Friday, 7 December 2012

हिंदीतील पहिली कविता...

आफत कि घंटा फिर बजी...

मैने पानीमे कागज कि नाव को
तैरता देख उसमे छलांग लगायी
पानीमे उसे डूबता देख
बोलो कितना मजा आया
भाई, बडा मजा आया...

तभी आफत कि घंटा बजी
समंदर मे भूछाल आया
भवर मे घुमती नय्या डुबता देख
बोलो कितना मजा आया
भाई, बडा मजा आया ...

हराभरा जंगल हर तरफ थी हरियाली
जंगल के बडे पेड तथा चिडीया,
जंगली जानवर का घर तुडवाया
बोलो कितना मजा आया
भाई, बडा मजा आया...

आफत की घंटा फिर बजी
बैठेथे घर मे तभी भूकंप आया
थोडा संभलकर देखा, घर जमीन मे पाया
बोलो कितना मजा आया
भाई, बडा मजा आया...

पंच्छियोको उडता देख
पतंग के धागे मे, तो कभी
मोबयील कि रेन्ज्से मार गिराया
बोलो कितना मजा आया
भाई, बडा मजा आया...

आफत की घंटा फिर बजी
बैठे थे हवाई जहाज मे
तभी मोसम खराब होनेकां संदेशा आया
झटसे बिजली कडकते, जहाज को मार गीराया
बोलो कितना मजा आया
भाई, बडा मजा आया ...

अब सोचो, थोडासा जाणो इंसांनो
अपने धर्म कर्म मर्म को पेहेचानो
अपनी ताकद का ना गलत इस्तमाल करो
फिरभी समझ न आया
तो कितना मजा आया
भाई, बडा मजा आया ....

-प्रवीण बाबूलाल हटकर.
मो: ८०५५२१३२८१
अकोला.
एक मथळा ...

प्रेम म्हणजे भक्ती मनातून मनाची
जागलेली शक्ती मनातून मनाची

Thursday, 6 December 2012

- गझल -

विठ्ठल

जागतो विठ्ठल, जाणतो विठ्ठल
अंतरी माझ्या नांदतो विठ्ठल

प्राण तू झाला, श्वास तू झाला
स्पंदनी दरवळ वाहतो विठ्ठल

माऊली तोची... ह्या जगी अवघ्या
पंढरी काशी, राहतो विठ्ठल

झाड तू देवा, मूळ तू देवा
रूप ब्रम्हांडी... पाहतो विठ्ठल

वादळे... येता, तू दिली छाया
संकटी आम्हा... तारतो विठ्ठल

बाप तू आहे, माय तू आहे
बा... तुझ्या चरणी, दंगतो विठ्ठल

सावळ्या रंगी, बा... तुझ्या नामे
रंगतो विठ्ठल, नाचतो विठ्ठल

चित्त हे निर्मळ, भावना सुंदर...
जीवलग भक्ता, पावतो विठ्ठल

पंढरी जागृत, हे कृपावंता !
तुज...दयावंता, वंदतो विठ्ठल
 
माझिया भक्ती, आपली शक्ती
एकरूप होता, रंगतो विठ्ठल

श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
भजन मी गाता, हासतो विठ्ठल

-प्रवीण बाबुलाल हटकर.
मो: ८०५५२१३२८१
अकोला.

Tuesday, 4 December 2012

अभंग
साई गजानन संस्थेमार्फत होऊ घातलेल्या वारीस...

साई गजानन ! गुरु गजानन !
जय गजानन ! दिगंबरा !!

रौप्य महोत्सव ! क्षण भक्तिमय !
नि संगीतमय ! भाव विश्व !!

स्थळ एरोंडोल ! निघालेया जन !
वारकरी गण ! शेगावीसी !!

एका गाभार्यात ! दिव्य संत दोन !
साई-गजानन ! नमो नम: !!

एक रूप साई ! एक गजानन !
संत झाले दोन ! एकरूप !!

कुणी बोले साई ! कुणी गजानन !
साई गजानन ! कुणी बोले !!

पहा भक्तमळा ! लाखोंनी फुलला !
एकेक जुडला ! दिंडी मध्ये !!

भक्ती सागर हा ! जसा ओथंबला !
नि पार बुडाला !! भक्तीमध्ये !!

मुक्काम ठिकाण ! आहे विटनेर !
आणि जामनेर ! मागोमाग !!

पुढे बोधवड ! बा... मलकापूर !
नांदुरा आगर ! नी शेगाव !!

दिनचर्या पहा ! काकड आरती !
बाबांची आरती ! पहाटेला !!

तास भर जप ! पुन्हा पायीवारी !
मध्यांग प्रहरी ! प्रसाद हो... !!

नंतर सत्संग ! अद्वितीय क्षण !
मनन चिंतन ! विचारांची !!

पुन्हा पायीवारी ! भक्तीचा गजर !
स्वागत आदर ! लाभे पुढे !!

नाचत वाजत ! जल्लोष करीत !
भक्ती सागरात ! भक्त जुडे !!

सांज च्या पहारी ! मुक्काम ठिकाणी !
गण वारकरी ! पोहोचती !!


चालती सत्संग ! भजन कीर्तन !
लाभे समाधान ! भाविकास !!

बाबांच्या कार्याचा ! करिती उजाळा !
भाविक सोहळा ! दंग होई !!

अन्नाचे महत्व ! दिव्यात्म दिव्यत्व !
जीवन महत्व ! सत्संगात !!

एक एक गण ! गणात बोवून !
धर्म पटवून ! एकतेचा !!

बा.. प्रगट स्थळी ! पोहचे पर्यंत !
हीच अविरत ! दिनचर्या !!

वारीचे महत्व ! थोडक्यात जाणू !
गण गण आणू ! जोडूनिया !!

संकेतस्थळ ते ! ह्या प्रकाटस्थळी !
बा... विना अंघोळी ! प्रवासती !!
  
विना अंघोळ ही ! भक्त करी वारी !
'धूळफेक' खरी ! घेउनिया !!

वर्षात अश्व ना ! हात लावू देई !
हात लाऊ देई ! ऐन वारी !!

बा.. अभूतपूर्व ! दिनी अश्व शांत !
बाबा कृपावंत ! तुझी लिला !!
 
नांदुरा पासून ! काढून लगाम !
शेगावी या धाम ! अश्व येई !!

वैशिष्ट वारीचे ! एक परिधान !
एक रंग मान ! भगव्याचा !!

एक नाम मुखी ! ब्रम्हांड नायक !
पूजती सेवक ! मनोभावे !!

"साई गजानन" ! संस्थेच्या मार्फत !
दिंडी हि विश्वात ! मोठी आहे !!

प्रवीण सामर्थ्य ! जागविले मन !
साई गजानन ! नमो नम: !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
मु. पो. ता. बार्शीटाकळी,
अकोला.
मो. ८०५५२१३२८१

Tuesday, 20 November 2012

माझ्या नयनांचा तुझ्या नयनांशी
स्पर्श जसा नवा नवा

प्रीत गुलाबी पापण्यांना
तो स्पर्श नवा हवा हवा ....

गुलकंद वरून .......
प्रवीण हटकर. 
चित्त शुद्ध असो ...

चित्त शुद्ध असो ! आरशाप्रमाणे !
दावल्याप्रमाणे ! दिसावेत !!

नीती तुझी असो ! निर्मळ नी शुद्ध !
बा उद्देशबद्ध ! प्रमाणित !!

कडूलिंबामध्ये ! साखर एकत्र !
गुणधर्म मात्र ! कडू त्याचा !!

वचन ना द्यावे ! दिल्यास पाळावे !
नाच तू टाळावे ! बोलूनिया !!

वृत्ती समाधानी ! जगेल स्वानंदी !
बा... परमानंदी ! स्वर्ग सुख !!

विचारात स्पष्ट ! मांडण्या ना कष्ट !
विचार अस्पष्ट ! व्यर्थ सारे !!

कौशल्य प्रवीण ! कार्यात असावे !
उगाच नसावे ! टाळाटाळ !!

-प्रवीण बाबुलाल हटकर.

Monday, 19 November 2012

-गझल-

माणसाला जाणणारा कोण आहे?
काळजाला भावणारा कोण आहे?

वेध आहे जिंकण्याचे विश्व सारे;
कासवाला हरवणारा कोण आहे?

मीच वारा, मीच पाणी, मीच अग्नी;
मोल माझे लावणारा कोण आहे?

ह्या विजांना घेत अंगी तो म्हणाला
वादळाला पेलणारा कोण आहे?

एक आहे जात सार्या माणसांची
धर्म ऐसा पाळणारा कोण आहे .

गाव माझे, शहर माझे, विश्व माझे;
'पोरका' मज ठरवणारा कोण आहे?

 -प्रविण बाबुलाल हटकर.

पत्ता : मु. पो. ता. बार्शीटाकळी,
        अकोला.
मो: ८०५५२१३२८१ 
ब्लॉग : www.gulkand1.blogspot.com

Saturday, 17 November 2012

बाळा साहेब, तुम्ही का सोडून गेलात ... अख्या मराठी साम्राज्याला पोरक केलंय,
हिंदू हृदय सम्राट अता कुणास बोलू...

मराठीची आन ! मराठीची शान !
तू आशेच स्थान ! होता आम्हा !!

हिंदूचा तू आहे ! हृदय सम्राट !
का घेतली वाट ! बा... स्वर्गाची !!

मराठ्यांची ढाल ! मराठ्यांची शाल !
हिंदुत्व मशाल ! पेटविली !!

केलस पोरक ! मर्द-मराठ्यांना !
सांभाळावे त्यांना ! आज कसे !!

साहेब तुम्ही या ! परतुनी पुन्हा !
काय झाला गुन्हा ! माफी द्यावी !!

मराठ्यांचा वाघ ! मराठ्यांची मान !
तुझा अभिमान ! आम्हा सर्वा !

साहेब तोवर ! नाही आच आली !
मराठीचे वाली ! होता तुम्ही !!

खरा लढवय्या ! भोळ्या संस्कृतीचा !
तूची  मराठीचां ! रे "जनक" !!

बा... आदरांजली ! अतुल्य कार्यास !
मिळो ह्या आत्म्यास ! शांती शांती !!

-प्रवीण हटकर 

Monday, 12 November 2012

दिवाळीच्या आपनासर्वास व आपल्या परिवारास प्रेमळ शुभेच्छा...

सन दिवाळी...

सन दिवाळीचा !  आनंदाचा क्षण !
उत्साहिले मन ! संगे साई !!

बालिकेची हौस ! करू रोशनाई !
ही द्वारकामाई ! उजळूनी !!

बाबाही हसत ! होकार दाविला !
तेल आणण्याला ! सांगितले !!

बनियास केली ! तेलाची मागणी !
बोललीया वाणी ! बाबाचीया !!

तेल असुनिया ! नाही बोलला तो !
चीमुर्डीस जे तो ! हटकले !!

विनवण्या केल्या ! पायाही पडल्या !
कानास जोडल्या ! हात तिने !!

व्यर्थची प्रयत्न ! बालिका खचली !
अश्रूत नाहली ! नयनांत !!

सायंकाळ वेळ ! बाबास कळले !
जे जे तिथे झाले ! हकीकत !!

बालिकेचे डोळे ! बाबा पुसूनीया !
पाणीच टाकूया ! बोललेया !!

सगळे चकित ! होवुनी बोलले !
पाणीने लागले ! कोठे दिवे !!

बाबाचा आदेश ! सगळ्यांनी पाणी !
दिव्यात लाउनी ! पूर्ण केला !!

माचीसची काळी ! दिव्यास लाउनी !
जोत ती पेटुनी ! दावलीया !!
 
चमत्कार तुझा ! बघुनिया जन !
दंग झाले मन ! लीलावंता !!  

पाण्यावर दिवे ! बालिका हसली !
नाचली गायली ! आनंदाने !!

द्वारकामाईत ! झगमग दिवे !
जसे पक्षि थवे ! विसावले !!
  
द्वारकामाईत ! दिवाळीचा सन !
रे नंदनवन ! नेत्र दीपे !!

साई तुझी लिला ! रे अपरंपार !
भक्तास आधार ! संजीवन !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
 अकोला. 


Friday, 9 November 2012

महाराजानावर आधारित 'ब्रम्हांड नायक' ह्या मालिकेतील 'श्री' च्या भूमिकेत "वसंतदादा गोंगटे" व इतर सहकारी...

 गजानना ओढ ...

गजानना ओढ ! तुझ्या दर्शणाची !
कळी जीवनाची ! खुललीया !!

नको होऊ वृष्ट ! बाबा आम्हावर !
तुझीच लेकरं ! पितामहा !!

मूळ तू झाड तू ! फुल तू पान तू !
चराचरात तू ! दिगंबरा !!

पाठीवर हात ! ठेव सदोदित !
जीवन वा अंत ! तुझ्या लीन !!

विठ्ठल, गोस्वामी, ! भोलेनाथ झाला !
भक्तास पावला ! हाक देता !!

ब्रम्हांड नायक ! वसंता साकारे !
आनंदिले सारे ! रुपवंता !!

बाबा बाबा बाबा ! गजानन बाबा !
हाक देई बाबा ! तुझा भक्त !!

-प्रवीण बाबुलाल हटकर.
  अकोला .

Friday, 2 November 2012


 श्री हरी विठ्ठल...


श्री हरी विठ्ठल ! पांडुरंग हरी !
जय जय हरी ! पांडुरंगा !!

भक्त हाका देई ! मनातून राया !!
वासराला माया ! गाय देई !!

विठ्ठल नामात ! रंगतो, दंगतो !
जागतो, जाणतो ! भक्तीभाव !!

विठू तू विश्वास ! विठू तूच श्वास !
तुझा सहवास ! स्वर्गसुख !!

विठू तू समक्ष ! भक्तांसाठी दक्ष !
चरणी या मोक्ष ! लाभो आम्हा !!

प्रवीण जाहलो ! अनुभूती येता !
अहंकार जाता ! पांडुरंगा !!



-प्रवीण बाबूलाल हटकर 



अभंग...

गजानन माऊली ! माऊली माऊली तू !
प्रेमळ सावली तू ! ममतेची !!

विना आग चिलीम ! पेटवून दाविसी !
दंगला कौतुकासी ! भक्त मेळां !!

तू ब्रम्हांड नायक ! तूच भाग्यविधाता !
तू मात-पिता-दाता ! तुज नमो !!

बाबा तुझिया लीला ! तू जागसी, जाणसी !
गण गण जोडसी ! एकतेने !!

अन्न हे पूर्णब्रम्ह ! खाऊनी उष्टे अन्न !
सांगितलेया गण ! तै महत्त्व !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
 पंढरीच्या देवा...
  अभंग...

पंढरीच्या देवा ! दे मज दर्शन !
नयन दर्पण ! दिपलेया !!

संकट समयी ! करी भक्त हाका !
रक्षणासी नौका ! आणलिया !!

पांडुरंग देवा ! पांडुरंग हरी !
आजन्म अंतरी ! ध्यास तुझा !!

न मोह, न माया ! ना कुठली काया !
हवी तुझी छाया ! विठूराया !

पाप-पुण्य काय ! काय जन्म-मृत्यू !
अर्पण परंतु ! तुज राया !

प्रवीण जगतो! ज्योत होऊनिया!
नाम स्मरूनिया ! विठूराया!!

 -प्रवीण(डेबुजी) हटकर.
संत येती जगी...
      अभंग...
 
संत येती जगी ! मार्ग दाखवाया !
सत्य कर्म व्हाया ! कार्यातुनी !!
ब्रम्हांड नायक ! प्रकटले जगी !
गजानन योगी ! कल्याणासी !!
बाबा शिकविती! एकतेचा सार!
माणूस आधार! माणसाचा!!
भेदभाव, वर्ण ! हे सारेच थिटे !
जया अंगी दाटे ! माणुसकी !!
धर्म तोची खरा ! माणूस उद्धार !
माणूस विचार ! जो नेमिला !!

प्रवीण नमतो! संतांच्या चरणी!
ठेवूनी स्मरणी! कार्य तया!!
-प्रवीण बाबुलाल हटकर.
नाम तुझे घेता..
 
अभंग...
नाम तुझे घेता ! आसमंत झाला !
सुखे वर्षावला ! गजानना !!
मी शूद्र तुझ्यात ! पाही विठूराया !
विठ्ठलासी काया ! तू रुपिली !!
गजानन बाबा ! तुझी अनुभूती !
शेगाव जाणती ! स्वर्गापरी !!
प्रेमळ माऊली ! तुझ्यात गावली !
मायेची सावली ! देई आम्हा !!
प्रवीण जाणतो ! शेगावी जो जातो !
स्वानंद हर्षितो ! मनोमनी !!
          प्रवीण(डेबुजी) हटकर
प्रवीण नमतो ...
अभंग...
धावुनीया आला ! संकटासी राणा !
देवा गजानना ! कृपावंता !!
माऊली जगासी ! प्रेम अर्पियले !
प्रेम जागविले ! अंतरंगी !!
  
शेगाव पंढरी ! काशी-स्वर्गापरी !
 एकटा कैवारी ! गजानना !!
 
उद्धार मानवा ! होण्या प्रकटले !
मना झटकले ! भेदभाव !!
प्रवीण नमतो ! पूजितो, भजतो !
अखंड स्मरतो ! गजानन !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
पांडुरंग पांडुरंग ...
              अभंग...
पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग !
सुखाविले मन स्वर्ग ! दर्शनाने !!
पांडुरंग पांडुरंग ! नाद मनी गुंजतोय !
स्पंदनात विरतोय ! भाव  नवा !!
पांडुरंग पांडुरंग ! युगे उभा विटेवरी !
भक्त पुंडलिका करी ! विनवणी !!
पांडुरंग पांडुरंग ! पुंडलिक झाला दंग !
आई-बाबा सेवा-रंग! रंगुनिया !
पांडुरंग पांडुरंग ! प्रवीण अंतरी जागा !
आई-बाबा सेवा त्रागा  ! नका करू  !!

-प्रवीण(डेबुजी)हटकर.
रूप विठ्ठलाई ...
अभंग...

हे देवाधिदेवा ! तुझ्या दर्शनाला ! 
चाले पंढरीला ! वारकरी !!
टाळ वाजवूनी! नाम जय घोष!
मनी नाही रोष! बा...विठ्ठला!!
ढोल आणि ताशे ! वाजवी मृदुंग !
एकरूप दंग ! भक्त झाले !!
विठ्ठल रूख्माई ! बाबा आणि आई !
रूप विठ्ठलाई ! आम्हा दिसे !!
भक्तासाठी उभा ! युगे  अठ्ठावीस!
साल, रात्रंदिस ! चाललीत !!
प्रवीण पुजतो! प्रवीण रंगतो!
प्रवीण दंगतो!  विठू नाम !!
  -प्रवीण बाबूलाल हटकर.
गजानन बाबा...
अभंग...

गजानन बाबा! स्वामी गजानन!
रे नंदनवन! रूप तुझे!!

कण ते ब्रम्हांड ! आहे बा.. तुझ्यात !
जाणिले माझ्यात ! अंश तुझा !!

श्री गजाननासी! भक्ती अर्पियली!
ज्योत जागविली ! भावपूर्ण !!

जोडीयले जन! मंत्र  गण-गण!
गणात  बोलून! उद्धारीले !!

प्रवीण चालतो ! बाबा तुझा मार्ग!
 सद्कार्यात स्वर्ग!! गवसला !!
प्रवीण(डेबुजी) हटकर.
विठू तूच माझा ...
अभंग...
विठू तूच माझा! सखा जीवलग!
आहे नातलग! अंतरीचा!

तुझ्या दर्शनाला! येती वारकरी!
पायदळ वारी ! करुनीया !!

विटेवरी उभा ! हात कमरेत !
तेज नजरेत ! माऊलीच्या !!

ममतेची मूर्ती ! वात्सल्याची काया !
भक्तावरी माया ! सदोदित !!

विठ्ठल विठ्ठल ! हरी पांडुरंग!
तन-मन रंग ! अर्पियले !!

प्रवीण विठ्ठल ! स्मरोनी पुजतो !
अंतरी जागतो ! दिव्य भाव !!
 प्रवीण(डेबुजी) हटकर.

भक्तीरस ...
 अभंग
विठ्ठल माऊली ! सावली मायेची !
माऊली जगाची ! पांडुरंगा !!

बाबा तुझ्या  भेटी ! रे शेगावीहून !
आलाय घेऊन ! भक्तीरस !!

पालखी निघाली ! गावागावांतून !
घोष मनातून ! नाम विठू !!

पंढरपूरला ! भक्त गोतावळा !
रंगतोय मळा ! भावपूर्ण !!

गजानन बाबा ! भेटता विठूला !
अवघ्या जगाला ! आनंदिले !!

प्रवीण जाणतो ! सार्थक जहाले !
जीवन वाहिले ! तुझ्या ठायी !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.

धाव विठू देवा...
अभंग...

धाव विठू देवा ! विठू देवा धाव !
संकटात पाव ! आज भक्ता !!

मी रे वारकरी ! पंढरी निघालो !
गावोगाव आलो ! फिरूनिया !!

न तमा आम्हाला ! कुण्या वादळाची !
तुझ्या दर्शनाची ! आर्त ओढ !!

विठ्ठल विठ्ठल ! मंत्र  जपूनिया !!
गेले दंगूनिया ! वारकरी !!

सुखावतो तुझ्या! सावळ्या रंगात !
जगतो नामात ! विठूराया !!

प्रवीण जाहलो ! भक्ती सागरात !!
नाद स्पंदनांत  ! तुझा देवा !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.
अंतरंग ...
अभंग...

पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग!
जीवनाला सप्तरंग ! लाभलेया !!

दर्शनाची तळमळ ! वारकरी धावपळ !
भाव अंतरी निर्मळ ! प्रसवले !!

विठू मज दिसतोय! गालामध्ये हसतोय!
नजरेला दावतोय! दिव्य रूप !!

विठ्ठल नामात दंग! प्रवीण रचे अभंग!
उधळून अंतरंग! चराचरी !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

"भक्तीगाथा"  ...
अभंग...

विठू माझा गुरु ! ज्ञान कल्पतरू !
वाटचाल सुरु ! ज्ञानदायी !!

विठू सुखकर्ता !विठू विघ्नहर्ता !
तै नाम स्मरता ! सुखावलो !!

विठ्ठल विठ्ठल! हुंकार अंतरी !
नादतो अंबरी ! भक्तीभाव !!

विठ्ठल भजावा ! होऊन निर्माल्य!
होईल साफल्य ! आयुष्याचे !!

विठ्ठल चरणी ! जाऊन शरण !
लिहितो प्रवीण ! 'भक्तीगाथा' !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
अभंग...

देवा गजानना! गुरु गजानना!
प्रगटूनी जना! उद्धारिले!!

वेश अवलिया! दिव्यसा चेहरा!
प्रेमरूपी झरा! अंतरीला!!

नासाग्रसी बुद्धी ! आचरण शुद्धी !
विचार समृद्धी ! तुझ्या ठायी !!

अन्न पूर्ण ब्रम्ह:! सांगून महत्व!
पाळूनिया तत्व! सुखी जो तो!!

एक एक गण! गणात बोवूनी!
भजन गाऊनी! दंग होऊ!!

तुझ्यात आनंद! अंतरी स्वानंद!
बा... परमानंद! मिळे आम्हा!!

जाणतो प्रवीण! बाबा तुझा मार्ग!
एक धर्म स्वर्ग! एकतेचा!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
विठ्ठल विठ्ठल...
अभंग...
पंढरीचा विठू ! सांगतोय ऐका !
गर्व होता...  नौका ! डुबलीया !!

जै भाव निर्मळ ! भक्ती परीमळ !
तै वास प्रेमळ ! विठू तुझा !!

पांडुरंग भक्ती  ! वारकरी दंग !
चढे भक्ती रंग ! अस्तित्वाला !!

पांडुरंग हरी ! विठ्ठल विठ्ठल !
स्मरुया विठ्ठल ! एकनाम !!


-प्रवीण(डेबुजी) हटकर
ज्ञान तूच बाबा ...
अभंग...

ज्ञान तूच बाबा ! शक्ती तूच बाबा !
ज्ञानवंत बाबा ! शक्तीवंत !!

रूप अवलिया ! नासाग्रसी बुद्धी !
प्राप्त तुज सिद्धी ! ज्ञान ब्रम्हा !!

तूच माझा दाता ! स्वामी तू विधाता !
जगी कर्ता-धर्ता ! गजानना !!

नर्मदेस हाका ! देवी प्रकटली !
नौका ही रक्षली ! भक्तांसंगे  !!


स्नानोत्तर पाणी  ! अंगास लावून !
कुष्ठरोगी गण ! बरा झाला !!

प्रवीण पामर ! तुझ्या भक्तीविन !
तुझ्या भक्ती लीन ! कुबेर मी !!

 -प्रवीण(डेबुजी) हटकर.

...अभंग...
विठूराया उभा...
विठ्ठल माऊली ! नामात गावली !
प्रेमळ सावली ! विसावितो !!

विठूराया उभा ! घेऊनिया ढाबा !
भजताच ताबा ! मिळे भक्ता !!

विठ्ठल विठ्ठल ! पांडुरंग हरी !
भजूनी अंतरी ! सुखावितो !!

जयघोष नाम ! वारकरी दंग !
चढतोया रंग ! भक्ती रंगा !!

आलोया शरण ! भिजल्या अंतरी !
स्पंदन अंबरी ! मुरलेया !!


निर्मळ, कोमल ! स्वच्छंदी स्वभाव !
 भक्तांमध्ये भाव ! तुज हवा !!
       -प्रवीण(डेबुजी) हटकर.
अवलिया जगी...

अवलिया जगी ! रूप गजानन !
लिला दाखवून ! दंग गण !!

महाराष्ट्र भूमी ! संतांची नगरी !
विदर्भ आगरी ! गजानन !!

स्वामिवंत स्वामी ! गजानन स्वामी !
चारीधाम स्वामी ! तू ... दिधला !!

रोपट्याला मूळ ! मुळास  या पाणी !
आम्हा तुझी वाणी ! संजीवनी  !!

चंद्र-किरणाला ! चातक आसक्ती ! 
भक्ताचिया भक्ती ! तुझ्या ठायी !!

भोळे रूप कधी ! कधी तू कठोर !
लिला तुझी थोर ! लिलावंता !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
            अकोला
मोब: ८०५५२१३२८१

Monday, 29 October 2012

अभंग...
श्री हरी विठ्ठल ...
श्री हरी विठ्ठल ! पांडुरंग हरी !
जय जय हरी ! पांडुरंगा !!

भक्त हाका देई ! मनातून राया !!
 वासराला माया ! गाय देई !!

विठ्ठल नामात ! रंगतो, दंगतो !
जागतो, जाणतो ! भक्तीभाव !!

विठू तू विश्वास ! विठू तूच श्वास !
तुझा सहवास ! स्वर्गसुख !!

विठू तू समक्ष ! भक्तांसाठी दक्ष !
चरणी या मोक्ष ! लाभो आम्हा !!

प्रवीण जाहलो ! अनुभूती येता  !
अहंकार जाता ! पांडुरंगा !!

-प्रवीण बा. हटकर
विठ्ठल-रुख्माई...
विठ्ठल माऊली! तुझ्या दर्शनाला ! 
चाले पंढरीला ! वारकरी !!
टाळ वाजवूनी! नाम जय घोष!
मनी नाही रोष! बा...विठ्ठला!!
ढोल, ताशे आणि ! वाजवी मृदुंग !
एकरूप दंग! भक्त झाले !!
विठ्ठल-रुख्माई ! बाबा आणि आई !
रूप विठ्ठलाई ! आम्हा दिसे !!
भक्तांसाठी उभा ! युगे अठ्ठावीस !
साल, रात्रंदिस ! अविरत !!
प्रवीण पुजतो! प्रवीण रंगतो!
प्रवीण दंगतो! विठू नाम !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.

                
                   अभंग...
बाबा तुझिया लिला ...

गजानन माऊली ! माऊली माऊली तू !
प्रेमळ सावली तू ! ममतेची !!
 
विना आग चिलीम ! पेटवून दाविसी !
दंगला कौतुकासी ! भक्त मेळां !!

तू ब्रम्हांड नायक ! तूची भाग्य विधाता !
तू माता-पिता, दाता ! तुज नमो !!

बाबा तुझिया लिला ! तू जागसी, जाणसी !
गण गण जोडसी ! एकतेने !!

अन्न हे पूर्ण-ब्रम्ह ! खाऊनी उष्टे अन्न !
सांगितलेया गण ! तै महत्त्व !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Thursday, 25 October 2012

अभंग...

!! श्री हरी विठ्ठल पांडुरंग हरी !!
 
श्री हरी विठ्ठल ! पांडुरंग हरी !
जय जय हरी ! पांडुरंगा !!

भक्त हाका देई ! अंतरीत असा !!
तरंगला ठसा ! स्पंदनात !!

विठ्ठल विठ्ठल ! रंगता दंगता !
जागता जाणता ! विठू नाम !!

विठू तू विश्वास ! विठू तूची श्वास !
तुझा सहवास ! स्वर्गापरी !!

विठू तू समक्ष ! भक्तासाठी दक्ष !
चरणी या मोक्ष ! मिळो आम्हा !!

प्रवीण जहालो ! अनुभूती येता  !
अहंकार जाता ! पांडुरंगा !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.
-

 

Tuesday, 23 October 2012

अभंग...
नाम तुझे घेता! आसमंत झाला!
सुखे वर्षावला!! गजानना!!
मी शूद्र तुझ्यात ! पाही विठूराया!
विठ्ठलासी काया! तू रुपिली !!
 
प्रेमळ माऊली! तुझ्यात गावली!
मायेची सावली! देई आम्हा!!
 
गजानन बाबा! तुझी अनुभूती!
शेगाव जाणती! स्वर्गापरी!!
 
प्रवीण जाणतो! शेगावी जो जातो!
स्वानंद हर्षितो! मनोमनी!!
          प्रवीण(डेबुजी) हटकर।  
          मो. ८०५५२१३२८१
                अकोला

Saturday, 20 October 2012

अभंग...
नाम तुझे घेता! आसमंत झाला!
सुखे वर्षावला!! गजानना!!

रूप दिसे मला! अनंत अनंता!
सामान्य महंता! चराचरी!!
मी शुद्र तुझ्या! पाही विठूराया!
विठलासी काया! तू रुपिली!!

मेंढ्यास हाकितो! मल्हार भानोसी!
बाबा चाललासी! एकतेला!!
गजानन बाबा! तुझी अनुभूती!
शेगाव जाणती! स्वर्गापरी!!

जगत महंता! घे मज शरणा!
दे मज चरणा! जागा तुझ्या!!
प्रेमळ मावुली! तुझ्यात गावली!
मायेची सावली! देई आम्हा!!

प्रवीण जाणतो! शेगावी जो जातो!
स्वानंद हर्षितो! मनोमनी!!
          प्रवीण(डेबुजी) हटकर।  
          मो. ८०५५२१३२८१
                अकोला

Friday, 19 October 2012

नवरात्रीच्या समस्त भक्त गणास प्रेमळ शुभेच्छा...

अभंग...

शेरावाली माता ! ज्योतावाली माता !
नवदुर्गा माता ! तुज नमो !

देवी शैलपुत्री ! महा कालरात्री !
आई सिद्धदात्री ! तुज नमो !!

हे ब्रह्मचारिणी ! देवी कांत्यायनी !
जीव संजीवनी ! तुज नमो !!

प्रेमळ कृष्मांडा ! देवी स्कंदमाता !
एकविरा माता ! तुज नमो !!

आई आई आई ! चंद्रघटा आई !
महागौरी आई ! तुज नमो !!

रूप दिसे मज ! सप्तश्रुंगी आई !
रुपियली आई ! काया तुझी !!

भक्त गण भजे ! दिनरात नाम !
तूची चारीधाम ! तुज नमो !!

प्रवीण जाणतो ! शरण जो जातो !
चरणी पाहतो ! स्वर्ग तुझ्या !!

- प्रवीण ( डेबुजी) हटकर

एक आगळावेगळा प्रयोग... हिंदी-उर्दू-मराठी गझल !

   "मारवा"
जिंदगी कारवा
बोलला पारवा

आह थंडी भरी
बोचला गारवा

बासुरी यह बजी
गायिला मारवा

छेद है रूह पर
भेग ती सारवा

डाल पाणी जरा
घट्ट झाला रवा !!!

                  - प्रवीण (डेबुजी) हटकर
                मोब: ८०५५३१२२८१

Friday, 12 October 2012

हक्कासाठी तुझ्या ! हक्काने बोलावे !
हक्काने लढावे ! हक्कासाठी !!

तडजोड नको ! तुझ्या हक्कासाठी !
दुजा हक्कासाठी ! ना तू ठेव !!

हक्क ओळखावे ! हक्कास जाणावे !
हक्कास जपावे ! आत्मरूप !!


Monday, 1 October 2012

              ...गुरु ...
गुरु कोण आहे ! कसे ओळखावे !
कसे पारखावे ! मह्न्तासी !!

गुरुसी जाणणे ! अगदीच सोपे !
गुरु ज्ञान दीपे ! ब्रम्हा परी !!

मुळ  ज्ञानवंत ! नाच शोभिवंत !
जाग जाणिवांत ! जागलेला !!

भावना तयाची ! ज्ञान रुजवावे !
ज्ञान हे वाटावे ! अखंडित !!

गुरूची संगत ! अंगुली जागृत !
सोडूनी विकृत ! हिंसाचार !!

गुरु वाट तुझी ! सत्यार्थ दावितो !
ना कधी दावितो ! असत्याची !!

गुरु हा असावा ! आरशाप्रमाणे !
दाविल्या प्रमाणे ! बा... दिसावे !!

पळसा प्रमाणे  ! असो कीर्तीरूप !
दावी आशारूप ! संकटात !!

-प्रवीण (डेबुजी) हटकर.

Tuesday, 25 September 2012

अभंग...

कोळसा ना झाला ! आजवर सोन !
ना झालेया सोन ! बा... कोळसा !!

गाढवा सजले ! अंघोळ करुनी !
लोळले जाऊनी ! घानेमध्ये !!

कावळा घासतो ! अंगास साबण !
चांबळ सोलुण ! मरतोया !!

पोपट बोलतो ! वाणीतून गोड !
कोकिळेसा गोड ! ना गायीला !!

गुणधर्म ज्याचे ! जो तो जोपासितो !
गुण ना दावितो ! वेगळेची !!

नको होऊस तू ! रे गोगल गाय !
पोटामध्ये पाय ! कायमचे !!

मानवा ओळख ! कार्य तुझे काय !
संदर्भ हा काय ! जीवनाचा !!

कापूर जळतो ! कापूर विरतो !
कापूर उरतो ! अंश त्याचा !!

गुणधर्म तुझे ! बा... इतरांपरी !
जोपासले जरी ! तू जिंकला !!

-प्रवीण (डेबुजी) हटकर.

Monday, 17 September 2012


...अभंग...



विठ्ठल माउली ! नामात गावली !
प्रेमळ सावली ! विसावितो !!


विठूराया उभा ! घेउनिया ढाबा !
भजताच ताबा ! मिळे भक्ता !!


विठ्ठल विठ्ठल ! पांडुरंग हरी !
भजुनी अंतरी ! सुखावितो !!


जयघोष नाम ! वारकरी दंग !
चढतोया रंग ! भक्ती रंगा !!


आलोया शरण ! भिजल्या अंतरी !
स्पंदन अंबरी ! मुरलेया !!


निर्मळ कोमल ! स्वच्छंदी स्वभाव !
भक्ता मध्ये भाव ! तुज हवा !!


-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Thursday, 13 September 2012

              -अभंग-
   ***श्री स्वामी समर्थ***

समर्थ समर्थ ! श्री स्वामी समर्थ !
जाण  परमार्थ ! स्वामी ठाई !!

अदभूत माया ! वात्सल्याची काया !
भक्तासाठी छाया ! सदोदित !!

घाबरू नकोस ! मी पाठीशी तुझ्या !
मंत्र मुखी तुझ्या !! भक्तासाठी !!

सद्कार्य कर्म ! भाव सदाचारी !
ना मग लाचारी ! पत्करावी !!

समर्थ दाखवी ! सद्कर्म  मार्ग !
जीवन बा... स्वर्ग ! बहरेल !!

दत्त दत्त दत्त ! स्वामी स्वामी स्वामी !
जय जय स्वामी ! श्री समर्थ !!

श्री स्वामी समर्थ ! जपुनिया नाम !
मिले चारीधाम  ! स्वामी ठाई !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर .  

Friday, 7 September 2012

                   अभंग ...
       *** कापुरासमान ***
तुच्छ तुच्छ तुच्छ ! कोण येथे तुच्छ !
कोण आहे स्वच्छ ! बा ... ओळख !!

जो तो लागलाय ! समर्थ बनाया !
दुसऱ्यास द्याया ! कमीपण !!

कुणी धर्म नावे ! कुणी जाती नावे !
कुणी प्रांत नावे ! हक्क दावी !!

याची छोटी जात ! माझी मोठी जात !
त्याची थिटी जात ! भ्रम का हा !!

तूझे उच्च कुळ ! त्याचे निच्च कुळ !
डोक्यातील खुड ! बा ... काढावे !!

कमळ उगतो ! चिखल जागेत !
परी नजरेत ! मोहतोया !!

पळस फुलतो ! भाग खडकात !
जणु शिकवीत ! जगण्याला !!

माणसा तू कसा ! भुलला कर्मास !
का तुझ्या मार्गास ! भूलतोय !!

धर्म हे अनेक  ! जाती ह्या अनेक !
उद्देश हा नेक ! बा ...तुझ्याशी !!

तुझिया ओळख ! तुझ्या गुण-दोषी !
जसा वागलासी ! तू जाणला !!

कीर्ती तुझी असो ! कापुरा समान !
जळूनी प्रमाण ! कापुराचे !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर .

Saturday, 1 September 2012

एक जाणीव ...

तू आयुष्यात येता 
जणू हे घर विश्व बनलं 

नी तू दूर निघून जाता ...
हे विश्वची घर बनलं 

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Friday, 24 August 2012

माउली माउली...
अभंग...

माउली जगाची ! माउली माउली !
बाबा दे सावली ! ममतेची !!

रूप अवलिया ! नासाग्रसी बुद्धी !
प्राप्त तुज सिद्धी ! ज्ञान ब्रम्हा !!

तूच माझा दाता ! स्वामी तू विधाता !
तूच कर्ता-धर्ता ! दिगंबरा !!

एकतेचे कर्म ! एकतेचा धर्म !
रुजविले मर्म ! एकतेचे !!

स्वामी स्वामी स्वामी ! गजानन स्वामी !
स्पर्श तुझा भूमी ! धन्य झाली !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Thursday, 23 August 2012

आई सप्तशृंगी ....
अभंग...
आई सप्तशृंगी ! अठरा भुजांची !
रे... गडावरची ! तुझं नमो !!

साडे तीन पीठ ! त्यात सप्तशृंगी !
शक्ती पीठा रंगी ! भक्त गण !!

नव्वारीची साडी ! ध्वज दिसे भारी !
दिव्य गडावरी ! फडफडे !!

तुझा दिव्य स्पर्श ! तलाव पवित्र !
रोग-मुक्ती गोत्र ! होई आज !!

आई आई आई ! मज दिसे आई !
सप्तश्रुनी आई ! तुझं नमो !!

आई आदिशक्ती ! देवी आदिमाया !
रुपियाली काया ! दिव्यरूपी !!

तेज चेहऱ्यावरी ! टिळा माथ्यावरी!
मायाळू अंतरी ! भाव तुझा !!

महाकाय मूर्ती! अतुल्यसी कीर्ती !
भक्तन पूजती ! मनोभावे !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Wednesday, 22 August 2012

पैसा पैसा ....
पैसा नाही मोठा! पैसा नाही छोटा!
पैशासाठी खोटा! बोले जो-तो!!

पैसा म्हणे बोले! पैसा म्हणे चाले!
पैशा संगे डोले! आज जो-तो!

पैसा झाली माय! पैसा झाला बाप!
गरोड्याचा साप! डोले जो-तो!!

पैसा माझा धर्म! पैसा माझे कर्म!
ओळखले मर्म! पैशामुळे!!

नाव गंगाराम! फिरे चारी धाम!
तुझ्यावीण काम! कोण करी!!

मी डाकू लुटेरा! हाती चाकू सुरा!
पैसा चोरणारा! तुम्हा प्यारा!

सत्ता माझ्या हाती! मोठी आहे छाती
पैशामुळे ख्याती! झुके जो-तो!!

मन नाही  मला! आत्मा नाही मला!
खर सांगू तुला! मी ईश्वर!!

जो पूजेल आज! डोक्यावर साज!
करील तो राज! मायारूपी!

प्रवीण का स्तब्ध! टाळतोय शब्द!
पैसाच प्रारब्ध! बोलूनिया!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.
           अभंग...
माणूस निर्मिती! निसर्ग जागृती!
कर्माने प्रकृती!घडावया!!                      निर्मिकाने बघा! नेमले माणसा!
                                                  स्वच्छंदी आरसा! दाखवाया!
मानवा तू कसा! घडलास बाबा!
का? निर्मात्यास बा! नडलाय!!                  प्रश्न प्रश्न प्रश्न! किती तुझे प्रश्न!
                                                      निर्मात्यास प्रश्न! पडलाय!!
हावरट तुझा! मुळात स्वभाव!
कायम अभाव! समाधानी!!
                                                      घर तुला हवे! मोठे राजेशाही!
                                                      मनी अंधाराई! दाटलेली!!
त्याच वाईट हो! नि माझे चांगले!
झोडीत छीदरे! पडो त्याच्या!                     झाडांची कटाई! कागद छपाई!
                                                     वाटून मिठाई! यशासाठी!
मोठे  कारखाने! दुषीयले जल!
टाकुनिया मल! पाण्यामध्ये!!                  शांतीचा संदेश! जगी पोहचाया!
                                                    चाचणी कराया! अन्वस्राची!!
मूर्ख मूर्ख मूर्ख! किती मूर्ख पणा!
वाटून घे मना! थोडे तरी!                       जगाच्या शांतीस! हिंस्र हत्यार का!
                                                    औजार हेच का! शांती साठी!
इतिहास गवा! हे महाभारत!
विनाश विरत! झाला आहे!!
                                                     पाहिजे जमीन! तीन गज तुला!
                                                     तरी का मोहला! स्वार्थासाठी!!
निर्मात्यास अता! पडलाय प्रश्न!
मानवाने स्वप्न! भंग केले!!                    मानव उत्पत्ती! निसर्ग संकट!
                                                     प्रश्न हा विकत! निर्मात्यास!
प्रवीण सांगतो! ऐक तू मानवा!
आलाय फतवा! तुझ्या नामे!!                 निसर्ग नियम! हिंस्र जेहि  होते!
                                                    नामशेष झाले! अता कोण!!
सावध सावध! मानवा सावध!
होयील रे वध! अता तुझा!!                   निर्माता निर्मिले! मानवा कर्मिले!
                                                निसर्गा धर्मिले! स्वर्गापरी!!
                              -प्रवीण(डेबुजी) हटकर
अभंग रचना...

प्रत्येक धर्माला! सत्यार्थ कर्माला!
नैतिक मर्माला! मी पुसले!!                              धर्म धर्म धर्म! आहे काय धर्म!
                                                               कशासाठी वर्ण! पाळलेत!!
धर्म आहे काय! संकल्पना काय!
उद्देश हा काय! सांगा कुणी!!                             म्हणे हा अमका! म्हणे हा टमका!
                                                             नाहीच ढमका! कुणी बोले!!
मारुनिया हात! डोक्यावर माझ्या!
मीच मूर्ख राज्या! उद्गारलो!!                             तेथुनी निघालो! चक्रात बुडाला!
                                                              उगाच पडलो! पेचात ह्या!!
विचारांचे चक्र! मेंदूस ग्रासले!
उगाच पुसले! धर्म गीता!!                               तेव्हड्यात मागे! आवाज हा आला!
                                                             धर्म भिक्षुकाला! द्या मालक!!
"धर्म ध्या धर्म द्या"! कल्याण होयील!
सुकर होतील! मार्ग तुझे!!                              खिशातलं नाणं! भिक्षुकास दिले!
                                                            आशीर्वाद दिले! खुल्या हाती!!
थोडे पुढे जाता! अचंबित झालो!
देवूनिया आलो! मी धर्माला!!                          धर्म उमगला! धर्म हा जाणला!
                                                           पैशात जन्माला! धर्म नवा!!
नवीन युगाचा! फक्त एक धर्म!
पैशाचेच सर्व! भक्त झाले!!                             "पैसा हाच धर्म"! वाजवूनी टाळ!
                                                            जपतोय माल! पैसा! पैसा!!

                                  -प्रवीण(डेबुजी) हटकर.
              अभंग...
माणूस निर्मिती! निसर्ग जागृती!                   
कर्माने प्रकृती!घडावया!!                           निर्मिकाने बघा! नेमले माणसा!
                                                       स्वच्छंदी आरसा! दाखवाया!
मानवा तू कसा! घडलास बाबा!
का? निर्मात्यास बा! नडलाय!!                   प्रश्न प्रश्न प्रश्न! किती तुझे प्रश्न!
                                                        निर्मात्यास प्रश्न! पडलाय!!
हावरट तुझा! मुळात स्वभाव!
कायम अभाव! समाधानी!!                        घर तुला हवे! मोठे राजेशाही!
                                                        मनी अंधाराई! दाटलेली!!
त्याच वाईट हो! नि माझे चांगले!
झोडीत छीदरे! पडो त्याच्या!                      झाडांची कटाई! कागद छपाई!
                                                       वाटून मिठाई! यशासाठी!
मोठे  कारखाने! दुषीयले जल!
टाकुनिया मल! पाण्यामध्ये!!                     शांतीचा संदेश! जगी पोहचाया!
                                                       चाचणी कराया! अन्वस्राची!!
मूर्ख मूर्ख मूर्ख! किती मूर्ख पणा!
वाटून घे मना! थोडे तरी!                         जगाच्या शांतीस! हिंस्र हत्यार का!
                                                      औजार हेच का! शांती साठी!
इतिहास गवा! हे महाभारत!
विनाश विरत! झाला आहे!!                      पाहिजे जमीन! तीन गज तुला!
                                                      तरी का मोहला! स्वार्थासाठी!!
निर्मात्यास अता! पडलाय प्रश्न!
मानवाने स्वप्न! भंग केले!!                    मानव उत्पत्ती! निसर्ग संकट!
                                                     प्रश्न हा विकत! निर्मात्यास!
प्रवीण सांगतो! ऐक तू मानवा!
आलाय फतवा! तुझ्या नामे!!                  निसर्ग नियम! हिंस्र जेहि  होते!
                                                     नामशेष झाले! अता कोण!!
सावध सावध! मानवा सावध!
होयील रे वध! अता तुझा!!                     निर्माता निर्मिले! मानवा कर्मिले!
                                                     निसर्गा धर्मिले! स्वर्गापरी!!
                          -प्रवीण(डेबुजी) हटकर.

Tuesday, 21 August 2012

अभंग....

ओढ दर्शणाची ! आई सप्तशृंगी !
जो तो रंगी-दंगी ! तुझ्या नाम !!

गडावरी वास ! देवी तुझा ध्यास !
करती प्रवास ! भक्त-मेळा !!

आकाश झुकले ! तुझ्या ग चरणी !
जगत जननी ! तुझं नमो !!

आक्राळ-विक्राळ ! रुपियली काया!
आदी शक्ती माया ! ममतेची !!

आदि-शक्ती कुणा ! दिव्य-शक्ती दिसे !
मज 'आई' दिसे ! माते तुझ्या!!

जिवंतपणी ना !   स्वर्ग हा गाठीला  !
दर्शुनीया  तुला ! 'मी' जाणला !!

आदि-शक्ती आई ! दिव्य-शक्ती आई !
सप्तशृंगी आई ! तुझं नमो !!

प्रवीण पुकारे ! आई आई नाम !
तुझ्या चारीधाम ! चरणासी !!

[आई सप्तशृंगी यांच्या दर्शन घेतल्यावर.... ]
-प्रवीण(डेबुजी) हटकर.



Thursday, 16 August 2012

विठ्ठल विठ्ठल...
अभंग...
पंढरीचा विठू ! सांगतोय ऐका !
गर्व होता...  नौका ! दुबलीया !!

जै भाव निर्मळ ! भक्ती परीमळ !
तै वास प्रेमळ ! विठू तुझा !!

पांडुरंग रंगा ! दंग वारकरी !
रंगुनिया रंग ! सावळ्याचा !!

पांडुरंग हरी ! विठ्ठल विठ्ठल !
दंगुया विठ्ठल ! एकनाम !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.


विठ्ठल विठ्ठल...
अभंग...
पंढरीचा विठू ! सांगतोय ऐका !
गर्व होता...  नौका ! दुबलीया !!

जै भाव निर्मळ ! भक्ती परीमळ !
तै वास प्रेमळ ! विठू तुझा !!

पांडुरंग रंगा ! दंग वारकरी !
रंगुनिया रंग ! सावळ्याचा !!

पांडुरंग हरी ! विठ्ठल विठ्ठल !
दंगुया विठ्ठल ! एकनाम !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.


Wednesday, 15 August 2012

एक चरण...

एकटा एकटा !
मी अता एकटा !
ना कुणी दुकटा !
सोबतीला !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Saturday, 11 August 2012

अभंग...

देवा गजानना! गुरु गजानना!
प्रगटुनी जना! उद्धारिले!!

वेश अवलिया! दिव्यसा चेहरा!
प्रेमरूपी झरा! अंतरीला!!

ब्रम्हांड नायक! शेगावीचा राणा!
एकतेचा बाणा! मंत्र तुझा!!

अन्न पूर्ण ब्रम्ह:! सांगून महत्व!
पाळूनिया तत्व! सुखी जो तो!!

एक एक गण! गणात बोवूनी!
भजन गावूनी! दंग होऊ!!

तुझ्यात आनंद! अंतरी स्वानंद!
बा... परमानंद! मिळे आम्हा!!

जाणतो प्रवीण! बाबा तुझा मार्ग!
एक धर्म स्वर्ग! एकतेचा!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Friday, 10 August 2012

अभंग...
कृष्ण कृष्ण कृष्ण! मन झाले कृष्ण!
मिटलेया प्रश्न! नाम घेता!!

कोणी म्हणे कान्हा! कुणी नंदलाला!
रे मुरारीवाला! कुणी म्हणे!!

हा ... माखनचोर! आहे चितचोर!
गोकुळ चा पोर! कुणी बोले!!

प्रेमळ स्वभाव! तेजस्वी प्रभाव!
प्रेमरूपी भाव! देवा तुझा!!

मुरारी वाजून! गोपिया दंगती!
रंगात रंगती! मनोभावे!!

प्रेमाच प्रतिक! शुभसा स्वस्तिक!
प्रेमळ आस्तिक! तूची आम्हा!!

हाती सुदर्शन! असुर वधाया!
जगी पोहचाया! शांती शांती!

शिरी मोरपंख! प्रेमरूपी काय!
जगी पसराया! प्रेमरस!!

राधा राधा राधा! कृष्ण कृष्ण कृष्ण!
झाले राधेकृष्ण! एकरूप!!

मीराच्या भक्तीने! आला दुजा युग!
अदभूत योग! घडविला!

प्रवीण बघतो! किरण तुझ्यात!
प्रेम अंतरात! रुजुनिया!!

प्रवीण भजतो! राधेकृष्ण नाम!
आहे प्रेम-धाम! तुझ्या ठायी!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर. 
भगवान कृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वाना प्रेमळ शुभेच्छा!!
राधेकृष्ण...

Friday, 3 August 2012

अभंग...

विठू माझा गुरु! ज्ञान कल्पतरू!
नाम तुझ्या सुरु! सद्कार्य!!

विठू सुखकर्ता!विठू विघ्नहर्ता!
तै नाम स्मरता! सुखावितो!!

विठ्ठल विठ्ठल! जप अंतरित!
मन सुहासित! कस्तुरीसी!!

विठ्ठला भजावे! निर्मळ निर्माल्य!
जीवन साफल्य! तै होयील!!

प्रवीण रचतो! विठ्ठल चरणी!
जावून शरणी! बा... अभंग !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Monday, 30 July 2012

निसर्ग रचना...
मानव जिंकला! मानव जिंकला!
मात निसर्गाला !  देता देता!!

शेत वनराई ! नामशेष नग!
सिमेंटचे जग! झाले आज !!

नैसर्गिक अता! संपला पाऊस!
कृत्रिम पाऊस! पाडलाय!!

चंद्रावर जाता! ना दिसे हिरवे!
दिसले प्लास्टीके! पृथ्वीवर!!

मोठमोठी पूल! केली कारखाने!
नि वृक्षतोडीने! शक्य झाले!!

निसर्ग नियम! पाळता पाळता!
नियमात अता! निसर्ग हा!!

जाग रे  मानवा! जै झालेय हिंस्र!
तै झालेय भस्म! ऐक राजा!

डायनोसोर नि! मोठ मोठे प्राणी!
तै यमसदनी! झाले नष्ट!!

तुझा मूर्खपणा! तुज नडतोय!
भूकंप येतोय! नि सुनामी!

मानवा जाण... तू! निसर्ग घटक!
ना आहे जनक! निसर्गाचा!!

निसर्ग नियम! प्रवीण जाणतो!
प्रवीण जपतो! निसर्गासी!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

 

Saturday, 28 July 2012

गझल...

जाळतो हा श्वास आहे
ना तुझ्या सहवास आहे

आठव प्रिये भेटण्या मी
चुकविलेला तास आहे

एकतर्फी  प्रेम म्हणजे
जन्म कारावास आहे

ताट आहे वाढलेले
नेमका उपवास आहे

संत तत्वे पळताना
आज सर्वा त्रास आहे

प्रवीण(डेबुजी) हटकर.
अकोला
8055213281
अभंग...

पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग!
 तन मन सप्तरंग ! रंगीयले!!

दर्शनाची तळमळ! वारकरी धावपळ!
भाव-तरंग निर्मळ! उमटले!!

विठू मज दिसतोय! गालामधी हसतोय!
नजरेत दावतोय! दिव्य-तेज!!

विठ्ठल नामात दंग! प्रवीण रचे अभंग!
उधळून शब्द-रंग! हर्शियतो!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Friday, 6 July 2012


अभंग...

धाव विठू देवा! विठू देवा धाव!
 संकटात पाव! आज भक्ता!!

मी रे वारकरी!! पंढरी निघालो!!
गाव-गाव आलो! फिरूनिया!!

वरून राजाची! न तमा आम्हासी!
तुझ्या दर्शनासी!! ओढ आम्हा!!

विठ्ठल विठ्ठल! नाम जपुनिया!!
दंग-दंगुनिया! वारकरी!!

सुखावतो तुझ्या! रंगुनी रंगतो!
नामात जगतो!! विठूराया!!

प्रवीण मी झालो! नाम तुझे घेता!!
स्वानंद जाणता!! तुझ्या ठाई!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Tuesday, 26 June 2012

अभंग...

तुळजापुरची! हे भवानीमाता!
देवी आदी माता! तुझं नमो!!

जगत जननी! जगत कल्याणी!
प्राण- संजीवनी! तुझं नमो!!

शिवबा शरण! पाठीवर हात!
दुष्मनाना मात! मिळविली!!

महाराष्ट्रावर!  तुझी कृपा दृष्टी!
जपलीया सृष्टी!  मराठ्यांची!!

रे.. जय भवानी! रे... जय शिवाजी!
जय घोष जी...  जी...! उठलाय!!

आशीर्वाद तुझा! मर्द मराठ्यांना!
आम्हास वीरांना! अभय दे!!

आशेचे किरण! प्रवीण बघतो!
मराठा जगतो! तुझ्या ठायी!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Monday, 25 June 2012

अभंग...
           "दिव्यज्योत"
हे देवाधी देवा! श्री शिव शंकरा!
स्वामी राजेश्वरा! तुझं नमो!!

देवा घ्रुनेश्वारा! भोले रामेश्वरा!
हे ओम्कारेश्वारा! तुझं नमो!!

तुझ्या सेवेसाठी! दिन रात नंदी!
गळ्यात स्वानंदी! नागराज!!

केशातून गंगा! भू-लोकी सोडिले!
जन उद्धारीले! महादेवा!!

आक्राळ विक्राळ! रूप रुद्रियले!
असुरा वधिले! भक्तासाठी!!

ओंकार हुंकार! कण-ब्रम्हांडात!
खंड-अखंडात! तू- रुपिला!!

बघतो प्रवीण! किरण तुझ्यात!
उजळे पिंडात! दिव्यज्योत!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.


 

Wednesday, 20 June 2012

अभंग...

गजानन बाबा! स्वामी गजानन!
रे नंदनवन! रूप-तुझे!!


हे देवाधिदेवा! शेगावीचा राणा!
तुझा एकी बाणा! एकतेचा!!

तूची सर्वेसर्वा! अनंत-अनंता!
तूची दिगवंता! दिगंबरा!!

जोडीयले जन! मंत्र  गण-गण!
गणात  बोलून! रुजविले!!

श्री गजाननासी! भक्ती अर्पियली!
ज्योत उजळली! भावपूर्ण!!

प्रवीण जाणतो! बाबा तुझा मार्ग!
सद्कार्य स्वर्ग!! कर्मातुनी!!
प्रवीण(डेबुजी) हटकर.





Friday, 8 June 2012

अभंग...
विठू तूच माझा! सखा जिवलग!
आहे नातलग! अंतरीचा!

तुझ्या दर्शनाला! येती वारकरी!
गावोगाव करी! पायीवारी!!

विटेवरी उभा! हात कमरेत!
तेज नजरेत! मावूलीच्या!!

ममतेची मूर्ती! वात्सल्याची काया!
विठू तुझी माया! राहो सदा!

विठू तू जगाचा! रे पालन कर्ता!
कर्म सुखकर्ता! सदोदित!!

विठ्ठल विठ्ठल! हरी पांडुरंग!
तन-मन रंग! तुझ्या ठाई!!

प्रवीण विठ्ठल! स्मरोनी पुजतो!
अंतरी जागतो! भाव-नवा!!
 प्रवीण(डेबुजी) हटकर.
 

Thursday, 7 June 2012

अभंग ...
शिव माझे शंभू! तूची भोलेनाथ!
अनाथांचा नाथ! पितामहा!!

समुस्द्र-मंथन! हलाहल आले!
प्राशानही केले! नीलांबरा!

 हे देवाधिदेव! प्रभू महादेवा!
अर्पियतो सेवा! स्वीकारावी!

मी मूर्ख अजाण! मुळात पाषाण!
कर्मात सुजाण! बनवावे!

तुझ्या नाम भक्ती! तुझ्या नाम उक्ती!
सत्य-कर्म शक्ती! मज द्यावी!

रूप महाकाय! रुद्र अवतार!
नृत्य अविष्कार! नटरंगा!!


प्रवीण पुजतो! शिव मंत्र जाप!
सद्कार्म माप! दळूनिया!!

प्रवीण(डेबुजी) हटकर.

Wednesday, 6 June 2012


एक जाणीव...
तू पौर्णिमेचा चंद्र आहे 
मी चकोर तुझ्या आसेचा 

तू मदमस्त बहरलेला कमळ 
मी चिखल तुझ्या सहवासाचा..


प्रवीण(डेबुजी) हटकर.
अभंग... "संत-नाम"
विठ्ठल मावुली! मावुली जगाची!
सावली मायेची! तुझ्या ठाई!!

बाबा तुझ्या-भेटी! रे शेगावीहून!
आलाय घेवून! भक्ती-रस!

पंढरपूरला! भक्त गोतावळा!
रंगतोय मळा! भावपूर्ण!!

पालखी निघाली! गाव-गावातून!
निघे मनातून! नाम-विठू!

गजानन बाबा! भेटुनी विठूला!
दिव्य संगमाला! नेत्र-दीपे!!

वारकरी संगे! चाले आज बाबा!
पंढरीचा राजा! दर्शनाला!!

प्रवीण जाणतो! सार्थक जाहले!
जीवन वाहले! संत-नाम!!

प्रवीण(डेबुजी) हटकर.

Wednesday, 30 May 2012

विठ्ठल-रुक्माई...

विठ्ठल मावुली! तुझ्या दर्शनासी! 
चाले पंढरीसी! वारकरी!

टाळ वाजुवूनी! नाम जय घोष!
मनी नाही रोष! बा...विठ्ठला!!

ढोल ताशे अन! वाजवी मृदुंग!
एकरूप दंग! भक्त झाले!!

विठ्ठल विठ्ठल! श्री हरी विठ्ठल!
भक्त युगे-काल! जपतोया!!

विठ्ठल-रुक्माई! बाबा आणि आई!
रूप-वीठ्ठलाई! आम्हा दिसे!!

भक्तासाठी देवा! उभा अत्ठावीस!
युगे वर्ष दिस! चाललीत!!

प्रवीण पुजतो! प्रवीण रंगतो!
प्रवीण दंगतो! नाम घेता!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Thursday, 24 May 2012

         अभंग...
विश्वासाच रोप! मनात रुजवा!
विस्तृत फुलवा! वटवृक्ष!!

आत्मविश्वास हा! स्व: जाणीव भाग!
अंतरीस जाग! विश्वासाने!!

स्व: जाणीव होते! आत्म-जाणीवेत!
कृती व्यक्ततेत! विचारांच्या!!

विचार आचार! विचार प्रसार!
विचार प्रचार! माध्यम हे!   

आत्मविश्वास ना! मिळे बाजारात!
मिले अंतरित! झाक तुझ्या!!

आत्मविश्वास नि! विचारांची जोड!
नाही जगी तोड! आज तुला!

आपले विचार! विश्वासाने मांड!
झुकेल ब्रम्हांड! पुढे तुझ्या!!

विश्वास नसणे! विचार अस्पष्ट!
विचार संतुष्ट! तू नसणे!!

आत्म अंतरीस! जाग विश्वासाने!
आत्मविश्वासाने! जगशील!!

प्रवीण अंतरी! आत्म्यास जागून!
 विश्वास होवून! जगतोय!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर।

Tuesday, 22 May 2012

               अभंग...
जिथे मिळे ज्ञान! गुरू तोची जाण!
एक नाही ठाण! दिव्यतेचे!!

ज्ञानरूप व्हावे! ज्ञान तू वाटावे!
ज्ञान पसरावे!  कस्तुरीसी!!

"ज्ञान हीच शक्ती"! करुनिया भक्ती!
अज्ञानास मुक्ती! कायमची!!

ज्ञान हे परीस! अज्ञानास ज्ञान!
बनतो निजान! सुजानही!!

ज्ञान संपत्तीही! दिल्यास वाढते!
कनास करते! ब्रम्हांड ती!!
 
ज्ञान लपवून! कोणी ना विद्वान!
मुळात अजाण! तोही झाला!!

ज्ञान हे सर्वस्व! ज्ञान ब्रम्ह आहे! 
नि ब्रम्हांड आहे! अखंडित!!

चाणक्याची नीती!  बिरबल युक्ती!
भीमरूपी शक्ती! ज्ञानदीपे!!

ज्ञानेश्वर यांनी! केली न्यानेश्वरी!
मी प्रविनेश्वरी! आणतोय!

गीता बायबल! कुराण वाचावे!
ज्ञान रुजवावे! मनोमनी!!

प्रवीण ज्ञानास! करनी अर्पण!
हे ज्ञान-दर्पण! स्वीकारावे!!


-प्रवीण(डेबुजी) हटकर।
 


Thursday, 17 May 2012

                    अभंग...
पांडुरंग पांडुरंग! नाम तुझे घेता दंग!
मन झाले सप्तरंग! दर्शनाने!!

पांडुरंग पांडुरंग! नाद मनी गुंजतोय!
 स्पंदनात विरतोय! भाव  नवा!!

पांडुरंग पांडुरंग! युगे उभा विटेवरी!
भक्त पुडलिका करी! विनवणी!!

पांडुरंग पांडुरंग! पुंडलिक झाला दंग!
आई-बाबा सेवा-रंग! रंगुनिया!

पांडुरंग पांडुरंग! प्रवीण सांगे पंढरी!
आई-वडील चरणी! मिळे स्वर्ग!!

-प्रवीण(डेबुजी)हटकर.

Wednesday, 16 May 2012


युगायुगाचा तू तहानलेला

मृगजळी सोबती विश्वास,



बघ कसा फसतोय तुझा

एकतर्फी प्रेमळ प्रवास...!
                                   
                            

प्रवीण(डेबुजी) हटकर 
              अभंग...

 =श्री गजानन जय गजानन=

धावुनीया आला! संकटासी राणा!
देवा गजानना! कृपावंता!!

शेगावीचा राणा! जानुनी महत्व!
एकतेचे सत्व! जपलेले!!

मावुली जगासी! प्रेम अर्पियले!
प्रेम जगविले! प्रेमवंता!!

उद्धार मानवा! होण्या प्रकटले!
मना झटकले! भेदभाव!!

 शेगाव पंढरी! काशी-स्वर्गापरी!
 एकता कैवारी! गजानना!!

प्रवीण नमतो! पूजितो, भजतो!
नाम हि स्मरतो! गजानन!!

प्रवीण अंतरी! स्वामी तुझी जोत!
ठेवसी पेटत! श्वासाश्वसा!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Tuesday, 15 May 2012

एक कविता...

हे ईश्वरा! मज 
इतुकाच 'विश्वास' दे 

पर्वत हि झुकेल 
असा आत्मविश्वास दे!



हे ईश्वरा! मज 
इतुकाच 'अभ्यास' दे 

 कन ते ब्रम्हांड उलगडेल  
असा 'ज्ञान-प्रवास' दे!



हे ईश्वरा! मज 
तुझा इतुकाच 'ध्यास' दे 

मन नि आत्मा तुझ्या विलीन 
अशी 'भक्ती-आस' दे!

-प्रवीण(डेबुजी) हटकर।

Monday, 14 May 2012

दगडा संगे...

काल अनोखा वाद झाला 
दगडा संगे अपघात झाला 

ठेच लागली माझी त्याला 
नि तो म्हणाला... घात झाला..। 
                                          
-प्रवीण (डेबुजी) हटकर.