Thursday, 19 December 2013



संदेश करिती,  अपुले नेतृत्व … 

बा… संदेश  आहे ! आम्हा उपयोगी !
जानुया प्रयोगी ! सहजच !!

संदेशवहन ! मिळे प्रत्येकात !
कण-ब्रम्हांडात ! व्यापियले !!

सजीव निर्जीव ! दृश्य अदृश्यात !
हरेका जीवात ! बा… संदेश !

गा… संदेश भाव ! सकारात्मकता !
नकारात्मकता ! उद्देशती !!

पशू, पक्षी ह्यांच्या ! हालचाली, कृती !
निसर्ग प्रकृती ! संदेशच !!

धर्म व संस्कृती ! चाली आणि रिती !
बा… नियम, नीती ! संदेश हो !!

संदेश महत्व ! उद्देश सांगती !
संदेश उत्पती ! भाव देई !!

संदेश वहन ! हवे सदाचारी !
नको दुराचारी ! अविचारी  !!

चालता बोलता ! हसता रडता !
कृती करताना ! होई बोध !

हरेका बोधात ! बा … संदेश आहे !
नी उद्देश आहे ! प्रमाणित !!

येशु संवेदन ! कृष्ण प्रेमरूप !
संदेश स्वरूप ! दिले आहे !!

बोद्ध शांतीसाठी ! बा… विवेकानंद !
संदेश स्वानंद ! ज्ञानासाठी !!

प्रवीण उद्देश ! संदेश सुयोग्य !
नसावा अयोग्य ! कृतीतून !!

संदेश करिती ! अपुले नेतृत्व !
नी प्रतिनिधत्व ! विचारांचे !! 

संदेशचा अर्थ ! भाव मनातील !
कृतीत येतील ! उद्देशातून !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 16 December 2013

तुझ्या जाणीवांत, तू उतर…


जे ते आहे येथे ! आगळे वेगळे !
ना आहे सगळे ! एक सम !!

कासवाची चाल ! हळुवार आहे !
बा… कठीण आहे !  पाठीवर !!

परिस दिसतो ! जसा तो दगड !
स्पर्शता लोखंड ! होई सोने !!

हरेकात आहे ! बा… वेगळेपण !
ओळखावे गुण ! स्व: आंतरी !!

सरपट चाल ! नागराज करी !
बा… खेकडा करी ! पायखेच !!

गांडूळ जमीन ! सुपीक करितो !
नेत्रास भासतो ! गा… लहान !!

फुलात सुवास ! काट्याचे बोचणे !
त्यारूप असणे !गुणधर्म !!

कोणी शक्तिरूप ! कोणी भक्तिरूप !
कोणी उक्तिरूप ! बा… असता !!

हरेक सामान्य ! त्यात असामान्य !
बा… गुण प्राविण्य ! दडलेत !!

बगळा हा धूर्त ! कोल्हा हा लबाळ !
तै झाली ओळख ! बा… स्वभावी !!

एकसंघ काम ! मुंग्या शिकविती !
एकीचे दाविती ! बळ सर्वा !!

वेगळेपण ही ! स्वतंत्र ओळख !
जीवन ओळख ! बा… होण्यास !!

चाणक्य नीतीही ! अत्यंत कुटील !
त्यासम कुटील ! ना चतुर !!

अश्यू बोद्ध जणू ! शांतीचे प्रतिक !
प्रेमाचे प्रतिक ! वासुदेव !!

मानवा तू आहे ! खरा बुद्धिवंत !
तुझ्या जाणीवांत ! तू उतर !!

भावना प्रधान ! संवेदन मन !
प्राप्त हे जीवन ! वेगळेची !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर. 

Friday, 6 December 2013

विठ्ठल मोकळा श्वास …

विठ्ठल मोकळा श्वास ! विठ्ठल धुंद सुवास !
विठ्ठल मुक्त प्रवास ! जीवनाचा !!

विठू नाम समाधान ! विठू एकचित्त ध्यान !
विठू अमुचा प्रधान ! स्वाभिमान !!

विठ्ठल बेधुंद वारा ! विठू  आसमंत सारा !
बा… प्रकाशमयी तारा  !! भक्तासाठी !!

विठू अमुचा प्रमुख ! विठू अमुचा ठाकूर !
बा… अमुचा शिल्पकार ! पांडुरंग !!

विठ्ठल विठ्ठल हरी ! हरी हरी पांडुरंग !
भक्त गण दंग दंग !  नाम हरी !!

(अभंग … )

-प्रवीण बाबूलाल हटकर   

Thursday, 5 December 2013

          पांडुरंग पांडुरंग ...

                   अभंग...
पांडुरंग पांडुरंग ! विठू विठू हरी हरी !
बा… विठ्ठला हरी हरी ! पांडुरंगा !!

पांडुरंग पांडुरंग ! नाद मनी गुंजतोय !
स्पंदनात विरतोय ! भाव  नवा !!

पांडुरंग पांडुरंग ! युगे उभा विटेवरी !
भक्त पुंडलिका करी ! विनवणी !!

पांडुरंग पांडुरंग ! पुंडलिक झाला दंग !
आई-बाबा सेवा-रंग! रंगुनिया !

पांडुरंग पांडुरंग ! प्रवीण अंतरी जागा !
आई-बाबा सेवा त्रागा  ! नका करू  !!

-प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 3 December 2013

"काळोखी एकांताचा कल्लोळ" …

अंधार पसरत चाललाय,
सर्वजग काळोखमय झालय,
पुढे-मागे, आजूबाजूने अंधारच अंधार… 
निशब्ध, स्तब्ध बेसावध अंतरित 
अचानक ! अशांत बेधुंद काळोखी वारे
बेरंगी भयास, मनरूपी घरट्यात जागा देतात. 
मग सुरु होतो "काळोखी एकांताचा कल्लोळ" … 
संवेदन शांत मनात भयचा तांडव सुरु होतो. 
'मन-नटरंग' उलटा नाच नाचू लागतं नी आक्रोश करू लागतं. 
जणू मनातल्या मनात आसुरी काळोखाने
घट्ट गळा दाबलाय शांततेचा 
नी ओरबाळून काढली आहे अन्ननलिका
अखेरच्या 'श्वासासह'… 
तितक्यात एका धाडसी विचारासह भयाच्या 
अंधारमय खोल-खोल तीमिराच्या खायीत
कवडस्यातून एक किरण गतीने येतो,
हजारो, लाख्खो काळोखी भयमय असुरांचा वध करत  
त्यांना चिरत-चिरत पुन्हा आपल्या प्रकाशरूपी साम्राज्याला
प्रस्तापित करताना, अगदी सहजच … 
ह्या तेजोमय, दिपोमय, यशोमय व कीर्तिमय दिव्यश्या अफाट,
अदभूत, प्रकाशास… सलाम !! सलाम !! सलाम !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 29 November 2013

पुन्हा एकदा पोस्ट करतोय … 

// अ‍ॅबार्शन सक्सेस...! //

हॅलो मॅम... नमस्कार समाजसेवक साहेब
मी भ्रूण बोलतोय...
अरे हे काय? आई प्राध्यापिका तर बाबा समाजसुधारक
हे कळताच अत्यंत खूष झालोय.
ही कल्पना त्यांच्यासाठी आनंददायी होती व माझ्यासाठीसुद्धा!
गर्भसंस्कार व्हावेत म्हणून बाबांनी आईला वेगवेगळे ग्रंथ, नाव्हेल्स आणून दिलीत.
आई स्वतः प्राध्यापिका असल्यामुळे रात्रंरात्र जागून मोठ्या आवडीने
ते सारे वाचून काढायची, मीसुद्धा ऐकायचो.
बाबा आईच्या पोटाला कान लावत, तासनतास गप्पा मारायचे अन
माझ्या हालचालींवर लक्ष द्यायचे. त्यांना उत्सुकता होती माझ्या आगमनाची.
माझ्या नाजुक स्पर्शाने त्यांनाही शहारून जायचे होते.
ती वेळ आली, मी कोण? हे जाणून घ्यायची...
मला विचित्र वाटलं, मी कोण? हे आपणांस का जाणून घ्यायचे?
पण भ्रूण जाणून घेणे हा तर गुन्हा आहे ना!
मग तरिसुद्धा आई-बाबा व डाक्टर साहेब,
आपण असे का करत आहात?
मी थोडा विचार केला, माझे आई-बाबा खरंच ग्रेट आहेत.
पण मला आपल्याला सरप्राईज करायचे आहे ना! प्लीज...
मला सोनोग्राफी मशिनमध्ये टाकले. हळूहळू माझे चित्र स्क्रिनवर दिसू लागले.
डाक्टर साहेब म्हणाले, '' अभिनंदन! आपण एका मुलीचे वडील होणार आहात! ''
मला फार आनंद झालाय... कारण पोटात असताना आईने वाचलेले- जिजाऊने
शिवबा कसा घडवला, अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी, मदर तेरेसा,
हल्लीच अंतराळात जाऊन आलेली सुनीता विल्यम्स
यांची कार्य-कीर्ती खरंच किती महान आहे. मलाही तसंच बनायचंय आई-बाबा!
दुस-या दिवशी आई-बाबा हास्पिटलमध्ये आलेत. ते तणावात दिसले.
आणि हे काय? नको डाक्टर साहेब, आई... बा...बा... तुम्हीसुद्धा!
मी... काय केले? न...को... आ... आ...!
थोड्या वेळेनंतर डाक्टरांनी बाबांशी हात मिळवला- '' अ‍ॅबार्शन सक्सेस...! ''
आई-बाबा आनंदित आहेत! अहो, मला एका पिशवीत गुंडाळून
चक्क कचरापेटीत टाकलंय! माझी हत्या केलीय माझ्याच आई-वडिलांनी!
ते दिवस आठवलेत... बाबा 'भ्रूणकन्येचा टाहो' या विषयावर बोलताना
तासनतास भाषणे ठोकायचे अन वाह... वाह... मिळवायचे!
आई, तू स्वतः स्त्री, मग तुझेही काळीज कसे पाझरले नाही गं?
डाक्टर साहेब, आपण तर लोकांचे जीव वाचवता, पण आपणच कसे कसाई झालात?
... आजी नेहमी म्हणायची- '' मुलगा हा दीप असतो तर मुलगी दिव्यातील ज्योत...! ''
आजी, आज पुन्हा एकदा प्रकाशण्या आधीच ज्योत विझवली आहे!!!

- प्रविण बाबुलाल हटकर

Thursday, 28 November 2013

बा… स्पर्श पहिला…

पहिला हुंकार ! बा… आर्त पुकार   !
गा… जीवन सार ! आई आम्हा  !!

शांत संवेदन ! आईचे जीवन !
आहे संजीवन ! आई आम्हा !!

ममतेची मूर्ती ! वात्सल्याची काया !
'वटवृक्ष' छाया ! आई आम्हा !!

वेदनेची आहे !हाक तू पहिली ! !
 गुरु तू पहिली  ! आई आम्हा !!

बा… स्पर्श पहिला! जाणीव पहिली !
ओळख पहिली ! आई आम्हा !!

(अभंग … )

-प्रवीण बाबूलाल हटकर


Tuesday, 26 November 2013

शिकवणी मूळ, सहज सरळ … 


शिकवण हवी ! सरळ  नि सोपी !
सहजच डोकी ! उतरावी !!

नसावी कठीण ! बा… गुंतागुंतीची !
न  उमजण्याची !  ती नसावी !!

कठीण समस्या ! सोपी शिकवण !
सहज गमन ! ज्ञात होई !!

सुगरण खोपा ! शिकवितो असे !
बा… जगावे कसे  ! सहज हो !!

भाग खळकात ! फुलतो पळस !
शिक जीवनास ! नवी देतो !!

शिकवणी भाषा ! विषया धरून !
जायील वरून ! नाहीतर…  !!

कमळ  उमले ! चिखल जागेत !
सुंदर जगात ! एकमेव !!

बा… मुंगी लहान ! हो… शिक  महान !
 एक संघ छान ! कार्य करी !!

मार्ग हे कठीण ! सहज पद्धत ! 
उद्धिष्ट कामात ! सोपी होई !!

उद्दिष्ट माहिती ! आवश्यक आहे !
मग सोपे आहे ! जगणे हो !!

शिकवणी मूळ ! सहज सरळ !
आकाश नी  तळ ! उमजेल !! 

-प्रवीण बाबूलाल हटकर 
दोन चरण.............

तुझा वाटसरू !
शोध तुझा सुरु !
  
सांग कसा धरू !
 मृगजळा !!


मृगजळ  कसे !
​​
धावले सुसाट !

करुनी पिसाट !
माझ्या मना !!

-प्रवीण हटकर.

Saturday, 23 November 2013

"मोठा दानशूर" 

हवे ते ते देत गेलो 
मागणा-यास मी,
घेणारही माझ्याकडून घेत गेला,
नी म्हणत गेला भाऊ दादा, आपण 
मदतीला धावून आलात अगदी 
युदीस्टीर वा  कर्णाप्रमाणे  … 

व मी नित्यनियमाने देत गेलो 
परतीची हमी न घेता 
माझ्याकडे असो व नसल्यास… 
नावावर कारण तसा मी नामवंत तर 
होतोच व धनवंत सुद्धा … 
देता देता पैसा अडका, 
एकदिवस 'नितीमुल्य व आत्मसन्मान' ही 
देऊन बसलो … 

आता माझ्याकडे देण्यासारखे काय ?
प्रश्न पडतोय ना ?
तो वेडापीर दिसतोय ना ?
फाटक्या नि कर्दमलेल्या वेशात 
त्याला कधीकाळी "मोठा दानशूर" म्हणायचे …
हो तोच मी "कफल्लक फकीर"… …  हा हा हा … 

-प्रवीण बाबूलाल हटकर. 

Monday, 18 November 2013

अनंत स्वरूप आहे, पांडुरंगा… 

पांडुरंग दरबारी ! जमलेया वारकरी !
बा… भजतोया अंतरी ! पांडुरंगा !!

पांडुरंग कोण आहे ! जीवनाचे सार आहे !
अंतरीची हाक आहे ! पांडुरंगा !!

पांडुरंग काय आहे ! कण ते ब्रम्हांड आहे !
अनंत स्वरूप आहे ! पांडुरंगा !!

आयुष्या गवसलेला ! पांडुरंग अर्थ आहे !
एकमेव सत्य आहे ! पांडुरंगा !!

पांडुरंग पांडुरंग ! गा समर्थ पांडुरंग !
बा… अमुचे  अंतरंग ! पांडुरंगा !!

(अभंग… )

- प्रवीण बाबूलाल हटकर. 

Thursday, 7 November 2013

यशप्राप्ती साठी, आत्मशक्ती जागा…

यश अपयश ! अर्थ हा सहज !
व्याप्तीत गरज ! उमजण्या !!

यश प्राप्ती होणे ! हा नाही शेवट !
ना आहे शेवट ! अपयशा !!

एका यशासाठी ! खुपदा हरतो !
अपयशी होतो ! लाखवेळा !!

बा… अपयशात ! वादळी उत्तरे !
प्रश्नाची भ्रमरे ! त्रास देती !!

बा… जोवर यश ! प्राप्त होत नाही !
गा… तोवर नाही ! मनशांती !! 

यशप्राप्ती होता ! अपयशी दोष !
मनातील रोष ! मिटतात  !!

अपयशी होता ! खचू नका तुम्ही !
हतबल तुम्ही ! नका होऊ !!

अपयश हाच ! बा… शेवट नाही !
राज्या अंत नाही ! प्रयत्नांचा !!

प्रयत्न जोवरी ! तोवरी संघर्ष !
शेवट निष्कर्ष ! बा… प्रयत्नी !!

प्रयत्नी निष्फळ ! अपयशी होतो !
फळप्राप्ती होता ! यशवंत…  !!

यशप्राप्ती साठी ! आत्मशक्ती जागा !
बा… विश्वासी जागा ! स्व: बळास !!

आपण हे करू ! स्व: विश्वास होता !
अपयश जाता ! दूरदूर !!

होता आत्मज्ञान ! आणि आत्मजान !
यशवंत मान ! हमखास !!

यश अपयशा ! सुख दुख मिळे !
जीवनाचे ताळे ! समजण्या !!


(अभंग … )
 -प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 6 November 2013

  माझी तू जाणीव, गजानना …


आंतर आवाज ! बा… प्राण सजीव !
माझी तू जाणीव ! गजानना !!

एकरूप चंद्र ! एकरूप सूर्य !
चांदण्या तू सर्व ! गजानना !!

सजीव निर्जीव ! श्रीमंत पामर !
तूच भू, अंबर ! गजानना !!

ज्ञान ब्रम्हरूप ! गा… माउली रूप !
बा… ब्रम्हांडरूप ! गजानना !!

तूच अभिमान ! तूच स्वाभिमान !
नाम समाधान ! गजानना !!

भक्तंचा वारसा ! समाज आरसा !
समर्थ बा… असा ! गजानना !!

मंत्र एकतेचा ! जोडलेया गण !
गणात जोडून ! गजानना !!

(अभंग…  )
-प्रवीण बाबूलाल हटकर  

Tuesday, 5 November 2013

मृत्यू नंतरही, विचार हे अमर..
मोठा धनवान ! आहे तू जगात !
वर मिजाशात ! वागणूक !!

नौकर चाकर ! घोडा गाडी आहे !
जे हवे ते आहे ! तुज पाशी !!

सारे काही केले ! काबीज जे हवे !
यात नाही नवे ! ऐक माझे !!

हिटलर आला ! जग जिंकलेया !
नाच जिकलेया ! मृत्यूस हो !!

धन नाते गोते ! येथेची राहिले !
सोबती ना गेले ! आप्तजन !!

व्यक्ती जातो मात्र ! राहती बा… शब्द !
ओळख प्रारब्ध ! कृतीतून !!

विद्वान आले व ! गेले अनंतात !
राहिले मुखात ! तै विचार !!

गा… विवेकानंद ! संत तुकडोजी !
गा… साने गुरुजी ! ख्यातनाम !!

तात्पर्य एव्हडे ! सांगायचे खास  !
मृत्यू हा जीवास ! ना विचारा !!

विचार ओळख ! कृतीत अमर !
जीव नशवर ! जायील तो !!

प्रवीण विचार ! प्राधान्य विचारा !
बा… अमृतधारा ! जीवनास !!

धन आज आहे ! उद्या न माहिती !
विचाराची  गती ! बा… अमर !! 

मृत्यू नंतरही ! विचार हे अमर !
ना कधी पामर ! जो … विचारी !!

ज्याच्या कडे आहे ! विचारांचे अश्व !
बा… आदर विश्व ! त्याचा करी !!

(अभंग… ) 
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 14 October 2013


विश्वास ना येई, वारसा हक्काने … 

बा... दिन-दुबळा
त्यासी म्हनावेत !
स्व:विश्वास  ज्ञात 
ज्यासी नसे !!


स्व: विश्वास  असे 
जया अंतरंगी !
तो निडर जगी 
गा… वावरे  !!

विश्वास फुलतो 
सहजच अंगी !
स्पष्ट ज्याचे जगी 
गा… विचार !!

विश्वास ना येई 
वारसा हक्काने !
येतो हिमतीने
स्व: अंतरी !!   

विश्वासी समर्थ 
लाभे कार्य अर्थ 
ना लाभे कार्यार्थ 
अविश्वासी !!
(अभंग … )

-प्रवीण बाबूलाल हटकर 



Saturday, 12 October 2013

गजल

ऐकण्या-वाचण्या सारखा मी कुठे ?
संग्रही ठेवण्या सारखा मी कुठे ?

तू जरी मानले आरश्या सारखे
नेहमी पाहण्या सारखा मी कुठे  ?

हौस भागून घ्यावी कुणी आपली
लाकडी  खेऴण्या सारखा मी कुठे ?

तू  जशी मखमली मोग-या सारखी 
रेशमी चांदण्या सारखा मी कुठे ?

झाड माझे असे बाभळीचे गडे
अंगनी लावण्या  सारखा मी कुठे ? 

-शिलवंत सिरसाट   
मो:

तुझा दो घडीचा सहारा पुरेसा
ध्रुवा सारखा एक तारा पुरेसा

अपेक्षा न केली कधी बंगल्याची
मला झोपडीचा निवारा पुरेसा

कुपोषीत झाली पिले पाखरांची
जयाना मिलाला न चारा पुरेसा

जगाया नको मज दुआ मौलवींची
तुझा एक साधा इशारा पुरेसा

पिढ्या नष्ट झाल्या पशू-पाखरांच्या
हवा जंगलाना पहारा पुरेसा

 -शिलवंत सिरसाट

Wednesday, 2 October 2013


कर्म से उपर,ना कोई है … 


सच्चाई को धर्म ! झुटांई अधर्म !
पाप पुण्य कर्म ! दोनोसेही !

दिनरात पूजे ! राम चरित को !
साथ अधर्म को ! व्यर्थ हि हैं !!

साथ सच्चाई को ! प्रभू साथ रहे !
हा जीवन रहे ! खुशहाल !!

सून मेरे भाई ! प्रवीण सुनाई !
हैं सुनिसुनाई ! बात यह!

जैसा बोया वैसा ! आज तुने पाया !
नाही दुजा आया ! आजतक !!

बोवोगे करेला  ! ना आयेंग गन्ना !
 पोंओगे वहिना ! जो है बोया !!

सच्चाई से सच ! सकारात्मकता !
झुठ्से झुठता ! फरेबहि !!
     
धर्म या अधर्म ! आप पे निर्भर !
कर्म से उपर ! ना कोई है !!

कर्म सच्चाईसे ! सुकून पोंओगे !
या पछताओंगे ! अकर्मसे !!
 (अभंग )
-प्रवीण बाबूलाल हटकर .

Saturday, 21 September 2013

भूत,वर्तमान,भविष्य …

जाणुया भविष्य ! भूत वर्तमान !
काळ  आहे तीन ! जगण्याचे !!

भूतकाळ जसा ! घडून गेलाय !
मात्र उरलाय ! आठवांत !!

बा… कडू वा  गोड ! भूतकाळ असो !
गुंतलेला नसो ! सदोदित !!

भूतकाळ असो ! अनुभव साठा !
वर्तमानी तोटा ! ना होयील !!

वर्तमानी आहे ! सध्या चालू स्थिती !
कार्य काळ नीती ! राखण्याची !!

वर्तमानी कार्य  ! बा… जे  जे होयील !
भविष्या मिळेल ! फळ ते ते !!

ना देखिले ऐसे ! पेरले दुसरे !
मिळाले तिसरे ! आजवर !!

बा… काटे पेरता ! फुल ना मिळेल !
काटेच मिळेल ! नियम हा !!

भविष्य म्हणजे ! जे होणार आहे !
होत काळा आहे ! पूढे तोचि !!

उत्तम भविष्य ! जगतो आपण !
भूत, वर्तमान ! कार्यातून !!

भूतकाळ असो ! अनुभवपूर्ण !
असो  कार्यपूर्ण ! वर्तमान !!

प्रवीण  भविष्य ! साकार झालेया !
वर्तमानी केल्या ! कार्यातुनी !!
(अभनग… )

-प्रवीण बाबूलाल हटकर

Friday, 20 September 2013

   तो क्या बात है  ….
   हर समझ को कोई समझ जाये
   तो क्या बात है
  हर इंसा इंसानियात को समझ जाये
  तो क्या बात ही ….

 मैने तो देखा है  पत्थारोको पिघलते हुये
  ए  दोस्त
 एक तेरा दिल पिघल जाये
  तो क्या बात है …

  तेरे डरसे जी रहा हु … जिया हु
  मर मर के सो बार
  "दुश्मन" तेरा खात्मा कंर मोत सरहद पे हो जाये
  तो क्या बात है … 

  -प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 19 September 2013

विचार …


विचारातील  दानव  …
अपुल्या विचारमयि सागरात 
गढूळतेचे काम करतात …
मग काम मत्सर भेदभाव क्रूर भावनाचे हलाहल 
उठते नि   विचारातील  देवाला… विषमय करण्याचा प्रयास करतात 
न चुकता … अगदी राजरोस 
पण 
विचारातील देव… 
हा गीता बायबल  कुराण धम्म धर्म ग्रंथसागरातील 
अमृतमय विचारांनी सत्यार्थ पवित्र असल्यास 
दानव विचारातील मलीनता दूर करतात 
 … अगदी सहजच … 
तात्पर्य …
वाल्याचा वाल्मिकी व अंगुलीमाल  यांचे दानवरूपी विचार
सकारात्मक देवरूपी विचारात विलीन झालेच ना …

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 18 September 2013

 जेष्ठ राजाय नम: !  निधिपतेय नम: !
पूषदंतभिदे नम : ! क़िरीटीने !!

  हिरण्ययपुरान्त: - ! स्थाय नम : नमो नम: !
कुलपालनाय नम : ! कुंडलीने !!

    कराहतीविध्वस्त - ! सिंधूसलीलाय नम : !
  वनमालिने नम : !  हारिणे !!

 सूर्यमंडलमध्य- ! गाय, सुरूपाय नम : !
 मनोमयाय नम: !  पुरुषाय !!

 उमाड्ककेलीकुतू ! कीने,  प्रसहनाय !
 विरासनाश्रयाय ! देवत्रात्रे !!

 वैमुख्यहतदैत्य - ! श्रिये,  खंडरदाय !
स्मरप्राणदिपकाय ! सर्वात्मने !!


  नमो सद्योजातस्वर्ण- ! मुज्जमेखलिने नम : !
 पीताम्बराय नम :! ब्रह्ममुन्ध्र !!

नमो पादाहतिजित- ! क्षीतये, भालचंद्राय !
नमो वायुकीलकाय !  गुणीने !!

 नादप्रतीष्टीष्टाय !  विरासनाश्रयाय !
सर्वनेत्राधिवासाय ! गणपाय !!

नमो खडेंन्दुकृत- ! शेखराय, प्रथमाय !
नमो गनाधीराजाय ! विष्ट्पीने !!

नमो चित्राक्ड.श्याम- ! दशनाय, प्रतापिने !
गजपतीध्वजिने ! मुनिपदे !!

नमो चतुर्भुजाय ! नमो योगाधिपाय !
नमो तारकस्थाय ! बलीने !!

गजकर्णाय नम : ! विजयस्तीराय नम : !
देवदेवाय नम : ! शैलोरवे !! 

विपच्श्रीत   

Thursday, 12 September 2013

प्रभू गणपती यांच्यावरील हजार नावे अभंगातून माडण्याचा प्रयत्न … 
आज ७७ नावे … 

  गणेश्वराय नम:! गनक्रीडाय नम: !
गणनाथाय नम: ! सिद्धये !!

ॐ गणाधिपाय नम: ! ॐ एकद्रुष्टाय नम: !
ॐ वक्रतुंडाय नम: ! ॐ बुद्धाय !!

ॐ गजवक्राय नम: ! ॐ महोदराय नम: !
ॐ लंबोदराय नम: ! ॐ  भीमाय !!

ॐ धुम्रवर्णाय नम : ! प्रभू विकटाय नम : !
ॐ विघ्ननायकाय नम : ! शम्भवे !!

स्वामी सुमुखाय नम : ! जय दुर्मुखाय नम : !
प्रभू  आमोदाय नम : ! ॐ घुनये !!

श्री गजाननाय नम : ! जय प्रमोदाय नम : !
ॐ विघ्नराजाय नम : ! ॐ निधये !!

ॐ सुरानन्दाय नम : ! ॐ मदोत्कटाय नम : !
स्वामी हेरम्बाय नम : ! ॐ कवये !!

नमो शम्बराय नम : ! ॐ लम्बकर्नाय नम : !
ॐ महाबलाय नम : ! ॐ जयाय !!

जय नन्दनाय नम : ! ॐ अलम्पटाय नम : !
स्वामी अभिरवे नम : ! अविघ्नाय !!
ॐ मेघनादाय नम : ! ॐ गणज्जयाय नम : !
ॐ विरूपाक्षाय नम : ! तुम्बुरवे !!

ॐ विनायकाय नम : ! ॐ धीरशुराय नम : !
ॐ वरप्रदाय नम : ! शालकाय  !!

ॐ महागनपतेय ! ॐ सिद्धिविनायकाय !
ॐ मुशकवाहनाय ! दुर्जजाय !!

ॐ बुद्धिप्रियाय नम : ! ॐ क्षिप्रप्रसादनाय !
ॐ नमो गणाध्यक्षाय ! सम्मिताय !!

ॐ उमापुत्राय नम : ! अघनाशयाय नम : !
कुमारगुरवे नम : ! अमिताय !!

ईशानपुत्राय नम : ! ॐ सिद्धीप्रीयाय नम : !
ॐ सिद्धिपतये नम : ! धूर्जयाय !!

सिहवाहानाय नम : ! मोहिनीप्रियाय नम : !
  ॐ कटूद्कटाय नम : ! भूपतये !!

गणेश कृष्मांड- ! सामसम्मुतये नम : !
ॐ राजपुत्राय नम : ! विश्वकत्रे !!

भुवनपतेय नम :! भूतांना पतये नम : !
ॐ विश्वमुखाय नम : ! ब्रम्हण्याय !!

ॐ विश्वरूपाय नम : ! कविणामृशभाय !
नमो ब्रम्हणस्पतये नम : ! मुक्तिदाय !!
पुढे आहेत …
-प्रवीण बाबूलाल हटकर  

Thursday, 5 September 2013

​         पांडुरंग शिकवण … 

​विठ्ठल नाम स्मरता ! दुख जाई क्षणार्धात !
​माउलीची लीला ज्ञात ! आज आम्हा !!

​पांडुरंगा तुझा ठाम ! उभ्या हसऱ्या पिकात !
​गाव- गाव शिवारात ! डवर्यात ​!!

​पांडुरंगा तुझा वास ! बा… अनंत अनंतात !
​गा…माझ्यातून तुझ्यात  ! ​अंतरी या !!

​पांडुरंग शिकवण ! काम देव काम धर्म !
​बा… सत्यार्थ  मर्म कर्म ! तू जपावे !!

(अभंग)
-​प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 2 September 2013

सोच…

अपनेही आपसे परेशान
होकर मै चल पडा …
 रबसे लढने के लियॆ
मनमे इरादा पक्काकर
मै रब के दरबार पोहचा
खूब लढा, डाटा ओर पुच्छा
 ऐ  रब…
इस जहा मै
मुझेही अकेला क्यू बनाया
एक दोस्त के बिना मेरी जिंदगी
अधुरी है परेशान हे खुद्सेही उलझी है
 मै सोचते सोचते अकेला गिर जाता हु
हर सोच मेरी अपने आपमे गुमशुदा हो जाती है
हर सोच मे मुझे मेरे दोस्त कि कमी ढल जाती है
ये सोच सोच कर मेरी सोच अकेलेमे काप उठती है
अब ये सोच मन के उठते ज्वालामुखी के साथ
ऐ  रब …तुझसे सवाल पुच्छ रहा  है …
गर नही बता सकते हो मुझे दोस्त न मिलने की वजह
तो मै ईसी सोच मे तडप तडप कर मर जाऊंगा …
 तभी एक आकाशवानी हुयी
मूर्ख इसमे परेशान होणे की  क्या बात है …
मैने तो आपको दोस्त दिया है …
ओ रोज आपसे गपशप करता है
आपकी परेशानी से लढता है
ओर ओ दुसरी कोई नही आपकेही अंदर
अपनेही आपसे उलझी हुई आपकी "सोच" है
आपकी एक सही सोच आपका जीवन बदल सकती है
एक सच्चा साथी, एक सच्चा दोस्त आपकी सही सोच है  …

Wednesday, 28 August 2013

युगो-युगोसे सिनेमे
गमोके बीज बोये है
मुस्कुराते पल्कोके नीचे
हम बंद अखीयनमे रोये है …

आंधी, तुफां जलजले भरे
मोहब्बत के ईस राह मे
हम चंद बिखरे लम्होको
साथ अपने संझोये है …

 अब हमे पत्थरोके
पिघलनेका इंतजार नही
हा! वोभी तो किसीके यादमे
झरने बनकर रोये हे  …


ऐ मोहिनी तुझे भवर कहू
या मेरी मन की कल्पना
तेरी कयामत भरी नजरोमे 
हम सदियोसे खोये है ….



शायद आप अंजान होंगे 
हमारे दर्द ये दासतांसे, 
ना आज तक कब्र्मे मे 
हम चैनसे सोये है …. 

-प्रवीण बाबूलाल हटकर 

युगो-युगोसे सिनेमे
गमोके बीज बोये है
मुस्कुराते हुये पल्कोके नीचे
हम बंद अखीयनमे रोये है …

आंधी, तुफां जलजले भरे
मोहब्बत के ईस राह मे
हम चंद बिखरे लम्होको
साथ अपने संझोये है …

 अब हमे पत्थरोके
पिघलनेका इंतजार नही
हा! वोभी तो किसीके यादमे
झरने बनकर रोये हे  …


ऐ मोहिनी तुझे भवर कहू
या मेरी मन की कल्पना
तेरी कयामत भरी नजरोमे 
हम सदियोसे खोये है ….


मधुशालासे लिपटी आपकी
ओठोकी दो पंकूलिया 

Friday, 23 August 2013


विठ्ठू संगे अर्थ, जीवनाला…


विठ्ठू दरबारी ! बा… पंढरपुरी !
येती वारकरी ! दर्शनासी !!

हाताचेच ताळ ! मनाचे मृदुंग !
भक्त जपे संग ! नाम विठ्ठू !!

पांडुरंग हरी ! पांडुरंग विठ्ठू !
विठ्ठू विठ्ठू विठ्ठू ! पांडुरंग !!

विठ्ठू मुखे बोला ! विठ्ठू रंग रंगा !
विठ्ठू नाम दंगा ! विठ्ठू विठ्ठू !!

विठ्ठलाची काया ! विठ्ठलाची माया !
विठ्ठलाची छाया ! वात्सल्याची !!

विठ्ठू परमार्थ ! विठ्ठू तू समर्थ !
विठ्ठू संगे अर्थ ! जीवनाला !!

विठ्ठू माझा श्वास ! विठ्ठू तू विश्वास !
विठ्ठू हा प्रवास ! मोक्ष प्राप्ती !!

(अभंग …)
-प्रवीण बाबूलाल हटकर

Wednesday, 21 August 2013

पांडुरंग एक ….

देवा पांडुरंग ! सखा पांडुरंग !
राजा पांडुरंग ! अंतरीचा !!

पांडुरंग एक ! तै रूप अनेक !
हृदयी हरेक ! वास करी !!

पांडुरंग भोळा ! सहज पावतो !
भक्तीत पाहतो ! शुद्ध भाव !!

पांडुरंग जसा ! सागराची खोली !
अंबराची झोळी ! ममतेची !!

पांडुरंग तुझा ! आम्हा सहवास !
संजीवन खास ! जगण्यास !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 
   

Friday, 16 August 2013

प्रख्यात उद्देश केवळच सत्य …

कुख्यात प्रख्यात ! जाणुया फरक !
प्रतिमा स्मारक ! समजूया !!

कुख्यात प्रख्यात ! बा… जग-विख्यात !
ओळख कार्यात ! वेगळीची !!

 कुख्यात ओळख ! गा… कुकर्मातून !
 हीन कामातून ! येत असे !!

वायीट भावना ! दुसर्यास हानी !
स्व:स्वार्थ जीवनी ! एक धर्म !!

वाममार्ग प्रिय ! दादागिरी धंदा !
पैशासाठी जिंदा !! मुर्दापाडी !!

कुख्यात नावाने ! सारे दुरजायी !
भयभीत होई ! मृत्यू धाकी !!

कुख्यात प्रसिद्धी ! बा… हानिकारक !
व्यर्थ…  सामाजिक ! हितासाठी !!

प्रख्यात प्रसिद्धी ! बा… ज्ञान सामुग्री !
जळ हे समुद्री ! तेव्हडेची !!

प्रख्यात साक्षात ! मोठीच साधना !
तपचर्या म्हणा ! तपस्वीची !!

प्रख्यात प्रसिद्धी ! बा… येती जवळ !
तलावी कमळ ! जसा हवा !!

प्रख्यात ओळख ! जग प्रबोधन !
बा… परिवर्तन ! समाजात !

प्रख्यात उद्देश ! केवळच सत्य !
बा… आळा  असत्य ! कार्यास हो !!

प्रख्यात ओळख ! बारा जोतिर्लिंग !
बोधगया दंग ! लिनतेकी !!

एशुचा संदेश ! बा…  शांततेसाठी !
गा… माणसांसाठी ! प्रख्यातच !!

कुख्यात भावना ! असत्य अकर्म !
प्रख्यात सकर्म ! सत्यातून !!

(अभंग…)
-प्रवीण बाबूलाल हटकर

ची 

Wednesday, 14 August 2013

पांडुरंग पांडुरंग ! रंग दंग अंतरंग !

पांडुरंग पांडुरंग ! बा… विठ्ठल हरी हरी !
तुझ्या विना ना अंतरी ! ध्यास दुजा !!

पांडुरंग पांडुरंग ! उभा चंद्रभागे तिरी !
हात दोन्ही कटेवरी ! युगे युगे !!

पांडुरंग पांडुरंग ! रंग दंग अंतरंग !
स्मरूनी विरले अंग ! स्पंदनात !!

पांडुरंग पाडुरंग ! चढे आम्हा भक्तीरंग !
बोलता, चालता संग ! विठू नाम !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 6 August 2013

गजानना धावू किती, धावू किती गुरु देवा
दिनरात्र ध्यास तुझा, सहवास तुझा हवा …

बा… भजताच माउली, स्पंदनात भाव नवा
जसा विहारे गगनी, आनंदून पक्षि थवा
शिश झुकता कपाळी , माउलीचा हात असावा
सहवास तुझा हवा …


तूच आता एकमात्र, आम्हा रोगमुक्त दवा …
सहवास तुझा हवा…

 

Friday, 2 August 2013

मी तसाच होतो विरक्त … 

सखे … तुझी एक गुलाबी नजर 
माझ्या नयनी येउन भिडते
अन माझ्या अंतरंगी प्रचंड घंटा नाद उमटतो,
गुंजतो व भिनभिनतोसुद्धा ,
जणू  मी एका प्राचीन शिवालयात युगायुगातून 
द्यानास्त प्रसन्न भावमुद्रेत तुझ्याच त्या नजरभेटीसाठी 
ताठस्त नी  व्याकूळ झालेलो …ध्यानमग्न 
हो मोहिनी ! तो मी तसाच "आसक्त" !!!
जन्मोजन्मीचा 
पण …
सखे ! अशात तुझी एक नकारात्म भावमुद्रा 
माझे हृदय ढगफुटी फाताल्यासारखे होते,
मग सर्वत्र विनाशाच विनाश,
मग जगाव की मराव? हा प्रश्न मनात 
घुटमळू लागतो … 
राहुल ला सोडून जाताना सिद्धार्थ ला सोपे नव्हतेच 
'शून्यातून विश्वव्यापी शुन्याकडे' जाताना शुन्य घरातील 
लीनता… नक्कीच 'बुद्धमय' होती शांततेसाठी 
हो मोहिनी ! मी तसाच होतो विरक्त… 
सुख-दुःखाच्या सीमापार अगदी सहजच  ………  

 -प्रवीण बाबूलाल हटकर. 

Wednesday, 31 July 2013

        जग शोधलेया …

माणूस माणूस ! शोधतो माणूस !
अंतरी माणूस ! असतांना !!

आभाळ गर्भात ! गा… भू- पाताळात !
कन ते कनात ! शोधलेया !!

ब्रम्हांड उकल ! सागराचे तळ !
अंतरीक्ष स्थळ ! गाठलेया !!

सूर्य प्रखरता ! चंद्र शीतलता !
पूर्ण भूगोलता ! जाणलीया !!

मानवा हरेक  ! कला अवगत !
आज आत्मसात ! तू केलीस !!

खऱ्या अर्थाने तू ! जगी बुद्धिवंत!
होय नामवंत ! एकमात्र !!

पण एक बोलू !  हो तू ओळखले !
स्वतास जाणले ! कधीतरी !!

प्रवीण होऊन ! कुणी बुद्धिवंत !
माणूस जीवांत ! दाखवितो !!

हो आपल्यातच ! आपल्या अंतरी !
होय स्व: अंतरी ! सहजच !!

सांगायचे हेच ! जग शोधलेया !
माणूस जाणू  या ! स्व: अंतरी !!
 (अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 24 July 2013

      अचानक…

मन आभाळले ! मन वादळले !
धुंद कोसळले ! आसवांत !!

काळजां  कंपन ! वाढले स्पंदन !
थरारले मन ! का? सांग ना !!

रिमझीम सरी ! लपेटल्या जरी !
धडधड उरी ! अशांत का ?!!

अता तू ये मनी! सुनामी होऊन !
काळजां देऊन ! भू- हादरे !! 

हो! मी आता स्तब्ध ! होऊन प्रारब्ध !
आक्रोशले शब्द ! ऐकताना !! 

वीज कडाडली ! मन हादरून !
बघा काजळून ! प्राणज्योत !! 

सुसाट प्रवीण ! बेफाम प्रवीण !
स्तब्धला प्रवीण ! अचानक !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 9 July 2013

विठ्ठू मुक्तीमार्ग …
      अभंग

विठ्ठू तू आरसा !
विठ्ठू तू वारसा !
वारकऱ्यां जसा !
संजीवन !!

विठ्ठू माझा जीव !
विठ्ठू माझा शिव !
विठ्ठू जीव-शिव !
एकसम !!

विठ्ठू तू निसर्ग !
विठ्ठू आम्हा स्वर्ग !
विठ्ठू मुक्तीमार्ग !
एकमात्र !!

-प्रवीण बाबूलाल हटकर. 

Monday, 8 July 2013

      "कफल्लक"चं …

तसं माझ्याकडे…
देण्यासारखे आहे तरी काय ?
थोडासा प्रकाश…  तेजोमय सूर्यास ,
थोडीशी शीतलता….  लख्ख चंद्रास ,
थोडीशी हवा… बेफाम वाऱ्यास ,
थोडेसे टीमटीमने… हसऱ्या  चांदण्यास,
थोडेसे अश्रू … मुसळधार पावसास,
थोडीशी उर्जा … कडाडणा-या विजेस,
एक छोटासा कन … परिपूर्णतेकडे वळणार-या ब्रम्हांडास,
एक छोटीशी  प्रेरणा … सक्षमतेकडे नेणाऱ्या दुर्बलास  
एक छोटीशी जाणीव … असंख्य जिवंत करणार-या जाणीवास,
 हो… हल्ली !!!
तशी … माझी ओळख केवळ "कफल्लक"चं  …

 -प्रवीण बाबूलाल हटकर .

Sunday, 30 June 2013

     गा… मल्हार विठ्ठू …

मी मल्हारी गातो ! विठ्ठू गुणगान !
लाभे समाधान ! नाम विठ्ठू  !!

मी मल्हारी भोळा ! देव माझा भोळा !
जपतोया माळा ! विठ्ठू विठ्ठू !!

पिवळ्या उन्हात ! बा… निळ्या नभात !
सावळ्या रंगात ! रूप विठ्ठू !!

मल्हार हाकितो ! मेंढ्या रानोरान !
गात विठ्ठू गान ! आनंदाने !!

प्रवीण मल्हार ! बा… प्रवीण विठ्ठू  !
गा… मल्हार विठ्ठू ! एकनाम !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 



 

Thursday, 13 June 2013

"विठ्ठू तू प्रचंड"  ….

विठ्ठू अभिमान !
विठ्ठू समाधान !
विठ्ठू गुणगान !
'करू' किती ? !!

विठ्ठू चराचार !
विठ्ठू तू अंबर !
विठ्ठू तू आंतर !
'झाकू' किती ? !!

विठ्ठू तू  आरंभ !
विठ्ठू नाम दंग !
विठ्ठू भक्ती संग !
'रंगू' किती ? !!

विठ्ठू तू अभंग !
"विठ्ठू तू प्रचंड" !
विठ्ठू तू अखंड !
'दिपू' किती? !!

विठ्ठू तूच शक्ती !
विठ्ठू तुझी भक्ती !
बा… तुझ्यात मुक्ती !
'धावू' किती ? !!
(अभंग …. )
-प्रवीण बाबूलाल हटकर

Saturday, 25 May 2013

श्री समर्थ गुरु …

शेगावी आगर  ! आनंद बहर !
उमटले स्वर ! गजानन !!

शेगावीचा राणा ! त्याचा एकी बाणा !
मंत्र एकी जाणा ! एकतेचा !!

स्वामी ब्रम्हरूप ! जना एकरूप !
समर्थ स्वरूप ! चराचरी !!

पांडुरंग दिसे ! बा… गोसावी दिसे !
रूप तुझे दिसे ! भक्तजना !!

स्वामी गजानन ! जय गजानन !
 बाबा गजानन ! नमो नम: !!

श्री समर्थ गुरु ! नाम तुझ्या सुरु !
मार्ग तुझा धरू ! सदाचारी !!

जागुया समर्थ ! जाणुया समर्थ !
लाभे परमार्थ ! भजताना !!

प्रवीण भजता ! अंतरी स्वानंद !
बा… परमानंद ! लाभतोया !!
 (अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
 

Friday, 24 May 2013

हे विश्व प्रकाशाय…

सूर्य तेजाय नम: ! सूर्य देवाय नम: !
बा… सुर्यात्माय  नम: ! नमो नम: !!

अंधार विनाशाय ! गा… सृष्ठी प्रकाशाय !
 हे उर्जा प्रदानाय ! नमो नम: !

देवा सुर्योदयाय  ! ऑं प्रभू सुर्यास्थाय !
उदयाय अस्थाय ! नमोनम: !!

 देवा दिनकराय ! बा…  प्रभू भास्कराय !
स्वामी दिव्य तेजाय ! नमो नम: !!

प्रभू ! देवाधिदेवा ! स्वामी रवीकान्ताय !
तेजस्वी किरनाय ! नमो नम: !!

अंधार कालाय ! दिव्य तेज उर्जाय !
धरणी प्रकाशाय ! नमोनम: !!

जीव जंतू नाशाय !   बा…  उर्जा प्रदानाय !
सजीव चेतनाय ! नमोनम: !!

 गा … प्रवीण नमन ! हे विश्व प्रकाशाय !
प्रभू सूर्य देवाय !! नमोनम: !!

( अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर .

Monday, 20 May 2013

श्वास माझा विठू …

श्वास माझा विठू !
प्राण माझा विठू !
स्पंदनात विठू !
वाहतोया !!

कणातही विठू !
ब्रम्हांडात विठू !
चराचरी विठू !
राहतोया !!

सत्य कर्म विठू !
सत्य मर्म विठू !
सत्य धर्म विठू !
पाळतोया !!

काम माझे विठू !
ध्येय  माझे विठू !
तुझ्या  नाम विठू !
गाठतोया !!

माय माझी विठू !
बाप माझा विठू !
नमो नम: विठू !
वंदतोया !!

जागतोया विठू !
जाणतोया विठू !
अंतरित विठू !
भजतोया !!

विठू विठू विठू !
पांडुरंग विठू !
नाम घेण्या विठू !
हो प्रवीण !!

रंगू नाम विठू !
दंगु नाम विठू !
एक नाम विठू !
स्वानंदुया !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर .

Saturday, 18 May 2013

योग वियोग व योगायोग …
 (अभंग )
योग वियोग व ! योगायोग पाहू !
संदर्भात राहू ! सहज हो !!

बा… घडून येतो ! घडवून होतो !
संघटीत होतो ! तोचि योग !!

भक्त हनुमान ! प्रभू रामचंद्र !
बा… योग स्वानंद ! परमोच्च !!

श्री. कृष्ण सुदामा ! घडवून योग !
आनंद संजोग ! बा… भेटीचा !

सुख समाधान ! उद्देश मिलन !
योग संघटन ! प्राप्तीतून !!

वियोग उलट ! विघटन होतो !
बा… दुरावा होतो ! योगातून !

दुख दाहकता ! विरह यातना !
वियोग वेदना ! दुराव्यात !!

पहा रामसीता ! वियोग जाहला !
दाहक पाहिला ! बा… दुरावा !!

वनवासी गेले ! सोबत लक्ष्मण !
उर्मिलेचे मन ! वियोगले !!

आकांत आक्रोश ! वियोगात येता !
सुख शांती येता ! योगातून !!

योग नी वियोग ! दोन बाजू आहे !
समाविष्ट आहे ! योगायोगी !!

योग नी वियोगी ! घडले प्रसंगी !
योगायोग संगी ! दोन्ही बाजू !!

प्रवीण प्रयोग !समजू…  वियोग !
योग योगायोग ! बा… अभंगी !!

- प्रवीण बाबूलाल हटकर 


Monday, 6 May 2013

       कता

तू गझलेची देणी मला
तूच अजिंठा लेणी मला


ओघळणारा नयन-अश्रू
माझ्या अधरी घेणी मला…

-प्रवीण बाबूलाल हटकर 
जाणुया चेतन ! आणि अचेतन !
मनात जतन ! करुनिया !!

चेतनेची व्याप्ती ! जाणीवेत आहे !
संवेदना आहे ! जया अंगी !!

सजीव जो आहे ! जो जागलेला आहे !
जाणीवांत आहे ! तो चेतन !!

कृष्ण बुद्ध येशु ! संवेदन आहे !
जाणीवांत आहे ! बा… चेतन !!

प्रत्तेक घटना ! परिणाम तया !
जवळून जया ! जाणलेला !!

अचेतन आहे ! जो निर्जीव आहे !
असमर्थ  आहे ! जाणण्याशी !!

घटना जाणण्या !  आहे असक्षम !
शून्य परिणाम ! अचेतना !!

बा… मृत्य समयी ! जीव अचेतन !
गा … जन्मी चेतन ! जीव होतो !!

होत संवेदना ! चेतन प्रतिक !
अचेतन ठीक ! या उलट !!

विचार सक्षम ! चेतन प्रभाव !
विचार अभाव ! अचेतन !!


Thursday, 2 May 2013

चिता, चिंता, आणि  चिंतन….               
                  
           अभंग
चिता, चिंता, आणि ! चिंतन जाणुया !
भावार्थ पाहुया ! तिघांतला !!

चिता ही जाळते ! अंतिम समयी !
मृत्युच्या समयी ! अखेरीस !!

चिता ही जळते ! शेवट जीवन !
चिंता नी चिंतन ! नष्ट सारे !!

चिंता ही जाळते ! जसे क्षणो-क्षणी !
दुख्खास जीवनी ! भोगतांना !!

विरह वेदना ! दुख नी दुरावा !
अखंड पुरावा ! बा… चिंतेचा !!

चिता ही जाळते ! अंती जळताना !
चिंता ही जाळते ! क्षणोक्षणी !!

चिंतन करतो ! विचार करून !
सुयोग्य करून ! विचार हो !!

चिंतन करुया  ! मनन करूया  !
गा… नष्ट करूया  ! चिंतेस हो !!

जीव होतो नष्ट ! सत्य हे त्रिकाली !
चिंता ही अकाली ! येणे-जाणे !!

चितेस न रोकु  ! रोकु चिंतेस हो !
करू चिंतन हो ! अविरत  !!

चिंतन करता ! मिळतो स्वानंद !
बा… परमानंद ! जीवनाला !!

- प्रवीण बा. हटकर

Wednesday, 1 May 2013

अंतरंग ...

                 अभंग...

पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग!
जीवनाला सप्तरंग ! लाभलेया !!

दर्शनाची तळमळ ! वारकरी धावपळ !
भाव अंतरी निर्मळ ! प्रसवले !!

विठू मज दिसतोय! गालामध्ये हसतोय!
नजरेला दावतोय! दिव्य रूप !!

विठ्ठल नामात दंग! प्रवीण रचे अभंग!
उधळून अंतरंग! चराचरी !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.

Wednesday, 24 April 2013

 गा… क्रांती आणि उत्क्रांती…



              -अभंग-



गा… क्रांती आणि उत्क्रांती ! फरकास समजूया !
ज्ञानासी भर घालूया ! बा… सुयोग्य !!

क्रांतीमध्ये जसा होतो ! बा… शीग्रतेने बदल !
परीस्तिथीत बदल ! घडतोया !!

ब्रिटीशी हुकुमशाही ! कायापालट करून !
लोकशाही रुजवून ! क्रांती केली !!

बा… हरितक्रांती पहा ! पारंपारिक सोडून !
अत्याधुनिक आणून ! शेती केली !!

आधुनिक तंत्रज्ञान ! बा अत्याधुनिक क्रांती !
आज विश्वरूपी क्रांती ! जाणलीया !!

बा उत्क्रांतीत बदल ! टप्प्या-टप्याने होतोया !
नी सातत्याने होतोया ! हळूहळू !!

मानवाच्या उत्क्रांतीत ! टप्या-टप्प्याने बदल !
बा… सातत्याने बदल !! घडलाय !!

राहणीमान बदल ! बोलण्या वागण्यात !
खाण्यात, बुद्धिमत्तेत ! बदलला !!

रानटी अवस्तेतून ! बा… आधुनिक स्वीकार !
हा उत्क्रांतीचा प्रकार ! युगातून  !!

क्रांतीचा बदल आहे ! तत्काळ नि शिग्रपणे !
बा… उत्क्रांती सातत्याने ! हळू-हळू !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

Friday, 19 April 2013


श्री. राम नवमीच्या समस्त भक्त गणास प्रेमळ भक्तिमय  शुभेच्छा …

अभंग …

हे राम श्री राम ! जय जय राम !
मुखी तुझे नाम ! सदोदित !!

दशरथ पुत्र ! अयोध्या नरेश !
तुझ्या ठाई शिश ! राम नाम !!

भक्त हनुमान ! हृदयात वास !
गा… हरेक श्वास ! तुझे नाम !!

लोकराजा आम्हा ! पुरषोत्तम राम !
देवा चारीधाम ! तुझं नमो !!

सितामाता तुझी ! जीवन संगिनी !
जीव-संजीवनी ! तुझं  नमो !!

स्वयंवर वेळी ! धनुष्य तोडीला !
जनक पुत्रीला ! वैवाहिले !!

तोडूनी धनुष्य ! अहम तुटला !
अनुभव आला ! परशुरामा !!

सन्मान देऊन ! पिता आदेशास !
केला वनवास  ! चौदा वर्ष !!

भरतास दिले ! राज्य कारभार !
शत्रुघ्न आधार ! मदतीला !!

वनवास केला ! लक्षमणा संगे !
सीतामाता संगे ! वणवण !!

श्री राम भक्तिनी ! शबरी भेटुनी !
दर्शन देऊनी ! धन्य केले !!

उष्ट बोर खात ! देऊनिया मोक्ष !
माता सीता साक्ष ! दिव्यक्षणी !! 

श्रुर्पनखा आली ! भेस बदलूनी !
रामास मोहिनी ! घालावया !!

लक्ष्मनाणे केले ! प्रहार नाकास !
परतुनी खास ! पाठविले !!

रावणाने सारे ! ऐकुनी कहाणी !
 पुष्पक विमानी ! धाव केली !!

कट रचुनिया ! माता पळविले !
वाटिकेत केले ! बंदिवान !!

सूड घेण्यासाठी ! राम नी लक्ष्मण !
संगे हनुमान ! लंका आले !!

बाली पुत्र संगे ! अंगद मदती !
विभीषण अंती ! मदतीस !!

रावण गर्वास ! हरण करून !
यायचे करून ! कट केला !!

मारोती उड्डाण ! वाटीकेस गेले !
जाळूनिया केले ! अर्धे भस्म !!

युद्धाची हि अता ! सुरवात आहे !
भयभीत पाहे ! रावण हो !!

महाकाय काल ! कुंभकर्णा यास !
यमसदनास ! पाठविले !!

बा…  लंका नरेश ! पुत्र महावीर !
अक्षयकुमार ! युद्धास हो !!

लक्ष्मण-अक्षय ! युद्धास प्रारंभ !
बाण अंदाधुंद ! वर्षाविले !!

अक्षय अखेरी ! युद्धात मारला !
दुख रावणाला ! फार झाले !!

पती वियोगात ! अक्षयची पत्नी !
बा… यमसदनी ! तीही गेली !!

अखेरी रावण ! महाकाय दैत्य !
दहामुखी दैत्य ! रणांगणी !!

घेत महाकाय ! अवतार पहा !
सूर्यास झाकला ! रावणाने !!

महा शक्तिशाली ! बुद्धिवंत दैत्य !
रावण हा सुप्त ! गुणी होता !!

श्रीरामचंद्राने ! बाणास सोडीले !
मुखास हो केले ! क्षतिग्रस्त !!

पुन्हा मुख जुडे ! आच्चारीले सारे !
विभीषण बरे ! सांगितले !!

नाभीमध्ये आहे ! जीवनअमृत !
मारताच मृत ! होयील हो !!

मारुनिया बाण ! रावणाचा वध  !
करुनी सावध ! दैत्यास हो !!

वनवास पूर्ण ! करुनिया आले !
दशरथ केले ! सन्मान हो !!

बा… अग्नी  परीक्षा ! सितामाता देत !
जनतेस देत ! विश्वास हो !!

हे राम श्री राम ! जय सीताराम !
जय जय राम ! नमो नम: !!

प्रवीण धन्यतो ! श्री राम चरिता !
अभंग करिता ! सादर हो !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
अकोला
मो : ८० ५५ २१३ २८१ 

Thursday, 18 April 2013

ज्ञय नी अज्ञय…

ज्ञय नी अज्ञय ! अर्थ हा जाणुया !
सहज होऊया ! ज्ञानदीप !!

बा… ज्ञय म्हणजे ! जाणीव तयाची !
समज जयाची ! जाणलेली !!

गा… ज्ञय माहिती  ! संपूर्णता आहे !
नी … ठळक आहे ! स्पष्टरूप !!

जे… जाणले आहे ! किती ? न माहिती !
अज्ञयाची व्याप्ती ! अखंडित !!

समुद्र हा ज्ञय ! तै पाणी अज्ञय !
हवाही अज्ञय ! दिसण्यास !!

अज्ञय ब्रम्हांड ! अज्ञय आकाश !
हा सूर्य प्रकाश ! बा… अज्ञय !!

अज्ञय जाणतो ! किती न माहिती !
बा ज्ञय माहिती ! किती आहे !!

विठू आम्हा ज्ञय ! परिचित आहे !
तया 'वास' आहे ! बा… अज्ञय !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 15 April 2013

                                                                                                                           तारीख :

प्रती ,

मा. प्रकाशक साहेब,
लोकसंस्कृती प्रकाशन,
नारायणगाव.
                                     यांना सस्नेह पूर्वक नमस्कार
महोदय,
               पुस्तक प्रकाशन संदर्भात आपल्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यानुसार आपणाकडे माझा अभंग संग्रह पाठवीत आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या योजनांद्वारे  माझ्या अभंग संग्रहाचा पुस्तक प्रकाशनाकरिता विचार करावा . अशी विनंती करतो
               कृपया संग्रहाची नोंद असावी.  सहकार्य अपेक्षित.
                                                                                                                 
                                                                                                                         आपला विश्वासू



पूर्ण नाव : प्रवीण उर्फ डेबुजी बाबूलाल हटकर
पत्ता        : बी अन्ड सी क्वार्टर,
                मु. पो. ता. बार्शीटाकळी       
                जिल्हा - अकोला
                पिन कोड : ४४४४०१
मो         : ८० ५५ २१३ २८१          



माणूस कसला … 

किती येथे आले
निघुनिया गेले !
माणूस जाणले
नाम रुपी !!

मी मोठा नाही
मी नाही विद्वान !
नाहीच अजान
मतीमंद !!

नीती काय बोले
ऐका बांधवानो !
माझ्या आपल्यानो
लाडक्यानो !!

माणूस कसला
मुके माणुसकी !
जपे माणुसकी
तोची खरा !!

वेळ आली पहा
आत्मिक ज्ञानाची !
कळी जीवनाची  
बा फुलाया !!
- प्रवीण बाबूलाल हटकर .                  

हसऱ्या क्षणास… 

हसऱ्या क्षणास! लाख तू जगाला!
हसता हसला! जगताना!!

जगता जगता! क्षितीज गाठले!
स्वानंद जगले! मनी-तुझ्या!!

तिन्ही लोकी झाले! नाम तुझे असे!
ब्रम्हांड्च जसे! कान झाले!!

तू... हसत आहे! अजूनही तसा!
कल्पतरू जसा! मिळालेला!!

काल भेटायला! वादळ वणवा!
घेवूनी फतवा! आले होते!

नि... म्हणाले तुला! साडे साती आहे!
दुख आता आहे! भाळी तुझ्या !!

तू पण भोळाच! रीतीने बोलला!
दुध ना चहाला! काळा ठेऊ!!  

ते चिडलेत नि! वादळले  सुद्धा!
तू... रे...भाऊ दादा! बोलला त्या!!

ते पुन्हा म्हणाले! त्रास देण्या आलो!
मूर्ख नाही झालो! कळते का!!

तू स्मित हसला! नि त्यासी बोलला!
बोलता वागला! नम्रतेने!

हे सद गृहसता! आठ-चार दिस!
राहा.. गरिबास...! तोची मान!!

असे म्हणताच! वादळ वणवा!
फाडूनी फतवा! हसलेत!!

नि बोललेत त्या! आहेस तू कोण!
 भीतीची न जाण! का? तुजला!!

भीती काय आहे! मज ना माहित!
दुख ना माहित! हे महंत!!

घाबरू नकोस! मी पाठीशी आहे!
तुझ्या... बोल आहे! गुरुचे हे!!

मग का घाबरू! मागे दत्त गुरु!
का उगा घाबरू! सांगा तुम्ही!!

असे ऐकताच! वादळ वणवा!
शांत झाले.. बाबा! नाम घेता!!

लाख दुख आले! संकटे हि आले!
उलटे पळाले! नाम घेता!

श्री स्वामी समर्थ! नाम मी पूजित ! 
दर्शन घडीत! कार्यातुनी!!

समर्था पुजूनी! सद्कार्य तू  कर!
नाही तुला डर! कुठलाही!!

स्वामी देई तुला! भर भरुनी घे!
कार्यास तुझ्या घे! उंच झेप!!

प्रवीण समर्थ! करुनी कार्यास!
पूजिले कर्मास! भक्ती भावे!

समर्थ समर्थ! पूजिले समर्था!
सत्यार्थ  कर्मार्था! जाणुनिया!!

वादळ वनवे! दुख नि संकटे!
नाम घेता पिटे! समर्थांचे !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .