तू

अंधकार मी जणू
मखमली पहाट तू …

झेलतोस वादळे
काळजा अफाट तू …

लीन होउनी असा
जाहला विराट तू …

पांडुरंग मोक्ष अन
एकमात्र वाट तू …

- प्रवीण बाबूलाल हटकर

Thursday, 13 November 2014

 मतला व शेर 

मज दिसे कवडसा ना तुझा
जीवना भरवसा ना तुझा …

कृष्ण ऐशू व बुद्धा कसा
भेटला वारसा ना तुझा …

शोधतो पावले अंबरी
भू वरीही ठसा  ना तुझा  …

-प्रवीण बाबूलाल हटकर 


मज दिसे कवडसा ना तुझा
जीवना भरवसा ना तुझा …

कृष्ण ऐशू व बुद्धा कसा
भेटला वारसा ना तुझा …

टाळण्याचा इरादा मला… 
वाटतो फारसा ना तुझा  …

शोधतो पावले अंबरी
भू वरी बघ   ठसा  ना तुझा  …




किती नाजूक मोगरया सारखी 
देखणी साजूक मोगरया सारखी … 


Thursday, 6 November 2014

ओळख पाहिजे ! जाणीव पाहिजे !
अस्तित्व पाहिजे ! "स्व"
ताहाचे !!

मी वागतो आहे ! ज्यासी हवा तसा !
पुसूनीया ठसा ! स्वताहाचा !!

जाणिले तयांनी ! हवा त्या स्वरूप !
भेटलो त्या रूप ! सहज त्या !!

कुणी बोले मज ! तू तसे वागावे !
तू तसे असावे ! त्या स्वरूप !!
ह्याला काय वाटे ! त्याला काय वाटे !
उगाचच फाटे ! का / पाडावे !!

मला काय हवे ! मी ठरवणार !
मी घडवणार ! जीवनाला !! 

अस्तित्व हवे ते ! फिनिक्सा प्रमाणे !
फिनिक्सा प्रमाणे ! जगावेत !!

स्व राखेतूनिया ! जन्म घेई असा !
ना कोणीही तसा ! त्या स्वरूप !!

फिनिक्स ओळख ! स्व राखेत जन्म !
जमले आजन्म ! ना कोणास !!

कमळ जन्मतो ! चिखल जागेत !
सुंदर जगात ! ना त्या रूप !!

राणी लक्ष्मीबाई ! रे अहिल्या शूर !
अंतराळ वीर ! सुनिता तू !!

शिवाजीसारखा ! पराक्रमीच ना !!
 चाणक्या सारखा ! ना कुटील !!

प्रेम कृष्णरूप ! शांती बुद्धारूप !
बा … विवेकरूप ! ज्ञानसाठा !!

आगळी वेगळी !  प्रतिमा जयांची !
कीर्ती हो तयांची ! स्व बळाची !!

स्व ओळख दावी ! अस्तित्वाची जान !
कीर्ती हि प्रमाण ! विश्वरूपी !!
अभंग
- प्रवीण बाबूलाल हटकर 
ओळख पाहिजे ! जाणीव पाहिजे !
अस्तित्व पाहिजे ! "स्व"
ताहाचे !!

मी वागतो आहे ! ज्यासी हवा तसा !
पुसूनीया ठसा ! स्वताहाचा !!

जाणिले तयांनी ! हवा त्या स्वरूप !
भेटलो त्या रूप ! सहज त्या !!

कुणी बोले मज ! तू तसे वागावे !
तू तसे असावे ! त्या स्वरूप !!

अस्तित्व हवे ते ! फिनिक्सा प्रमाणे !
फिनिक्सा प्रमाणे ! जगावेत !!

स्व राखेतूनिया ! जन्म घेई असा !
ना कोणीही तसा ! त्या स्वरूप !!

फिनिक्स ओळख ! स्व राखेत जन्म !
जमले आजन्म ! ना कोणास !!

कमळ जन्मतो ! चिखल जागेत !
सुंदर जगात ! ना त्या रूप !!

राणी लक्ष्मीबाई ! रे अहिल्या शूर !
अंतराळ वीर ! सुनिता तू !!

शिवाजीसारखा ! पराक्रमीच ना !!
 चाणक्या सारखा ! ना कुटील !!

प्रेम कृष्णरूप ! शांती बुद्धारूप !
बा … विवेकरूप ! ज्ञानसाठा !!

आगळी वेगळी !  प्रतिमा जयांची !
कीर्ती हो तयांची ! स्व बळाची !!

स्व ओळख दावी ! अस्तित्वाची जान !
कीर्ती हि प्रमाण ! विश्वरूपी !!

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 3 November 2014

… गझल …

      तेवढी

झेप घे जगण्याची तेवढी,
पाखरा उडण्याची तेवढी … 

काळजाच्या आडोशास तू ,
राहिली बघण्याची तेवढी … 

जीवनाचा सारी पाठ  हा ,
भोगुनी भरण्याची तेवढी…

मृगजळा आम्हा द्यावी हमी ,
वास्तवी असण्याची तेवढी ….

सुंदर तुझे डोळे बोलती ,
ओठ तर हलण्याची तेवढी …

माणसा…  माणुसकी राहिली,
अंतरी जडण्याची तेवढी  …

- प्रवीण बाबूलाल हटकर .

Tuesday, 28 October 2014

विठ्ठला का असा ! रुसला भक्तास !
भेटावे तू आस ! जगण्यास !!

नेमिला प्रवास ! जाणिला प्रवास !   
भक्ती हा प्रवास ! मोक्षप्राप्ती !!



Monday, 27 October 2014

मथला 

श्रावणाला सर्दी वाढत आहे 
आठवांची गर्दी वाढत आहे. 

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Sunday, 28 September 2014

……. जिद्द माझी ……
गझल

हो ! पुन्हा बघ धावण्याची जिद्द माझी …
हारताना जिंकण्याची जिद्द माझी …

ह्या मनाने त्या मनाशी एक व्हावे
माणसांना जोडण्याची जिद्द माझी …

मज तुझ्या या आठवांची साथ व्हावी
श्रावणाला रडविण्याची जिद्द माझी …

शांततेला बोलताना पाहिले जर
मग मुक्यांना ऐकण्याची जिद्द माझी …

हसवितो सार्या जगाला विदुषका तू
आज तुजला हसविण्याची जिद्द माझी …

-प्रवीण बाबूलाल हटकर

Friday, 5 September 2014

आठवा हरवल्या…

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या … 

पातळ भू-गर्भात, या खोल सागरात,
उंचशा अंबरात, या गाव शिवारात ,
उठलेला भवरा, गुंतुनिया स्वतात … १

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

उत्तरामध्ये प्रश्न , या प्रश्नात उत्तर
लपंडाव श्वासात , दिपू कसे अंतर
जसे हरिणी पोटी , कस्तुरीचे अत्तर … २

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

कासावीस दिसली , आठवांची नगरी
रे हाक पारव्याची , उदासीन लहरी
ना भेटी राजा राणी , हा एकांत जहरी … ३

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

एकांताचा प्रवास , रे एकटा एकांत
जगण्या मरण्याला , हवा अता सुखांत
सुख दुःखाच्या डोही , 'मी' सहज निवांत …

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

-प्रवीण बाबूलाल हटकर

   

Wednesday, 27 August 2014

आभाळा आभाळा… 

भावगीत … 

आभाळा आभाळा ये दाटुनी जरा …
भिजव अंबर  चिंब वसुंधरा …. 

आभाळ गर्भात, विजाडती कळा 
बहरे उदरी , सागराचा मळा
हालचाली आत, प्रसवता तळा … 
 
आभाळ आभाळ ये दाटुनी जरा …. 


भिजव शिखर भिजव शिवार 
भिजव पहाट भिजव दुपार 
पाखरांसवे करू चिंब विहार  … 

आभाळ आभाळ ये दाटुनी जरा …. 

आम्हा लपेटून , भिजव तू  जरा 
दोघे होऊ एक, मिटून अंतरा 
मी तुझा गुलाब तू माझी मोगरा … 

आभाळ आभाळ ये दाटुनी जरा …. 
भिजव अंबर  चिंब वसुंधरा ….

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Tuesday, 15 July 2014

समाधान आहे ,बा … विठ्ठल …


विठ्ठला तू कसा ! ओळखावा सांग !
ओळखावा कसा ! सांग देवा !!

झाडा झुडपात ! दरी वा खोऱ्यात !
पातळ नभात ! या अंबरी !!

सांग देवा सांग ! समुद्र अथांग !
पर्वतात थांग ! आहे तुझा !!

कण ब्रम्हांडात ! दृश्य अदृष्यात !
का दुजा विश्वात ! थांग तुझा !!

रे गाव शिवार !  राज दरबार !
 कोठे कारभार ! सांग देवा !!

विठ्ठल हसले ! हसत बोलले !
बोलता वदले ! ऐक भक्ता !!

मज ओळखण्या ! नको जाऊ दूर !
बा… पंढरपूर ! घर तुझे  !!

आई वडिलांची ! तू सेवा अर्पावी !
सेवा तू करावी ! मनोभावे !!

दारी भिक्षुकास ! दानधर्म करा !
मन साफ जरा ! ठेउनिया !!

दिन-दुबळ्याची ! मदत करावी !
ना तया करावी ! अव्हेलना !!

मी मिळेल तुला ! मदत म्हणून !
बा सेवा म्हणून ! हो मिळेल !!

मी मिळेल तुला ! तुझ्याच अंतरी !
अदृश्यच जरी ! जाणवेल !!

मी मिळेल तुला ! तुझ्या कार्तुत्वात !
बा… सत्य कार्यात ! सहजच !!

जाणुया तै  नाम ! घडे चारीधाम !
 आहे एकनाम ! "समाधान" !!

विठ्ठल नामात ! समाधान आहे !
समाधान आहे ! बा … विठ्ठल !!

पांडुरंग बोला ! बोला हरिनाम !
हरी हरी नाम ! पांडुरंग !!

(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 4 July 2014

  मुक्तक …

नको,
मला तुझी साथ,
चंद्र , सूर्य, तार्यांसारखी ,
कधी दिवसा तर कधी रात्री,
अर्ध्यावर सोडून जाणारी…

ती
हवी मज,
हवे सारखी,
अदृश्यतेतही,
श्वासाश्वासात जाणवणारी,
श्वासा-श्वासास फुलवणारी …. !!!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 19 June 2014

होत बंधू सखा, साथ देई…

परम सत्य तू ! परम तथ्य तू !
विठ्ठला तूच तू ! जाणिवांत !!

तू आनंदी घर ! सुखाचा  सागर !
विठ्ठला जागर ! नाम तुझ्या !!

भक्ताच्या रक्षणा ! विठू पाठीराखा !
होत बंधू सखा ! साथ देई !!

काळीज देवा दे ! माणूस पाहण्या !
माणूस शोधण्या ! माणसात !!

(अभंग … )

- प्रवीण बाबूलाल हटकर

Wednesday, 18 June 2014

                                                  … आय लव … रेनी सिझन  …


मेरा जीवन घडीसे रु-ब-रु होकर काटो को सम्मान देते हुवे, जिना सिख लिया था.  बेजान  बेबस और बेवजह के इस चक्रविव्ह मे फसे अभिमन्यू कि भाती लग रहा था. दिन-रात, माह-वर्ष आते थे,जाते थे… दिल मे हमेशा एक सवाल उठता था. सुरज पूरबसे पच्छिम की और क्यू जाता है ? क्या इन्हे दुसरी दिशा नही मिली ? प्रारंभ को ! और उसमे ये बारिश… उफ़्फ़ इतनी बारीश क्यू .… किचड हि किचड … परेशानीही परेशानी ….
दोस्त एक राज कि बात कहु… आय हेट…  रेनी सिझन !!

अभी बारीश का मौसम शुरू हुआ था. कॉलेज कि और निकल पडा, उसी वक्त ११ बजे मेघराजाने आसमामे काले-काले बादलोकि सेना बुलवाई , बीच बीच मे बिजलिके चमकसे, आवाजसे मुझे सेनापती चेतावणी दे रहा था. जाओ अपने सुरक्षित स्थल पर जाओ , कुछ ऐसेही इशारा हो रहा था, शायद… मे तो अपने जिद्द पर अडा रहा, मै निडर होकार, उन्हे अनदेखा कर अपनी लक्ष कि और चलता रहा. ठीक अर्जुन को पंच्छी की आंख दिखी उसी तरह … मै चलता रहा… सच्चे यौद्द्धा कि तऱ्ह …      अचानक तुफान का आगाज … . बारीश कि बुन्दो का तीर कमान कि तरह वर्षाव…  मेरे अंग- कांधोको हवाओ को चिरता हुआ बेकाबू बरस रहा था.
मैने बचाव के लिये बडे पिपल पेड का सहारा लिया.  मै भिगे हुये बालोको सेहलाते हुये बारिश को घुस्सेसे तांक रहा था. शायद रास्तेपे गिरते हुये बुंदे हाती-घोडे का अजब खेळ दिखाकर अपनी विजय का जशन  मना रहे हो, ऐसे दिखा रहे थे.
और तभी एक स्कुटी आकार पाणी के गड्डेमे फस गयी. ध्यान से देखा तो कोई लडकी थी. गाडी को निकालने कि नाकाम कोशिश चल रही थी. उसका धुंदलासा चेहरा दिख रहा था. उसने सहायता की नजर से मेरी और तांका पर आवाज ना दे पायी. आखीर मैने फ़ैसला किया उसकि सहायता करणे का. मेने ब्याग को पेड के पास रखा, कपडोकी पर्वा छोड गाडी निकालने लगा बिना उसे बात किये. अब मै भी बारिश मे पुरा भिग चुका था. बडे मुश्कीलसे गाडी को निकाला और उसे देखे बगेर वहा से निकल पेड कि और आया.

गाडी को वह रेस कर कुछ केहना चाहती थी पर मै  अपने भिगे कपडो को और बालो को सवारणे मे लगा था. बारिश शुरू थी . वह  गाडीसे उतरी, मेरे ओर आणे लगी. मेरी नजर से नजर तांकते स्कार्प निकालते हुवे मुझे कहा थ्यांक्स (thanks)  प्रिन्स शुक्रिया मै आप कि आभारी हु. उसे देखते हि मेरे होश उड गये. क्योकी ओ मेरी क्लासमेट अवनी थी. जिसके साथ बात करणे के लिये मै  कयी सालोसे तरस रहा था. ओ आज इस तरह ऐसे मेरे सामने होंगी ये सोचा नही था. बारिश कि तरह हमारी बाते शुरू रही. कॉलेज कि पुराणी नयी बाते . हंसी मजाक के किस्से रंग लाये. हम दोनो पुरी तरह खुल गये थे ठीक आसमा मे फैले इंद्रधनू के भाती.
बातो बातो मे कब बारिश रुकी पता भी न चला . फिरसे एक बार अवनी ने आभार व्यक्त किये और मैने कहा
कूछ फिल्मी अंदाज मे … अवनी नो थ्यांक्स नो सॉरी …" ओ मुस्कुरा रही थी और मै उसे देख" . दोनो  वहासे निकलने लगे, उसने पुछा प्रिन्स कहा जा रहे हो.  मैने कहा कॉलेज … उसने कहा चलो वहांतक छोड देती हू . मेरे ना कहनेसे पेहले उसने कहा दोस्त कहा है तो चलना हि होगा. मैने भी ना नही  कहा. तबसे अबतक… शॉपिंग हो, फिल्म हो स्टडी हो  पिकेनिक या पहली बारिश मै  भिगने का मजा हो हम साथ साथ हि रहते है . दोस्ती के रास्ते मे हम एक साथी कि  तरह चल पडे है . ये सब हासिल हुआ  अन्चाही बारीश के वजहसे  … कॉझ … आफ्टर ओहर ओल … आय लव … रेनी सिझन.


 -प्रवीण बाबूलाल हटकर
(add) एड/सेल्स (ऐक्झीकेटीव)
अकोला
मो : ८३९०९०३८१७



Saturday, 14 June 2014


भक्त हा पामर , वा असो कुबेर …. 

विठ्ठला निघालो ! भेटीसाठी तुझ्या !
अंतरित माझ्या ! झाकन्यासी !!

विठ्ठल जाहलो ! विठ्ठल पुजता !
विठ्ठल स्मरता ! लीन होता !!

विठ्ठल पाहतो ! हासुनिया असा !
स्पंदनात जसा ! विरलाय !!

विठ्ठल ठेवतो ! भक्तावरी लक्ष !
वेळोवेळी दक्ष ! करुनिया !!

भक्त हा पामर ! वा असो कुबेर !
वृत्ती सदाचार ! तो असावा !!

विठ्ठल पावतो ! सत्यार्थ कर्मात !
सत्यार्थ कार्यात ! सदोदित !!
(अभंग … )

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 13 June 2014


विठ्ठला तू व्हावे , अमुचे नशीब… 

विठ्ठला तू यावे ! बनून अंबर !
होऊन छप्पर ! आधारावे !!

विठ्ठला तू घ्यावे ! आम्हास कवेत !
फेकुनी हवेत ! बा… झेलावे !!

विठ्ठला तू द्यावे ! हातात लेखन !
देत शिकवण ! गिरवावे !!

विठ्ठला तू व्हावे ! अमुचे नशीब !
जीवन हिशोब ! जुळवावे !!

विठ्ठला तू जावे ! तुझ्यात घेऊन !
तुझ्यात ठेऊन ! सुखवावे !!

(अभंग… )  

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 11 June 2014

मन पेटते तेव्हा …

वणवा पेटतो तेव्हा  …
सुरु होतो आगेचा तांडव ,
सवर्त्र आक्रोशाचा आहाकार ,
जणू धुराने सारा आसमंत व्यापून जातो ,
हिरवगार दिसणार जंगल कोळश्याच ,
माहेरघर दिसू लागतं , केवळ दिसतो विनाशाच
जणू हिरव्यागार नटून थटून बसलेल्या विवाहितेला
जिवंत जाडल्यागत सगळ दिसू लागतं
हो ! वणवा पेटतो तेव्हा,

मग अशात प्रश्न उपस्थीत राहतो
तो ,
मन पेटते तेव्हा…
ना दिसत आगेचा तांडव,
न दिसत धुराने आसमंत व्यापलेला,
दिसतात कुठे विकृतलेल्या मनाचे विपरीत परिणाम,
त्याला आपण विनयभंग बलात्कार हिंसक अत्याचार व … ?
तर कुठे दिसतात त्यातच रमलेले जगलेले भोगलेले ,
सर्वस्व अर्पण केलेले ,
इतुकेच काय वाल्याचे वाल्मिकी झालेले , कालिदास,
जगाच्या शांतीसाठी  बुद्ध,सवेदनेचे आधारस्तंभ ऐशू ,
प्रेमरुपी दिव्यात्मा म्हणून कृष्ण तर कुणी …. ?
मन पेटते तेव्हा …

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Saturday, 7 June 2014



भक्तीचा जल्लोष, पांडुरंग… 

पंढरीची वारी ! चाले वारकरी !
भजे वारकरी ! पांडुरंग !!

श्री हरी विठ्ठल ! बोला जय हरी !
बोला हरी हरी ! पांडुरंग !!

टाळ वाजवूनी ! नाम जय घोष !
भक्तीचा जल्लोष ! पांडुरंग !!

दिन दुबळ्यासी ! सेवार्थ अर्पूया !
मनात स्मरुया ! पाडुरंग !! 

सर्वांग सुंदर ! रूप मनोहर !
कोमळ आंतर ! पांडुरंग !!

श्रावण श्रुंगार ! साक्षात साकार !
जगण्या आधार ! पांडुरंग !!

अभंग …
-प्रवीण बाबूलाल हटकर

Wednesday, 28 May 2014

कैसे आभाळा कुशीत ! निजलेया एक स्वप्न !
हंबरले कैक प्रश्न ! गोंजारता !!

आभाळ गर्भास येता !बा… विजाडलेली कळा  !
बहरे प्रकाश मळा ! आसमंती !

 भूमी नाचे मोरापरी ! येणार पावूस सरी !
आनंदाने गाऊ तरी ! नाच कळे !!

आभाळही वादळले ! दूर दूर पसरले !
पर्वतास आच्छादले ! घसरले !! 
  
बा… आभाळ उसवले ! अलगद अलगद !
होऊनिया गदगद ! वार्यासवे !!


Monday, 26 May 2014

धर्म कशासाठी ! धर्म कुणासाठी !
धर्म नावे काठी ! कुणाहाती !!

जो तो पछाडला ! बा… धर्म गुंत्यात !
बा… धर्म गोत्यात ! अडकला !!

अमक्या धर्मात ! टमक्या धर्मात !
धमक्या धर्मात ! निरर्थक !!

जाणला  का कुणी ! धर्माचा उद्देश !
धर्माचा संदेश ! उपदेश !!

धर्म व्याप्ती काय ! धर्म शक्ती काय !
धर्म युक्ती काय ! जाणलेया !! 


Saturday, 24 May 2014



भजे तसे, रूप दावी, गजानन … 

गजानन गजानन ! एक हाक अंतरीची !
ऐक हाक पामराची !गजानन !!

एक चित्त तुझे नाम ! नाम तुझ्या समाधान !
आम्हा वास्तवाची जान ! गजानन !!

लोखंडचे होई सोने ! किमया करी परिस !
भक्तां झालेया परिस ! गजानन !!

मल्हार कुणा विठ्ठल ! कुणी देखिले गोसावी !
भजे तसे, रूप दावी ! गजानन !!

चकोरा चंद्रकिरण  ! चातका आस पाण्याची !
आम्हा आस दर्शनाची ! गजानन !!

एक जन्म एक मृत्यू ! हे त्रिकाली सत्य आहे !
सोबतीला गुरु आहे ! गजानन !!

अभंग ….
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 20 May 2014

एक एक श्वासा ! जपलेया माझ्या !
संजीवन माया ! माय माझी !!

ठेच जेव्हा लागे ! लागे ठेच पाया !
येई सावराया ! माय माझी!!

Tuesday, 13 May 2014

एक मतला एक शेर

अंतरीचा हुंकार माय माझी
जीवनाचा बा…  सार माय माझी

भाकरीच्या प्रश्नास मिटविताना
विसरलीया श्रुंगार माय माझी…

-प्रवीण बाबूलाल हटकर

Friday, 9 May 2014

ऐ कागज कि कष्टी …

ऐ  कागज की कष्टी,
तू जा इस घर से उस मकां तक
सडक के उस पार …
मेहबूब ई हमसफर के कदमोतले …
दिल ए पैगाम लेकर … हा रु ब रु हो …
एक गुफ्तचर  कि तरह …
अब ध्यान से सुनो
मेरी आवाज को कानोमे बुनो …
ठीक बीच सडक मे है भवर
जो तुम्हे ले जायेन्गा पिताजीके ओर मोडकर   …
या फेर सकता है मेरी ओर ,
हो सकता है  डुबा दे साथ तुम्हे लेकर …
मुझे डर नही आपका डूबके खुदखुशी करणे का ?
 फ़कत… है  डर इस बात का ?
उसपर लिखा है  एक  नाम
ठीक  मेरे नाम के आगे है उसका नाम …
एक नये रिश्ते कि शुरवात लिये  …
मेरे मंजिल ई हमसफर के लिये …

-प्रवीण बाबूलाल हटकर    

Tuesday, 6 May 2014

  गझल

वादळे वादळे वादळे
सोबती जोवरी तू गडे …


जीवना गायिले मी तुझे
हे धडे ते धडे ते धडे …


लावले आसवे सिंचणी
बहरले वेदनांचे मळे …


काळजां काळजां काळजां
तू किती? जाळशी आतळे …


एक तू  एक मी …  एक ना
अन उभे एकटे झोपडे …


घसरला पाय माझा जसा …
केव्हडी हासली माकडे …


-प्रवीण बाबूलाल हटकर

Sunday, 27 April 2014

         गझल

का ….


का… ? असे हे घडावे
मी न माझ्यां उरावे …

पोर्णिमा तू गुलाबी
चंद्रमा मी असावे …

आरसा बोलला मज
आतले ना दिसावे …

तोडले काळजाला
घेतले ना पुरावे …

वादळे शांत सरना …
आत तू का ? जळावे ….

काळजातील जखमा
ना जगाला कळावे

कागदाची नाव ती …
बा… किती हो ! पळावे …

भेटती माणसे मज
फक्त  'मी' 'मी' नसावे …

भेटलो मी मला का ?
प्रश्न हे का ? पडावे …

आसवे आज डोळी  …
हुंदके का ? हसावे ….

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 17 April 2014

          गझल

जिंदगी, मोसमी आहे
एक तू … एक मी आहे … 

एव्हडे,  एकरूप अता 
प्राण तू … श्वास मी आहे … 

जिंकता बोलला कासव
तू उद्या आज मी आहे

जीवना ही तुझी खेळी
लाथ तू बॉल मी आहे

बोलतो  जन्म मृत्यू ला
अंत तू उगम मी आहे …

- प्रवीण बाबूलाल हटकर

Monday, 7 April 2014

           गझल
 (एक मथळा दोन शेर )


जीवनाची सांगतोया मी कहाणी
चेहऱ्यावरती हसू डोळ्यात पाणी …

गा… उन्हाचा वाढतोया जोर जेव्हा
पारव्याची ऐकतो मी विरह गाणी …

संकटाना घाबरावे काच आम्ही
वादळांना पेलण्या गेली जवानी …

-प्रवीण  बाबूलाल हटकर


Saturday, 5 April 2014

कार्य , कीर्ती तुझी , वृत्तीत  निर्भर …


वृत्ती तुझी जशी ! जगा ज्ञात तसा !
वेगळाची ठसा ! ना … उमटे !!

स्वार्थ समाधानी ! क्रूर अभिमानी !
धूर्त स्वाभिमानी ! वा कपटी !!

ओळख तुझिया ! वृत्ती दाखवेल !
जग हि ओळखेल ! त्या - परिस !!

पामर होयील ! लाख धनवान !
ना… परिवर्तन ! वृत्तीत हो !!

भिकार्यास दान ! लाख तू करावे !
भिकेसाठी यावे ! पुन्हा त्याने !!

वृत्ती त्याची आहे ! भिक मागण्याची !
आहे जगण्याची ! कष्टाविना !!

कर्णाचीया वृत्ती ! दानशूर आहे !
संतांचिया आहे ! समाधानी !!

गाढवास करा ! स्वच्छ अंघोळीत !
जायील घाणीत ! लोळण्यासी !!

माकडाची वृत्ती ! आहे लालसेची !
जीवा बेतण्याची ! तमा न त्या !!

बगडा हा धर्त ! लांडगा चतुर !
दुश्मन फितूर ! वृत्ती आहे !!

संवेदन ऐशू ! बुद्ध शांतीसाठी !
कृष्ण प्रेमासाठी ! जानलेया !!

बा… चाणक्य नीती ! पोपटाची वाणी !
कोकिळेची गाणी ! ज्ञात सर्वा … !!

आहे बेईमान ! ज्ञात बेईमान !
इमानदार न ! दिसे जगी !!

कार्य , कीर्ती तुझी ! वृत्तीत  निर्भर !
दिसेल साभार ! वागतांना !!

(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 3 April 2014

गझल …

आयुष्या एकदा , तू हसून बघ …
ऐक वेड्या जरा , तू जगून बघ … 

मूर्ख तू बनवशी , आज सगळ्यास  
भरवसा एकदा , तू बनून बघ …   

संकटे वादळे , तर सभोवती
कंबरेला जरा , तू कसून बघ …

केव्हडी जिंदगी , झालीया स्वस्त
श्वास घे रोकून , तू मरून बघ …

हारण्याची मजा वाढते अशी …
जिंकता जिंकता , तू हरून बघ …

-प्रवीण बाबूलाल हटकर

Wednesday, 2 April 2014

 बा… तुझ्यात मुक्ती,आनंदाई … 


देवा पांडुरंग ! पांडुरंग हरी !
मनाच्या या द्वारी ! धाम तुझे !!

पांडुरंग माझ्या ! हरेका श्वाशात !
बा… रगारगात ! भिनलेला !!

ना कुठला स्वार्थ ! ना कुठला मोह !
एक स्वार्थ मोह ! नाम तुझ्या !!

देवा पांडुरंगा ! आलोया शरणा !
दे मज चरणा ! जागा तुझ्या !!

पांडुरंग भक्ती ! मिळे नाम शक्ती !
बा… तुझ्यात मुक्ती ! आनंदाई !!

पांडुरंग धागा ! मन आहे मनी !
ओउनिया गुणी ! एक होऊ !!

देवा ब्रम्हरूप ! आहे विश्वरूप !
अनंत स्वरूप ! पांडुरंग !!

(अभंग … ) 
-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Saturday, 8 March 2014

नवा दाखवाया , इतिहास ……


छळ बलात्कार ! व विनयभंग !
वासनेचा भोग ! तुझ्या नावे !!

मनोरंजनाचे ! झाली तू साधन !
अंती जळतन ! तुझ्या नावे !!

बा… तुझा वापर ! शरीर भोगण्या  !
 काटे व टाचण्या ! तुझ्या नावे !!

उठ आता उठ ! संघर्ष कराया !
नवा दाखवाया ! इतिहास !!

हाती तलवार ! लढलीया झाशी !
ना झालीया दाशी ! दुष्मनांची !!

मुलास बांधून ! पाठीवर राणी !
इंग्रजास पाणी ! पाजलेया !!

राज्य संकटात ! धावुनी आल्यात !
अहिल्या ताफ्यात ! स्त्रियासह !!

कालीराम जसा ! अचंबित झाला !
अहिलेस आला ! बा … शरण !!

सुनिता झालीया ! अंतराळ वीर !
मल्लेश्वरी शूर ! जगती या !!

सावित्री घेता तू ! लेखणीस हाती !
स्त्री शिक्षण क्रांती ! घडवली !!

घडतो शिवबा ! जिजाऊ मुळेच !
दिसे त्यामुळेच ! बा… स्वराज्य !!

करुणेची देवी ! दुर्गा जगदंबा !
अत्याचारी खंबा ! तू तोडावा !!

आई होऊनिया ! घर सांभाळशी !
देश सांभाळशी ! शस्र घेता !!

स्व: रक्षणासी ! तू व्हावी जागृत !
तोडूनी विकृत ! हिंसाचारा !!

तूच आहे तुझी ! शिल्पकार जगी !
बाकी आहे ढोंगी ! गा… बाजार !!

आई आत्या आजी ! बहिण वहिनी !
जीवन संगिनी ! व मुलगी !!

नाते तुझे जसे ! तू तसे जपसी !
माउली जपसी ! बंधने तू !!

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ……….
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Friday, 7 March 2014

भक्तांचिया मर्जी , चाले पांडुरंगा ………. 

भक्ताचीया भक्ती ! पांडुरंग ठायी !
भक्त गाथा गायी ! आवडीने !!

भक्तांचिया मर्जी ! चाले पांडुरंगा !
भोळ्या पांडुरंगा !! आदेशती !! 

पांडुरंग माझा ! सखा जिवलग !
आहे नातलग ! अंतरीचा !!

पांडुरंग हरी ! हरी पांडुरंग !
आहे अंतरंग ! पांडुरंग !!

बोला पांडुरंग ! पांडुरंग बोला !
हरी हरी बोला ! पांडुरंग !!

पांडुरंग नामी ! सुखाचा हा शोध !
समाधान बोध ! एकमात्र !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 6 March 2014

जसा प्राण साथी , देहास हो …


गजानन रूप ! ब्रम्हांड स्वरूप !
सत्य समरूप ! बा… समर्थ !!

समर्थ माउली ! उन अन सावली ! 
भक्तास गावली ! वेळोवेळी !!

आम्हा तुझा वर्ग ! गुरुकुल आहे  !!
शिकवण आहे ! ब्रम्हापरी !!

बा… फणसापरी ! गोड आतून तू !
बाह्य कठोर तू ! स्वभावात !!

पावलोपावली ! बाबा आम्हा साथी !
जसा प्राण साथी ! देहास हो !!

स्वामी उपदेश ! एकत्रित जन !
एकतेचे धन  ! बा … अमुल्य !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 28 February 2014

मराठी मराठी ! माउली मराठी !


मराठीच आई ! जणू विठलाई  !
भाषा नवलाई ! महाराष्ट्रा !!

आम्हास मराठी ! आहे भू- अंबर !
विजयी गजर ! स्वराज्याचा !!

मराठी जिजाई ! मराठी रमाई !
जन्म देती आई ! बा… मराठी !!

मराठी ही भाषा ! बोलण्यास गोड !
अंकुरती मोड ! त्या परिस !!

लोखंडाचे सोने ! करितो परिस !
भाषेत परिस ! हो ! मराठी !!

बोलाल तशी ती ! वळते मराठी !
बा… आहे मराठी ! लवचिक !!

जाणाल जेव्हडी ! बा… तेव्हडी खोल !
भावना सखोल ! भाषेत या !!

मराठीची जान ! मराठीचा मान !
आहे अभिमान ! मराठीचा !!

कोहिनूर जसा ! आहे हिर्यांमध्ये !
तशी भाष्यांमध्ये ! बा… मराठी !!

नसानसात हि ! रगारगात हि !
श्वासाश्वासात हि ! भिनलेली !!

रंगतो दंगतो ! जागतो जाणतो !
बा… आम्ही  जगतो ! मराठीत !!

ना झुकेल कधी ! मराठी पगडी !
उभारून गुडी ! अंतरित !!

मराठी भाषेच ! जया ज्ञान आहे !
तै सन्मान आहे ! मराठीचा !!

मराठी मराठी ! माउली मराठी !
होऊ या मराठी ! एकरूप !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर


Tuesday, 25 February 2014

 …….     मथळा  …….

रंगण्यासाठी मी आलो, दंगण्यासाठी मी आलो
मैफिलीत मने या, यारो , जिंकण्यासाठी मी आलो … 

-प्रवीण बाबूलाल हटकर






Monday, 17 February 2014

 कार्याविना शून्य…

कार्याविना शून्य ! कीर्ती तुझी आहे !
कीर्ती तुझी आहे ! बा… कार्यार्थी !!

कार्याविना गती ! कार्याविना शक्ती !
कार्याविना युक्ती ! व्यर्थ आहे !!

बा… तुझी ओळख ! सगुण निर्गुण !
बा… कार्य प्रमाण ! मापदंडे !!

हिटलर क्रूर ! बा… कृष्ण प्रेमळ !
एशु तळमळ ! बा… कार्यार्थी !!

जगी दिसे कार्य ! तो कार्यार्थी आहे !
क्रियाशील आहे ! खऱ्या अर्थी !!

शिवबा स्वराज्य ! बा… भीम घटना !
फुले शिक्षण ना ! कार्याविना !!

तुकाराम भक्ती ! हो गाडगे बाबा !
जनजागृती बा… ! कार्यामुळे !!

कार्य प्राप्तीसाठी ! कार्यशील व्हा !
गतिमान व्हा ! बा… कार्यार्थी  !! 

कार्याविना दिन ! माणसा तू आहे !
बा… कुबेर आहे ! जो कार्यार्थी !!

सद्कार्य उद्देश ! कीर्ती उचावेल !
कीर्ती खालावेल !कु- कार्यार्थी !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Saturday, 15 February 2014

कुछ तो सुना है … हा कुछ तो सुना है 

धूप के पीछे छुपे छाव से 
शहरोसे कोसोदूर गाव से 
पाणी मे तेरती नाव से 
मंजिलसे रुबरु थके पाव से 
कुछ तो सुना है … हा कुछ तो सुना है 


गोरी के लेहराते दुपट्टे से 
ओठो मे दबी मुस्कुराहट से 
बिंदिया के  टीमटीमाहट से 
घुगरुके गुंजे छनछनाहट से 
कुछ तो सुना है … हा कुछ तो सुना है 

पर्वतोसे गुनगुनाते झरनोसे 
सुरजकी चमचमाते किरनोसे 
हातोकि खनखनाते कंगनोसे 
साथी से हात मिलाते अपनोसे 
कुछ तो सुना है … हा कुछ तो सुना है 

-प्रवीण बाबूलाल हटकर  

Thursday, 13 February 2014

(ए मेरी जान ए जहा…  )


ए मेरी जान ए जहा
तू क्यू दूर दूर सी है,
तेरे बगेर मेरी दुनिया 
हाय! चूर चूर सी है  ….


खडा हु राहोमे  तेरी मै
तेरा हमसफर बनके,
तू फुल है चमन का
मै तेरी खुशबू बनके
जानके भी अंजान होकर
क्यू बेखबर सी है
(ए मेरी जान ए जहा …. )

तू धूप  तू छाव
तू दोपेहर तू शाम है
तूही ईश्वर तूही अल्हा
तुही मेरे चारोधाम है
तेरे बगेर मेरी हर सुबह
हाय ! अंधेर सी है ….
(ए मेरी जान ए जहा…  )

तेरे हर गममे आवुंगा मै
मुस्कुराहाट लेकर
बुझे दिल के चिरागो मे
जरासी रोशनी लेकर
ऐ मोहिनी! तू खामोश क्यू ,
क्यू मजबूर सी है ….
(ए मेरी जान ए जहा…  )

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 12 February 2014

ये जिंदगी तू चल, चल  मेरे संग … 

ये जिंदगी तू चल चल  मेरे संग
दुनियाके दिखलाऊ कई तुझे रंग … 

हर कोई जप रहा है 
यहा स्वार्थ कि माला 

इमांदारी को निलामकर 
सच्चाई पे थोपे काला . 
(ये जिंदगी तू चल चल  मेरे संग …)

इन हवस भरी नजरोसे 
बेटी कैसे बचेंगी यारा,

ये सोच सोच के भैया 
उसे पेठ मे मार डाला . 
(ये जिंदगी तू चल चल  मेरे संग …)

ये दोस्त तू ना डर 
ना डर दुनियाके दस्तूर से… 

जो डरा ओ मरा, 
जो झुका ओ कटा 
ये यहा कि रीत है,

शिकार होनेसे पहेले
शिकार करलो तुम 
हार के आगे जीत है… 
  (ये जिंदगी तू चल चल  मेरे संग …)

-प्रवीण बाबूलाल हटकर 


Saturday, 8 February 2014

शायद …

तेरी यांदोके रेगीस्तान मे
चल पडा हु, 
अपनेही सोच के सहारे 
गिरते, लडखदाते, फिर संभालते कदमोसे
तेरी ओझलसे अपनेआप मे गुमनामसे साये के पिच्छे पिच्च्छे 
चल रहा हु … 
शायद अंजान हु मै 
अंजाम ए दासतासे 
क्या मै भूल गया हु 
अपनेही अस्तित्व को 
जो कभी अपनेहिआप से 
रुबरु था आपसे मिलने के पेहले 
जी रहा था, बस जिने के लिये 
ओर आज आपसे होकेभी नही हु मै उसमे कही  
ऐ पेहली, जी रहा हु मै मर मर के 
अब तो ऐसे लग रहा है 
के मै मर जाऊ 
शायद हा शायद … 
तेरे बगेर मै  मर के जी लु जरा… 

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 7 February 2014

(ये सुबहकी पेहली किरण …. )


ये सुबहकी पेहली किरण
आकर तू मिल मुझे 
मेरी रुह्से गुफ्तगू कर
तेरी बाहोमे लिपट मुझे … 

तेरी नरम नरम धुप 
मेरी सांसोके मेह्काये 
मचले, बदले हुये दिलमे 
बेहकि बेहकि हलचल सुनाये … 
(ये सुबहकी पेहली किरण …. )

ये किरण तू आं, आ जा जरा 
मेरी सोचसे सोच मिला ले जरा 
तेरे बगेर मेरी सोच अंधेरसी है 
तू आकर रोशनीसा कर जा जरा …. 
(ये सुबहकी पेहली किरण …. )

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 30 January 2014



गुरुविना मार्ग ! कसा मिळे? 

गुरु मज भेटी ! बा… हरेका जागी !
शिकवण जगी ! जेथे मिळे !!

गुरु देई ज्ञान ! सगळ्यासी एक !
बा… घेई हरेक ! त्यास्वरूप !!

गुरु समरूप ! जो असे जितका !
ज्ञानार्थ तितका ! त्यासी मिळे !!

गुरुचा आदर ! अंतरी असावा !
वरती नसावा ! बा… देखावा !!

द्रोणाचार्य शिश्य ! बा… अनेक होती !
अर्जुनासी होती ! ना… कुणीही !!

एकलव्य बघा ! मूर्तीस पुजून !
बा… लीन होवून ! ज्ञानी झाला !!

गुरु एकरूप ! गुरु समरूप !
ज्ञानार्थ स्वरूप ! त्यासी मिळे !!

गुरु ज्ञानबोध ! बा… ज्यासी होईल !
कल्याण होयील ! जगी तया !!

गुरु वर ज्याचा ! विश्वास असेल !
ज्ञान हे मिळेल ! आशीर्वादी !!

गुरूची मस्करी ! ज्ञान व्यर्थ होई !
ज्ञानार्थ ना होई ! आकलनी !!

आई गुरु होता ! शिवाजी घडले !
आम्हास कळले !  हो ! स्वराज्य !!

सुरवात केली ! महिला शिक्षण !
देत शिकवण ! सावित्रीसी !!

गुरूची महती ! गुरूची संगती !
मिळे ज्ञान गती ! जीवनाला !!

ध्येयाविना लक्ष ! मोक्षाविना स्वर्ग !
गुरुविना मार्ग ! कसा मिळे? !!

(अभंग … )
 -प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 29 January 2014

मजला आधार ! विठू नाम

प्राणवायू हवा ! जीव जगण्यासी !
जीवा जगण्यासी ! विठू नाम !!

अकर्म नष्टती ! सकर्म उदयी !
सकर्म उदयी ! विठू नाम !!

होई सत्य कर्म ! होई सत्य धर्म !
सत्य कर्म धर्म ! विठू नाम !!

दिन दुबळ्यासी ! बा… सेवा अर्पावी  !
नी मुखी वंदावी ! श्री वचने !!

वटवृक्ष जसा ! वेलीस आधार !
मजला आधार ! विठू नाम !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 24 January 2014

            कई दूर …. 

तेरी निघाहोसे बिखरते हुये कुछ आसुओको
मेरी पल्कोपे सवारकर, ले जाणा है…
कई दूर…  कई दूर… 


तेरी दबी दबीसी आवाज, अपने आपमे उलझी है  
मेरे ओठोसे पुकारकर, ले जाणा है … 
कई दूर…  कई दूर …. 


तेरी थकी थकी सी सांस, रुकी रुकी सी सांस 
मेरे सांसमें मेह्काकर, ले जाणा है … 
कई  दूर… कई  दुर… 

अपने आपमे खोयी खोयीसी तेरी हर सोच 
मेरी सोचसे मिलाकार, ले जाणा है … 
कई दूर … कई  दुर… 

तेरे तुटे हुये, साथ छुटे हुये, हर लम्हो को 
मेरे लम्होके साथ जोडकर, ले जाणा है … 
कई दुर… कई दूर … 

तेरी बुझी बुझिसी, रुठी रुठी सी दुनिया को 
मेरे जन्नत ए जहासे रुबरुकर, ले जाणा है … 
कई दूर… कई दूर …. 

-प्रवीण बाबूलाल हटकर  

Friday, 17 January 2014

जीवन म्हणजे ! संकटी बुरुज !
हरेका खरुज ! जीवनाला !!

संकट करती ! संघर्षा प्रवृत्त !
संकटा निवृत्त ! करण्यासी !!

संकट म्हणजे ! समस्यांचा डोह !
मधमाशी मोह ! चावतोया !!

संकटी वादळे ! समस्यांचा पूर !
भयाचे आसुर ! बा… आणती !!

गा… अशात त्रासु  ! नये… खचू नये !
आत्मजान नये ! हरवूया !!

निर्भीड जयाचा ! आत्मस्तम्भ आहे !
समस्यांचे आहे ! पलायन !!

विचार सक्षम ! प्रचंड विश्वास !
संकटी प्रवास ! बा… सहज !

हरेका संकटा ! मागे आहे मार्ग !
मिळतोया स्वर्ग ! शोध घेता !!

समस्याही आहे ! निवारण आहे !
मनगटी  आहे ! जोर ज्याच्या  !!

मन स्थैर्य  आहे ! निर्भीड जो आहे !
सक्षम तो आहे ! तोंड देण्या !!

संकटी शिकार ! होण्या पूर्वी कर!
निर्भीड शिकार ! संकटांची 
अभंग
-प्रवीण बाबूलाल हटकर


Wednesday, 1 January 2014

मज तुझ्या नाम स्वार्थ, पांडुरंगा…

पांडुरंग माउली तू !
पांडुरंग सावली तू !
बा… पावलोपावली तू !
पांडुरंगा !!

नाम तुझ्या परमार्थ !
देवा समर्थ समर्थ !
मज तुझ्या नाम स्वार्थ!
पांडुरंगा !!

माझा हट्ट, माझी  जिद्द !
पुरवी साक्षात सिद्ध !
बा… भक्तीत मी समृद्ध !
पांडुरंगा !!
(अभंग … )

-प्रवीण बाबूलाल हटकर